कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय

2023 वर्ष अखेर आढावा: कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय


कारागिरांना आधार देण्यासाठी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 13,000 कोटी रुपयांची 'पीएम विश्वकर्मा योजना' सुरू केली

कौशल्य विकास आणि नोकऱ्यांसाठी स्किल इंडिया डिजिटल मंच सुरु केला

IIT कानपूर, HAL आणि DASI सोबत तीन महत्त्वाच्या भागीदाऱ्यांसह इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स, या भारतीय कौशल्य संस्थेची स्थापना करण्यात आली

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (PMKVY) अंतर्गत 2015 पासून, सुमारे 1.40 कोटी उमेदवारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे

इंडस्ट्री (उद्योग) 4.0 नुसार नवीन युगातील 16 प्रकारचे व्यापार उदीम सुरु करण्यात आले

8.5 लाखाहून अधिक प्रशिक्षणार्थींसाठी 12 ऑक्टोबर 2023 रोजी, राष्ट्रीय, राज्य आणि ITI स्तरावरील 14000 हून अधिक ITI (उद्योग प्रशिक्षण संस्था) करता 2 रा कौशल्य दीक्षांत समारोह आयोजित

33 NSTIs अर्थात राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था(19 केवळ महिलांसाठी आहेत) आणि 3 विस्तार केंद्रे कार्यरत

भारतातील प्रशिक्षण मानके जागतिक तोडीची बनवण्यासाठी इंडिया स्किल्स 2023-24 स्पर्धा

Posted On: 26 DEC 2023 5:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 डिसेंबर 2023

 

औद्योगिक प्रशिक्षण संस्थां (ITIs) ची पुनर्रचना आणि पुनर्आकलनासाठी प्रशिक्षण महासंचालनालय: स्वातंत्र्यपूर्व काळापासून कौशल्य प्रशिक्षणामध्ये भक्कम समानता बाळगली आहे.

