सांस्कृतिक मंत्रालय
वर्षअखेर आढावा 2023: संस्कृती मंत्रालय
राष्ट्रासाठी आपल्या प्राणांची आहुती देणार्या 'वीरांना' आदरांजली वाहण्यासाठी “मेरी माटी मेरा देश-माटी को नमन वीरों का वंदन” या राष्ट्रव्यापी मोहिमेचे आयोजन
मेरी माटी मेरा देश मोहिमेअंतर्गत देशाच्या प्रत्येक भागातून संकलित केलेल्या मातीपासून विकसित करण्यात येणाऱ्या अमृत वाटिका आणि अमृत महोत्सव स्मारकाची पंतप्रधानांनी केली पायाभरणी
भारताच्या अध्यक्षतेखाली जी 20 संस्कृती कार्यगट आणि संस्कृती मंत्र्यांची बैठक; 'काशी संस्कृती मार्ग' नावाच्या निष्कर्ष दस्तऐवजासाठी सर्व जी 20 देशांची सहमती
आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघाच्या सहकार्याने पहिल्या जागतिक बौद्ध शिखर परिषदेचे सांस्कृतिक मंत्रालयाचा वतीने आयोजन
लाल किल्ल्यावर पहिल्या भारतीय कला, वास्तुकला आणि डिझाइन बिएनालेचे पंतप्रधानांनी केले उद्घाटन
शांतिनिकेतन आणि होयसाळ मंदिरांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश
‘गुजरातचा गरबा’ युनेस्कोकडून अमूर्त सांस्कृतिक वारसा म्हणून घोषित
2014 पासून विविध देशांकडून 344 पुरातन वास्तू पुन्हा मिळवल्या
Posted On:
22 DEC 2023 8:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 डिसेंबर 2023
वर्ष 2023 मधील संस्कृती मंत्रालयाचे प्रमुख उपक्रम/कार्यक्रम/कामगिरी खालील प्रमाणे आहेत:
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव (एकेएएम)
भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या सन्मानार्थ आणि ती साजरी करण्यासाठी, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा मार्च 2021 मध्ये पंतप्रधानांनी प्रारंभ केला.
"मेरी माटी मेरा देश" : दोन वर्षांच्या दीर्घ कालावधीत चाललेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या मोहिमेचा समारोप म्हणून, “मेरी माटी मेरा देश- माती को नमन वीरों का वंदन” हा भारताच्या मातीचा आणि शौर्याचे स्मरण करणारा एकत्रित उत्सव आहे. देशातील 766 जिल्ह्यांतील 7000 हून अधिक तालुक्यांसह लक्षणीय लोक भागिदारी या उत्सवाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. या मोहिमेदरम्यान 2 लाखांहून अधिक शिलाफलकांची स्थापना करण्यात आली. 3 कोटींहून अधिक लोकांनी पंचप्रण प्रतिज्ञा घेतली आणि राष्ट्राप्रती त्यांचे समर्पण दाखवले. देशभरात 2 लाखांहून अधिक अमृत वाटिका तयार करण्यात आल्या आणि 2 कोटींहून अधिक वृक्षांची रोपे लावण्यात आली. 2,18,856 स्वातंत्र्यसैनिकांसाठी समारंभ आणि स्मरणोत्सव आयोजित करण्यात आला होता. मेरी माटी मेरा देश मोहिमेअंतर्गत 4 कोटींहून अधिक लोकांनी त्यांचे सेल्फी अपलोड केले आहेत. देशातील 7000 हून अधिक तालुक्यांमधून 8500 हून अधिक कलश दिल्लीत आणण्यात आले.
30 ऑक्टोबर, 2023 रोजी, अमृत कलश यात्रेत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी आपापल्या विभागांचे आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधित्व करताना त्यांच्या कलशातील माती एका भव्य अमृत कलशात ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या भावनेने अर्पण केली. 31 ऑक्टोबर 2023 रोजी कर्तव्य पथ येथे ‘मेरी माटी मेरा देश’ मोहिमेअंतर्गत अमृत कलश यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमात पंतप्रधानांनी सहभाग घेतला. या कार्यक्रमात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा समारोप झाला. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी अमृत वाटिका आणि अमृत महोत्सव स्मारकाची पायाभरणी केली. देशभरातून कार्यक्रमात सहभागी झालेल्या हजारो अमृत कलश यात्रींना त्यांनी संबोधित केले. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी देशातील तरुणांसाठी मेरा युवा भारत (माय भारत) मंच सुरू केला.
जी 20 उपक्रम
- भारताच्या जी 20 अध्यक्षपदाच्या काळात, संस्कृती मंत्रालयाने 22 ते 25 फेब्रुवारी 2023 दरम्यान खजुराहो, मध्य प्रदेश येथे पहिली जी -20 संस्कृती कार्यगटाची बैठक आयोजित केली होती.
- भारताच्या जी 20 अध्यक्षपदाच्या काळात, संस्कृती मंत्रालयाने 15 ते 17 मे 2023 या कालावधीत भुवनेश्वर, ओदीशा येथे संस्कृती कार्यगटाची दुसरी बैठक आयोजित केली होती.
- 9-12 जुलै 2023 दरम्यान कर्नाटकातील हम्पी येथे तिसरी जी -20 संस्कृती कार्यगटाची बैठक आयोजित करण्यात आली. या संस्कृती कार्यगटाच्या बैठकीदरम्यान लमाणी भरतकामाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाने लमाणी भरतकाम कलावस्तूंच्या सर्वात मोठ्या प्रदर्शनाच्या आयोजनाचा विक्रम गिनीज बुक मध्ये नोंदवला. ‘संस्कृती जोडते सर्वांना' या संकल्पनेतून हे प्रदर्शन भरवण्यात आले होते.
