मंत्रिमंडळ
azadi ka amrit mahotsav

अयोध्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून आणि त्याचे “ महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ, अयोध्या धाम” असे नामकरण करण्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 05 JAN 2024 1:17PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने अयोध्या विमानतळाला आंतरराष्ट्रीय  विमानतळ म्हणून जाहीर करण्याच्या आणि त्याचे नामकरण महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ, अयोध्या धामकरण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

परदेशी भाविक आणि पर्यटकांसाठी दरवाजे खुले करत, अयोध्येचे एक जागतिक तीर्थक्षेत्र म्हणून महत्त्व निर्माण करण्याच्या आणि  आर्थिक क्षमतेचा पुरेपूर वापर करण्याच्या दृष्टीकोनातून अयोध्या विमानतळाच्या दर्जात वाढ करून त्याला आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दर्जा देणे अतिशय महत्त्वाचे आहे.

या विमानतळाला  महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ, अयोध्या धामहे नाव देणे म्हणजे रामायण हे महाकाव्य रचणाऱ्या महर्षी वाल्मिकी ऋषींना अभिवादन  आहे आणि विमानतळाच्या ओळखीमध्ये सांस्कृतिक भर पडत आहे.

खोलवर सांस्कृतिक पाळेमुळे असलेल्या अयोध्येचे स्थान या भागाला आर्थिक केंद्र आणि तीर्थक्षेत्र बनवण्यासाठी अतिशय योग्य आहे. परदेशी भाविक आणि व्यवसायांना आकर्षित करण्याची या विमानतळाची क्षमता या शहराच्या ऐतिहासिक ख्यातीशी संलग्न आहे.

***

N.Chitale/S.Patil/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1993434) Visitor Counter : 167