कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
'अनुभव पुरस्कार योजना, 2024'
अनुभव पोर्टलवर अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 ; सर्व संबंधित मंत्रालये/विभाग अनुभव पोर्टलवर अर्ज करण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांशी साधणार संपर्क
Posted On:
12 JAN 2024 2:39PM by PIB Mumbai
पंतप्रधानांच्या निर्देशानुसार, सरकारबरोबर काम करताना केंद्र सरकारच्या निवृत्त होत असलेल्या/निवृत्त कर्मचाऱ्यांचे अनुभव सामायिक करण्यासाठी मार्च 2015 मध्ये 'अनुभव पोर्टल' नावाचे ऑनलाईन व्यासपीठ डी. ओ. पी. पी. डब्ल्यू. ने सुरू केले. निवृत्तीवेतनधारकांनी अनुभव व्यक्त करण्याची ही संस्कृती भविष्यात सुशासन आणि प्रशासकीय सुधारणांची पायाभरणी ठरेल, अशी संकल्पना आहे.
सरकारने, अनुभव पुरस्कार योजना 2024 अधिसूचित केली आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी, निवृत्त होणारे केंद्र सरकारचे कर्मचारी/निवृत्तीवेतनधारकांना, सेवानिवृत्तीच्या 8 महिने आधी आणि त्यांच्या निवृत्तीनंतर 1 वर्षापर्यंत, त्यांचे अनुभव लेखन सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर, संबंधित मंत्रालये/विभागांच्या मूल्यांकन केल्यानंतर लेख प्रकाशित केले जातील. प्रकाशित लेख, अनुभव पुरस्कार आणि परीक्षक प्रमाणपत्रांसाठी निवडले जातील. अनुभव पुरस्कार योजना 2024 अंतर्गत अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 31.3.2024 आहे. पोर्टलवर अनुभव वेळेवर सादर करण्यासाठी मंत्रालय/विभागांना निवृत्तीवेतनधारकांपर्यंत पोहोचण्याची विनंती करण्यात आली आहे. पुरस्कार-विजेत्या नामांकनांच्या दस्तऐवजीकरणाच्या स्वरूपावर ज्ञान-सामायिकरण सत्र देखील आयोजित केले गेले आहेत.
‘अनुभव पुरस्कार विजेते स्पीक वेबिनार’ मालिकेअंतर्गत एका राष्ट्रीय मंचावर अनुभव पुरस्कार विजेते त्यांचे अनुभव सामायिक करतात.
***
S.Bedekar/V.Ghode/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1995578)
Visitor Counter : 134