  • 2014 मध्ये, 10119 संस्था स्थापन करण्यात आल्या आणि तेव्हापासून आणखी 4621 संस्थांची भर घालण्यात आली. त्यामुळे 2022 मध्ये एकूण संख्या 14953 झाली. ही 47.77% ची वाढ आहे.
  • 2021-2023 या सत्रासाठी 25 लाखांहून अधिक जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.  2014 पासून 5 लाखांहून अधिक जागांची भर घालण्यात आली. एकूण आसनक्षमतेत 25% वाढ झाली.
  • प्रशिक्षकांची  17175 एवढी आसन क्षमता (पदे) आजतागायत निर्माण केली आहेत.  2014 पासून 5710 जागांची भर घातली आहे. एकूण क्षमतेत 49.8% वाढ झाली.
  • आजपर्यंत 223 अभ्यासक्रम सुरू केले आहेत (150-CTS, 55-CITS, 14- STT आणि 04 ॲडव्हान्स्ड डिप्लोमा अर्थात अद्ययावत पदविका अभ्यासक्रम).  2014 पासून 61 अभ्यासक्रमांची भर.
  • 2015 मध्ये 3 विस्तार केंद्रांसह राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था (NSTIs) उघडण्यात आल्या. एकूण 33 NSTIs आहेत, त्यापैकी 19 केवळ महिलांसाठी आहेत आणि 3 विस्तार केंद्रे आता कार्यरत आहेत.
  • Flexi MoU योजने अंतर्गत,मार्च 2019 मध्ये जारी केलेल्या सुधारित योजना मार्गदर्शक तत्त्वांनुसार  सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत, Flexi MoU योजनेअंतर्गत 13 सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्यात आली आहे.
  • अग्निवीरांनी त्यांच्या प्रशिक्षण आणि सेवेदरम्यान आत्मसात केलेल्या कौशल्यानुसार, त्यांना कौशल्य प्रमाणपत्र देण्यासाठी, DGT(डायरेक्टोरेट जनरल ऑफ ट्रेनिंग अर्थात प्रशिक्षण महासंचालनालय) ने 26 डिसेंबर 2022 रोजी DGT च्या Flexi-MoU योजने अंतर्गत, भूदल, नौदल आणि वायुदलासोबत सामंजस्य करार केले. , सशस्त्र दलातून बाहेर पडल्यानंतर, अग्निवीरांना त्यांच्या सेवेदरम्यानच्या पात्रता आणि अनुभवात्मक शिक्षणाच्या आधारावर कौशल्य प्रमाणपत्रे प्रदान केली जातील; 4 वर्षांच्या सेवेनंतर या अग्निवीरांना उद्योगांमध्ये रोजगाराच्या संधी मिळतील याची हमी! अग्निवीर सेवेचे खालीलप्रकारे भाग असतील:
  1. मूलभूत लष्करी प्रशिक्षण
  2. व्यापार प्रशिक्षण
  3. सुरक्षा प्रशिक्षण
  4. सेवा/ओजेटी अर्थात ऑन जॉब ट्रेनिंग म्हणजेच नोकरीदरम्यान प्रशिक्षण
  • उद्योजकता अभ्यासक्रमांसाठी 21 NSTI ची,  NIESBUD केंद्रे म्हणून नोंदणी करण्यात आली आहे आणि उच्च शिक्षण तसेच पदवी प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठी प्रमाणन म्हणून,33 NSTIs (आणि 2 विस्तार केंद्रे) ची, NIOS आणि IGNOU केंद्रे म्हणून नोंदणी करण्यात आली आहे.
  • व्यावसायिक कौशल्यविकासात महिलांचा सहभाग वाढवण्यासाठी, CITS/ CTS अंतर्गत महिला उमेदवारांसाठी, सन 2023-24 पासून शिकवणी आणि परीक्षाशुल्कात सवलत मंजूर करण्यात आली आहे.
  • PMKVY कौशल्य केंद्र उपक्रमा अंतर्गत STT: प्रधानमंत्री कौशल्य विकास योजने (PMKVY) आणि स्किल हब इनिशिएटिव्ह-कौशल्य केंद्र उपक्रम (SHI)अंतर्गत  राष्ट्रीय कौशल्य पात्रता आराखडा (NSQF) स्तर 5, 6 आणि 7 वरील अभ्यासक्रम चालवण्यासाठी, सर्व 33 राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्था (NSTIs) आणि 2 विस्तार केंद्रांकरता प्रशिक्षण केंद्र आणि प्रशिक्षण प्रदाता आयडी तयार केले गेले आहेत. हे अभ्यासक्रम, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून (ITI) उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी आणि प्रशिक्षकांसाठी अपस्किलिंग/री-स्किलिंग म्हणजेच कौशल्य वाढ/कौशल्य पुनर्विकास अभ्यासक्रम म्हणून काम करतात.  सुमारे 700 उमेदवारांनी नोंदणी केली असून 78 प्रशिक्षणार्थींचे प्रशिक्षण सुरू होते.
  • DGT ने सत्र 2022 मध्ये 116 ITI आणि सत्र 2023 मध्ये 32 ITI संस्थांना, आय टी आय मध्ये ड्रोन-संबंधित अभ्यासक्रम चालवण्याची परवानगी दिली आहे.
  • DGT ने 8.5 लाखाहून अधिक प्रशिक्षणार्थींसाठी 12 ऑक्टोबर 2023 रोजी, राष्ट्रीय, राज्य आणि ITI स्तरावरील 14000 हून अधिक ITI करता 2 रा कौशल्य दीक्षांत समारोह आयोजित केला. केंद्रीय कौशल्य विकास तसेच उद्योजकता मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी दूरदृष्य प्रणाली द्वारे संबोधित केले. 
  • क्लाउड कॉम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग यांसारख्या नवीन तंत्रज्ञानातील प्रशिक्षणासाठी खालील IT उद्योगांसह DGT च्या सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या .
    1. मायक्रोसॉफ्ट इंडिया,
    2. वाधवानी फाउंडेशन 
    3. ॲमेझॉन वेब सिरीज 
    4. इ टी एस इंडिया
  • 2014 मध्ये, 10119 संस्थांची स्थापना करण्यात आली आणि तेव्हापासून 4897 संस्थांची भर पडली. यामुळे 2023 मध्ये एकूण संख्या 15016 झाली. ही 48.39% ची वाढ आहे.
  • 2021-2023 च्या सत्रांसाठी 25 लाखांहून जास्त जागांची भर पडली.  2014 पासून 5 लाख जागांची भर पडली. एकूण आसन क्षमता 25% ने वाढली.
  • आजपर्यंत प्रशिक्षकांची 17175 आसन क्षमता(पदे) उपलब्ध करून दिली आहे.  2014 पासून 5710 जागांची भर पडली. एकूण क्षमतेत 49.8% वाढ झाली.
  • आजपर्यंत 226 अभ्यासक्रम सुरू केले आहेत (153-CTS, 55-CITS, 14- STT आणि 04 ॲडव्हान्स्ड डिप्लोमा अर्थात अद्ययावत पदविका अभ्यासक्रम).  2014 पासून 61 अभ्यासक्रमांची भर.

