माहिती आणि प्रसारण मंत्रालय

विकसित भारत संकल्प यात्रेने देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचून अनेकांच्या जीवनाला स्पर्श करत लाखो नागरिकांना दिले बळ


1.64 कोटी नागरिकांनी आयुष्मान भारत आरोग्य सुरक्षा योजनेचा घेतला लाभ

पीएम उज्ज्वला योजनेंतर्गत 9.47 लाखांहून अधिक नोंदणी

माय भारत' अंतर्गत 27.31 लाख तरुणांची नोंदणी

Posted On: 03 JAN 2024 9:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 3 जानेवारी 2024

भारत सरकारने सुरू केलेल्या विविध कल्याणकारी योजनांबद्दल विविध कार्यक्रमांच्या  माध्यमातून जनजागृती करण्यासाठी आणि त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेने वेग घेतला असून त्याला देशभर मोठा प्रतिसाद मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 नोव्हेंबर 2023 रोजी झारखंड मधील खुंटी येथून या यात्रेला हिरवा झेंडा दाखवला होता, आणि त्याच वेळी देशभरातील विविध ठिकाणांहून माहिती, शिक्षण आणि संवाद (IEC) प्रसारित करणाऱ्या अनेक व्हॅन (गाड्या) रवाना झाल्या होत्या. 25 जानेवारी 2024 पर्यंत, देशभरातील 2.60 लाख ग्रामपंचायती आणि 4000 हून अधिक शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना भेट देण्याचे यात्रेचे उद्दिष्ट आहे.

विकसित भारत संकल्प यात्रा संपूर्ण भारतात जनजागृती करत आहे

सरकारच्या कल्याणकारी योजनांबाबत जनजागृती करत ही यात्रा देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत  पोहोचली आहे. हा उपक्रम हे सुनिश्चित करतो की, केंद्रसरकारचे  सामाजिक कल्याणाचे कार्यक्रम देशातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत, अत्यंत दुर्गम भागातही पोहोचतील.  
यात्रेचा भाग म्हणून, लाभार्थ्यांना पीएम उज्ज्वला योजना नावनोंदणी, माय भारत स्वयंसेवक नोंदणी, आयुष्मान कार्डचे वितरण यासह इतर सुविधांचे प्रत्यक्ष वितरण केले जात आहे. यात्रेदरम्यान, विविध शासकीय योजनांमध्ये नागरिकांनी लक्षणीय सहभाग नोंदवला. यात्रेच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना त्यांचे हक्क बजावण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

यात्रेदरम्यान, प्रधानमंत्री उज्ज्वला योजने (PMUY) अंतर्गत 9.47 लाखांहून अधिक लोकांना स्वच्छ स्वयंपाकाचे इंधन उपलब्ध करून देण्यात आले, आणि या कुटुंबांना स्वयंपाकघरातील धुरापासून मुक्ती मिळाली. 1.64 कोटी आयुष्मान कार्डचे वितरण नागरिकांना वर्षाला प्रति कुटुंब रु. 5 लाखाचे आरोग्य कवच सुनिश्चित करते. यात्रेचा एक भाग म्हणून, 18.15 लाखांहून अधिक नागरिकांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने (PMSBY) अंतर्गत अपघात विमा प्रदान करण्यात आला.
      
10.86 लाखांहून अधिक व्यक्तींनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा (PMJJBY) लाभ घेतला असून, ही योजना जीवन विमा प्रदान करते. या दोन्ही योजना भारतात आर्थिक समावेशाला चालना देत आहेत.

याव्यतिरिक्त, यात्रेदरम्यान 6.79 लाखांहून अधिक रस्त्यावरील विक्रेत्यांना पंतप्रधान फेरीवाले  आत्मानिर्भर निधी (PM SVANidhi) अंतर्गत खेळते भांडवली कर्ज देण्यात आले. ‘माय भारत’ ला चांगला प्रतिसाद देत, 27.31 लाखांहून अधिक तरुणांनी आपली नोंदणी केली, ज्यामधून विकसित भारत संकल्प यात्रेच्या चौकटीत युवा पिढीच्या सहभागाची नवी लाट विशेष दिसून दिसते.


संदर्भ:

R.Aghor/R.Agashe/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1992925) Visitor Counter : 158