नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय

अत्याधुनिक बॅटरी ऊर्जा साठवणूक यंत्रणेसह कवरत्तीचे पहिले ऑन-ग्रिड सौर ऊर्जा संयंत्र 250 कोटी रुपयांची बचत करेल, डिझेलचा वापर 190 लाख लिटरने कमी करण्यासह 58,000 टन कार्बन उत्सर्जन कमी करेल

Posted On: 04 JAN 2024 4:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 4 जानेवारी 2024

 

लक्षद्वीपसाठी मैलाचा दगड ठरणारा, कवरत्ती येथील सौर ऊर्जा प्रकल्प  पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी 3 जानेवारी 2024 रोजी राष्ट्राला समर्पित केला.अत्याधुनिक बॅटरी ऊर्जा साठवणूक प्रणाली  (बीईएसएस ) तंत्रज्ञानासह हा या प्रदेशातील पहिला ऑन-ग्रिड सौर प्रकल्प आहे. एकत्रितपणे, भारतीय सौर ऊर्जा महामंडळ लिमिटेडच्या या  दोन संचांमध्ये  1.7 मेगावॅट ची एकत्रित सौर क्षमता आणि अत्याधुनिक 1.4 MWh बॅटरी साठवणूक सुविधा आहे.

या द्वीपसमूहासाठी शाश्वत उर्जा उपायांच्या  दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असून, सौर ऊर्जा प्रकल्प कवरत्ती येथील डिझेल-आधारित ऊर्जा निर्मिती प्रकल्पावरील अवलंबित्व कमी करण्यास मदत करेल.लक्षद्वीप ऊर्जा विकास संस्था  आता या सौर संयंत्रांमधून उर्जेचा वापर करेल, आणि या क्षेत्रासाठी डिझेल-आधारित उर्जेपासून  शाश्वत, पर्यावरण अनुकूल उर्जा स्त्रोताकडे एक महत्त्वपूर्ण बदल घडवेल.

अपेक्षित तांत्रिक आयुर्मानात, उपक्रमामुळे अंदाजे  250 कोटींची व्यावसायिक बचत होईल असा अंदाज आहे. डिझेलच्या वापरात 190 लाख लिटरपर्यंत लक्षणीय घट आणि कार्बन डायऑक्साइड उत्सर्जनात 58,000 टन घट  हरित ऊर्जेला चालना देण्यासाठी आणि लक्षद्वीपसाठी स्वच्छ आणि अधिक शाश्वत भविष्यासाठीचे दृढ  महत्त्व अधोरेखित करते. प्रकल्पासाठी अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम  कौशल्य सनसोर्स एनर्जीने प्रदान केले आहे.

 

* * *

S.Kane/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1993100) Visitor Counter : 110