आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
राष्ट्रीय सिकल सेल ऍनेमिया निर्मूलन अभियानाने ओलांडला महत्त्वाचा टप्पा- सिकल सेल आजाराच्या तपासणीसाठी 1 कोटीहून अधिक व्यक्तींच्या चाचण्या
Posted On:
02 JAN 2024 8:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 2 जानेवारी 2024
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महत्त्वाचा टप्पा ओलांडला आहे. राष्ट्रीय सिकल सेल ऍनेमिया निर्मूलन अभियानाअंतर्गत सिकल सेल आजाराच्या तपासणीसाठी देशभरात 1 कोटीहून अधिक व्यक्तींची चाचणी करण्यात आली आहे.
या अभियानाअंतर्गत 3 वर्षांच्या काळात, 7 कोटी लोकांची चाचणी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. सिकल सेल आजार हा रक्ताचा जनुकीय आजार असून तो रुग्णाचे संपूर्ण आयुष्य प्रभावित करतो. हा आजार भारतातील आदिवासी बहुल भागात अधिक प्रमाणात आढळतो. मात्र कधीकधी बिगर आदिवासी भागात देखील त्याचा प्रभाव जाणवतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक 1 जुलै 2023 रोजी मध्य प्रदेशातील शाहडोल येथे राष्ट्रीय सिकल सेल ऍनेमिया निर्मूलन अभियानाची सुरुवात करण्यात आली. आता भारतातील आदिवासी बहुल आणि इतर आजार प्रवण राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांमध्ये सिकल सेल ऍनेमिया या आजाराची चाचणी, प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी युध्दपातळीवर हे अभियान राबवण्यात येत आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, झारखंड, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, ओदिशा, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक, आसाम, उत्तरप्रदेश, केरळ, बिहार आणि उत्तराखंड या 17 राज्यांमधील 278 जिल्ह्यांवर या आजाराच्या अधिक प्रमाणातील प्रसारासाठी लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.
* * *
S.Patil/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1992525)
Visitor Counter : 141