अल्पमुदतीचे प्रशिक्षण (शॉर्ट टर्म ट्रेनिंग-STT)

  • स्किल इंडिया मिशन या कौशल्य भारत मोहिमे अंतर्गत, MSDE ने 15 जुलै 2015 रोजी आपली प्रमुख योजना, प्रधान मंत्री कौशल्य विकास योजना (PMKVY) सुरु केली.
  • 2015 पासून, 13 डिसेंबर 2023 पर्यंत स्किल इंडिया डिजिटलनुसार, PMKVY अंतर्गत सुमारे 1.40 कोटी उमेदवारांना प्रशिक्षित/अवगत केले गेले आहे.
  • नियुक्तीची हमी असलेल्या अल्प-मुदतीच्या प्रशिक्षणा अंतर्गत, 42% उमेदवारांना देशभरातील विविध क्षेत्रांमध्ये नियुक्त करण्यात आले.  (म्हणजे, STT मध्ये उत्तीर्ण 57.42 लाख उमेदवारांपैकी 24.39 लाख उमेदवारांना नियुक्ती मिळाली).
  • PMKVY 4.0 (आर्थिक वर्ष 2023-26) ची घोषणा गेल्या 2023-24 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात, लाखो तरुणांना कौशल्य निर्माण करण्याच्या आणि इंडस्ट्री 4.0, ए आय, रोबोटिक्स, मेकॅट्रॉनिक्स,आय ओ टी आणि ड्रोन या अभ्यासक्रमांमध्ये प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने करण्यात आली होती.
  • 13 डिसेंबर 2023 पर्यंत एकूण 6,62,750 उमेदवारांची नोंदणी झाली असून त्यापैकी 3,42,500 उमेदवारांनी त्यांचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
  • PMKVY 4.0 ची विस्तृत रचना तत्त्वे, खालीलप्रमाणे आहेत:
  1. उच्च रोजगारक्षमतेसह 210 तासांपर्यंतच्या कालावधीचे मागणीबरहुकूम रोजगाराभिमुख अभ्यासक्रम  
  2. स्किल हब अर्थात कौशल्य केंद्र या नावानिशी  शैक्षणिक संस्थांची भागीदारी वाढवून व्यावसायिक आणि शैक्षणिक संस्थांना एकत्र आणणे आणि दर्जेदार प्रशिक्षण प्रदात्यांचे जाळे वाढवणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.
  3. PMKVY अंतर्गत अल्प-मुदतीचे प्रशिक्षण देण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधांसह, केंद्र आणि राज्य सरकारी शाळा, उच्च शैक्षणिक संस्था (HEI), महाविद्यालये आणि विद्यापीठांमध्ये (कौशल्य विद्यापीठांसह) कौशल्य केंद्रे स्थापन केली जाऊ शकतात.
  4. शैक्षणिक संस्था, सरकारी संस्था, PMKKs, ITIs, JSSs, IITs, IIM आणि इतर संस्थांमधील स्किल इंडिया केंद्रांद्वारे कौशल्य प्रशिक्षण दिले जात आहे.
  5. इंडस्ट्री 4.0, वेब 3.0, AI/ML, AR/VR, ड्रोन टेक्नॉलॉजी इ.शी संबंधित फ्युचरिस्टिक/न्यू एज जॉब अर्थात भविष्यकालीन/नव्या युगातील रोजगारांमधील कौशल्यविकासावर भर दिला जात आहे.
  6. उद्योगाच्या मागणीनुसार,जिल्हा कौशल्य विकास आराखड्यात मोठ्या प्रमाणात स्थान निश्चिती केलेले कौशल्य अभ्यासक्रम निवडले जातील.
  7. कृषी, हस्तकला आणि उच्च श्रेणीच्या अभ्यासक्रमांमधील ठरवलेली क्षेत्रे आणि गटांसाठी विशेष प्रकल्प.
  8. स्किल इंडिया डिजिटल म्हणजे एकच नावनोंदणी करण्याची पद्धत असेल आणि उमेदवार प्रशिक्षण प्रक्रियेचे चक्र पूर्ण करण्यासाठी  एक मंच प्रदान करेल