- भारताच्या जी 20 अध्यक्षपदाच्या काळात, संस्कृती मंत्रालयाने वाराणसी येथे 24-25 ऑगस्ट 2023 रोजी चौथी जी 20 संस्कृती कार्यगटाची बैठक आयोजित केली होती.
- निष्कर्ष दस्तऐवज आणि ‘काशी संस्कृती मार्ग ’ नावाच्या अध्यक्षीय सारांशावर सर्व जी 20 देशांनी सहमती दर्शवली.
- 26.8.2023 रोजी आयोजित जी 20 संस्कृती मंत्र्यांच्या बैठकीत, जागतिक संकल्पनात्मक वेबिनारवर आधारित ‘जी20 संस्कृती: सर्वसमावेशक विकासासाठी जगाची मानसिकता तयार करणे’ हा अहवाल प्रकाशित करण्यात आला.
- जी 20 सदस्य आणि निमंत्रित देशांच्या संस्कृती मंत्र्यांनी वाराणसी येथे 26 ऑगस्ट 2023 रोजी भारताच्या जी 20 अध्यक्षपदा अंतर्गत संस्कृती कार्यगटाच्या चर्चेच्या यशस्वी समारोपाच्या निमित्ताने विशेष आवृत्तीचे टपाल तिकीट जारी केले.
बौद्ध आणि तिबेटी संस्था (बीटीआय)
परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्याने संस्कृती मंत्रालयाने शांघाय सहकार्य संघटना (एससीओ) राष्ट्रांसोबत 'सामायिक बौद्ध वारसा' या विषयावर विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे 14-15 मार्च, 2023 रोजी दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले होते, भारताच्या संस्कृतीवर लक्ष केंद्रित करून सदस्य राष्ट्रे, निरीक्षक राज्ये आणि विविध देशांच्या संवाद भागीदारांशी यात चर्चा करण्यात आली.
इतर देशांशी सांस्कृतिक आणि राजनैतिक संबंध वाढवण्याच्या उद्देशाने, संस्कृती मंत्रालयाने, त्याच्या अनुदानित संस्था, आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ (आयबीसी) मार्फत, 20 आणि 21 एप्रिल 2023 रोजी नवी दिल्ली येथे पहिली जागतिक बौद्ध शिखर परिषद आयोजित केली. माननीय पंतप्रधानांनी शिखर परिषदेचे उद्घाटन केले. दोन दिवसीय शिखर परिषदेत विविध देशांतील बौद्ध भिक्खू सहभागी झाले होते.
युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश
45 वी जागतिक वारसा समितीची बैठक 2023 मध्ये रियाध (सौदी अरेबिया) येथे आयोजित करण्यात आली होती ज्यामध्ये भारतातील शांतिनिकेतन आणि होयसळा मंदिरे (होयसाळाचे पवित्र भाग) युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले. यामुळे भारताची जागतिक वारसा स्थळे 42 (सांस्कृतिक-34, नैसर्गिक- 7, मिश्र -1) वर पोहोचली आहेत, ज्यामुळे युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत असलेल्या सर्वाधिक स्थळांच्या बाबतीत भारताला सहाव्या स्थानावर आणले आहे.
2023 मध्ये, ग्वाल्हेर आणि कोझिकोड यांचा अनुक्रमे संगीत आणि साहित्यातील सर्जनशील शहरे म्हणून युनेस्को सर्जनशील शहरांच्या यादीत समावेश करण्यात आला.
‘गुजरातचा गरबा’ हा युनेस्कोच्या मानवतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाच्या प्रतिनिधी यादीत समाविष्ट करण्यात आला आहे.
भारतीय कला, वास्तुकला आणि डिझाईन बिएनाले 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर आयोजित पहिल्या भारतीय कला, वास्तुकला आणि डिझाइन बिएनाले (आयएएडीबी) 2023 चे उद्घाटन केले. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी ‘आत्मनिर्भर भारत डिझाईन केंद्र’ आणि विद्यार्थी बिएनाले-समुन्नतीचे उद्घाटन केले. पंतप्रधानांच्या हस्ते स्मारक तिकीटही जारी करण्यात आले. भारतीय कला, वास्तुकला आणि डिझाईन बिएनाले हे दिल्लीतील सांस्कृतिक क्षेत्राचा परिचय म्हणून काम करेल.
इतर महत्त्वाचे कार्यक्रम /उपक्रम:
- 11 ते 19 फेब्रुवारी 2023 या कालावधीत मुंबईत राष्ट्रीय संस्कृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. प्रख्यात शास्त्रीय कलाकार, चित्रपट कलाकार, ट्रान्सजेंडर आणि दिव्यांग कलाकारांसह 300 हून अधिक लोक आणि आदिवासी कलाकारांनी रसिकांचे मनोरंजन केले आणि चित्ताकर्षक सादरीकरणाद्वारे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.
- जी 20 समारंभाचा एक भाग म्हणून, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 04.09.2023 रोजी गांधी दर्शन, राजघाट, नवी दिल्ली येथे महात्मा गांधींच्या 12 फूट पुतळ्याचे अनावरण केले.
- 18 जून 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील परीक्षक मंडळाने एकमताने गीता प्रेस, गोरखपूरची 2021 सालासाठी गांधी शांतता पुरस्कार प्राप्तकर्ता म्हणून निवड करण्याचा निर्णय घेतला.अहिंसक आणि इतर गांधीवादी पद्धतींद्वारे सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनासाठी त्यांच्या या संस्थेने उत्कृष्ट योगदान दिले आहे.
* * *
S.Tupe/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1993041)
Visitor Counter : 114