अल्पसंख्यांक मंत्रालय

केंद्रीय महिला आणि बालविकास आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती झुबिन इराणी, आणि परराष्ट्र आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांची सौदी अरेबियामध्ये जेद्दाह येथे, हज आणि उमराह परिषदेच्या उद्घाटन सत्राला उपस्थिती

Posted On: 09 JAN 2024 3:58PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 जानेवारी 2024

 

केंद्रीय महिला आणि बालविकास आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री स्मृती झुबिन इराणी, आणि परराष्ट्र आणि संसदीय कामकाज राज्यमंत्री व्ही. मुरलीधरन यांच्या नेतृत्वाखाली, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या शिष्टमंडळाने सौदी अरेबियाच्या (केएसए) हज आणि उमराह मंत्रालयाने जेद्दाह येथे, आयोजित केलेल्या हज आणि उमराह परिषद आणि प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला. भारतीय शिष्टमंडळाच्या सौदी अरेबिया भेटीचा हा एक भाग होता, ज्यामध्ये भारत आणि केएसए दरम्यान, 07.01.2024 रोजी हज 2024 साठीच्या द्विपक्षीय हज करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

  

हज आणि उमराह परिषद आणि प्रदर्शन हा एक वार्षिक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आहे आणि या अंतर्गत, जेद्दाह येथे 08 ते 11 जानेवारी 2024 दरम्यान तिसरी आंतरराष्ट्रीय परिषद आणि प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या जागतिक परिषदेत मुख्य निर्णयकर्ते, तज्ञ, शिक्षणतज्ञ आणि संशोधक यांची सत्रे, कार्यशाळा आणि प्रशिक्षण सेमिनार यांचा समावेश आहे. या कार्यक्रमाला जगभरातील विविध ठिकाणचे मंत्री आणि अधिकारी उपस्थित आहेत, तसेच हज आणि उमराह क्षेत्रातील खासगी आणि सार्वजनिक संस्थांचे प्रतिनिधित्व करणार्‍या 200 हून अधिक संस्थांची उपस्थिती आहे.

केंद्रीय महिला आणि बालविकास आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्र्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ, परिषदेच्या उद्घाटन सत्राला उपस्थित होते, ज्यामध्ये जागतिक स्तरावरील सर्वोत्तम पद्धतींबाबत मोलाचा दृष्टीकोन विकसित झाला. तसेच कल्पना आणि माहितीची देवाणघेवाण सुलभ झाली, जी भारतीय यात्रेकरूंना हज यात्रेचा अधिक चांगला अनुभव देण्यासाठी उपयुक्त ठरेल.

परिषदेच्या पार्श्वभूमीवर, केंद्रीय मंत्री स्मृती झुबिन इराणी आणि राज्यमंत्री  मुरलीधरन यांची मक्का क्षेत्राचे नायब राज्यपाल, युवराज सौद बिन मिशाल बिन अब्दुलअझीझ अल सौद यांच्या बरोबर बैठक झाली. या बैठकीला सौदी अरेबियाचे हज आणि उमराह मंत्री डॉ. तौफिक बिन फवझान अल रबिया देखील उपस्थित होते. या बैठकीत हज 2024 दरम्यान भारतीय हज यात्रेकरूंना पुरवल्या जाणार्‍या सुविधा आणि सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी सौदी अरेबिया बरोबरचे सहकार्य अधिक वाढवण्याच्या शक्यतांवर चर्चा झाली. 

 

 

* * *

S.Patil/R.Agashe/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1994544) Visitor Counter : 75