पीएम विश्वकर्मा योजना

देशातील कारागिरांच्या  उत्थानाचे कार्य करणे,  यासाठी  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक  प्राधान्य दिले  आहे.  कोणतीही गोष्‍ट घडविण्‍यामध्‍ये – कौशल्यामध्‍ये 'विश्वकर्मा’ ची महत्त्वपूर्ण भूमिका ओळखून, अशा कारागिरांच्या   कामाची गुणवत्ता आणि सुलभता वाढविण्यासाठी 13,000 कोटी रुपयांची 'पीएम विश्वकर्मा योजना' सुरू केली. हा उपक्रम कारागिरांना तंत्रज्ञानाने सुसज्ज करणारा आहे.त्यांना देशांतर्गत आणि जागतिक मूल्य साखळीत समेकित करण्याचे उद्दिष्ट ठेवून आधुनिक बाजारपेठेमध्‍ये  कौशल्य वाढीसाठी सर्वसमावेशक समर्थन प्रदान करतो.

अंतिमत: या  योजनेमुळे  लाभार्थी कारागिरांचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न केला जात आहे.  तसेच  त्यांना शाश्वत उपजीविका संधी मिळावी आणि त्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी आवश्यक साधने आणि संधी प्रदान करते.

सध्‍या18 प्रकारच्या कारागिरांना  या योजनेत सहभागी करून घेतले आहे.

(1) सुतार; (2) नावा- होड्या बनवणारा; (3) चिलखत बनवणारा  (4) लोहार; (5) हातोडी  आणि इतर साधन संच बनविणारे कारागिर; (6) कुलूप आणि  कुलूपाच्या किल्ल्या बनविणारे (7) सोनार; (8) कुंभार; (9) शिल्पकार (मूर्तिकर, दगडी कोरीव काम करणारा), दगड फोडणारा; (10) मोची- चर्मकार / चपला/ पादत्राणे कारागीर; (11) मिस्त्री  (राजमिस्त्री); (12)टोपल्या /चटई/झाडू तयार करणारे /काथ्‍या  विणकर; (13) बाहुली आणि खेळणी तयार करणारे (पारंपारिक); (14) न्हावी ; (15 ) फुलांचे  हार बनवणारे (16) धोबी, परीट; (17) शिंपी; आणि (18) मासे पकडण्‍यासाठी लागणारी जाळे विणकर.

कौशल्य भारत डिजिटलचा प्रारंभ

स्किल इंडिया डिजिटल (एसआयडी) म्हणजेच कौशल्य भारत  डिजिटलचा  कौशल्य आणि नोकऱ्यांवर केंद्रित असलेला एक अभिनव डिजिटल मंच  आहे. त्याला  ‘इंडिया स्टॅक ग्लोबल’च्या  मजबूत चौकटीचा लाभ मिळत  आहे. यामध्‍ये  उच्च दर्जाची सुरक्षा आणि ‘स्केलेबिलिटी’  सुनिश्चित  केली जाते.

याशिवाय, स्किल इंडिया डिजिटल कौशल्य योजना, ईश्रम/ईपीएओ /एनसीएस, शिक्षण, उद्योग, आधार, डिजीलॉकर, गतिशक्ती, उमंग, अॅग्रीस्टॅक, पीएलआय योजना, ओडीओपी  आणि उच्च आर्थिक निर्देशक, जीएसटीएन, ईपीएफओ सारख्या विविध सरकारी उपक्रमांना एकत्रित करून अभिसरणाला प्रोत्साहन देते. याचबरोबर  आयात कल /निर्यात कल  यांचे होणारे अभिसरण यामुळे कौशल्य, क्रेडिट आणि बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर  प्रवेश सुलभ करते.

उद्योग 4.0 ला संरेखित करणा-या बाजारामध्‍ये असलेली मागणी लक्षात घेवून त्याप्रमाणे कौशल्य विकास

आत्तापर्यंत, देशातील तरुणांसाठी नजिकच्या  भविष्यामध्‍ये  विविध  146 विषयांमध्‍ये पात्रता अभ्यासक्रम व्हावेत यासाठी कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाने आधीच मान्यता दिली आहे.  प्रिसिजन अॅग्रिकल्चर म्हणजेच कृषी अचूकता , प्रेडिक्टिव मेंटेनन्स – भविष्‍यात काय घडू शकेल याचा अंदाज बांधून त्याप्रमाणे आवश्‍यक दुरूस्ती, सिम्युलेशन टेक्नॉलॉजी म्हणजे नक्कल करणारे तंत्रज्ञान, डेटा अॅनालिसिस म्हणजे विदा विश्‍लेषण,  टेलिमेडिसिन म्हणजे दूरध्‍वनीच्या माध्‍यमातून वैद्यकीय सल्ला देणे आणि   इतर अनेक क्षेत्रांमध्‍ये -उद्योग 4.0 मध्ये सरकार पात्रता विकसित करण्यासाठी चालना देत आहे.

2014 पासून राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (एनएसडीसी) अंतर्गत 32700 पेक्षा अधिक  केंद्रे उघडण्यात आली आहेत.

आजपर्यंत एकूण 2.14 कोटींपेक्षा जास्त उमेदवार प्रशिक्षित झाले आहेत. 2014-नोव्हेंबर 2023 दरम्यान 1.96 कोटींपेक्षा अधिकजण  प्रशिक्षित.

कौशल्य आणि प्रशिक्षण पायाभूत सुविधा आणि खेळत्या भांडवलाच्या गरजा निर्माण करण्यासाठी कर्ज, समभाग  आणि अनुदानाच्या माध्यमातून 350 पेक्षा जास्त भागीदारांना सवलतीच्या व्याज दराने 1873 कोटी रूपयांपेक्षा जास्त   आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते. जून 2014 ते नोव्हेंबर 2023 दरम्यान 1209 कोटी रूपयांपेक्षा जास्त निधी  वितरित केला.

शिकाऊ प्रशिक्षण

शिकाऊ प्रशिक्षणाला प्रोत्साहन देणे : कौशल्य विकास घडवून आणण्‍यासाठी  सर्वात शाश्‍वत मार्गांपैकी हा  एक आहे.

  • सध्या, देशभरातील विविध आस्थापनांमध्ये सुमारे 7.09 लाख प्रशिक्षणार्थी कार्यरत आहेत.
  • 29 नोव्हेंबर 2023 पर्यंत 24,74,714 शिकाऊ उमेदवारांची नोंदणी झाली.
  • अप्रेंटिसशिप पोर्टलवर (www.apprenticeshipindia.gov.in) 1,82,057  आस्थापनांची नोंदणी झाली आहे.
  • अशी अपेक्षा आहे की, प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत आस्थापनेद्वारे चालू आर्थिक वर्षात, 15 लाख  प्रशिक्षणार्थींना  विविध प्रकारच्या प्रशिक्षणामध्‍ये गुंतवणे शक्य होईल.
  • पदव्युत्तर कार्यक्रमामध्‍ये  6-12 महिन्यांचे नोकरीच्या स्थानी  प्रशिक्षण दिले जाते.
  • बीटीपी , एनएपीएस मार्गदर्शक तत्त्वे, पर्यायी व्यापारी अभ्‍यासक्रम यांचे तर्कसंगतीकरण केले, तसेच  परीक्षा आणि पोर्टल प्रक्रियांमध्ये प्रमुख प्रशिक्षणार्थी सुधारणा करण्यात आल्या. त्यासाठी  अकरा कार्यालयीन निवेदने देण्यात आली  आहेत.
  • आत्तापर्यंत 9,25,260 लाख शिकाऊ उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण झाले.
  • जुलै 2022 पासून पथदर्शक डीबीटी सुरू आहे. आजपर्यंत 35.02 कोटी रूपयांचे  2.41 लाखाहून अधिक डीबीटी व्यवहार झाले.
  • पॅन इंडिया डीबीटी  11 ऑगस्ट 2023 पासून अंमलबजावणी सुरू केली. डीबीटी द्वारे 117.59 कोटी रूपये वितरित केले गेले.

उद्योजकतेला प्रोत्साहन देणे

  • ‘NIESBUD’  ने देशभरात आपला ठसा वाढवण्यासाठी NSTIs येथे 21 विस्तार केंद्रे स्थापन केली आहेत.
  • "शिक्षण ते उद्योजकता: विद्यार्थी, शिक्षक आणि उद्योजकांच्या पिढीचे सक्षमीकरण" यासाठी शिक्षण मंत्रालय, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय आणि ‘मेटा’  यांच्यामध्‍ये  3 वर्षांची भागीदारी केली आहे. 

इच्छुक आणि विद्यमान उद्योजकांना हाताळण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी ऑनलाइन ई-मार्गदर्शक प्लॅटफॉर्म “उद्यमदिशा” सुरू केला आहे.  ऑनलाइन मार्गदर्शन सेवा सुलभ करण्यासाठी, हा मंच  विकसित केला आहे.

उपजीविका संवर्धनासाठी कौशल्य संपादन आणि ज्ञान जागृती (संकल्प)

  • आजीविका प्रोत्साहनासाठी कौशल्य संपादन आणि ज्ञान जागरुकता (संकल्प) कार्यक्रम जानेवारी 2018 मध्ये सुरू करण्यात आला होता, ज्यामुळे संरचनात्मक सुधारणांना समर्थन आणि कौशल्य विकासाचे संचालन, व्यवस्थापन आणि देखरेख करणार्‍या एकंदर प्रणालींना बळकट करण्यासाठी, राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर दोन्ही स्तरांवर. तीन प्रमुख परिणाम क्षेत्रे (RAs) कार्यक्रमांतर्गत संकल्पना करण्यात आली, खाली दिल्याप्रमाणे:
  1. परिणाम क्षेत्र 1 - उच्च दर्जाच्या विपणनाशी  संबंधित प्रशिक्षणाचे नियोजन, वितरण आणि देखरेख यासाठी राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर संस्थात्मक बळकटीकरण.
  2. परिणाम क्षेत्र 2 - कौशल्य विकास कार्यक्रमांची सुधारित गुणवत्ता आणि बाजारपेठेची  प्रासंगिकता
  3. परिणाम क्षेत्र 3 - महिला प्रशिक्षणार्थी आणि इतर वंचित गटांसाठी कौशल्य प्रशिक्षणात सुधारित प्रवेश आणि पूर्ण करणे

खाली संकल्प कार्यक्रमाच्या संबंधित परिणाम क्षेत्रांतर्गत प्रमुख कामगिरीची यादी आहे:

पुरस्कारांच्या शेवटच्या आवृत्तीत, 476 जिल्ह्यांतील डीएसडीपीचे मूल्यमापन करण्यात आले, यापैकी 30 जिल्हे निवडण्यात आले आणि  त्यामधील  8 जिल्ह्यांना 'उत्कृष्टता पुरस्कार'दिले, 13 जिल्ह्यांना 'उत्कृष्टता प्रमाणपत्र', आणि 9 जिल्ह्यांना 'प्रशंसा पत्र' देवून सन्मानित करण्यात आले. 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत, एकूण 748 डीएससींचे संस्थात्मकीकरण करण्यात आले आहे आणि 711 जिल्हे ‘डिस्पाक पोर्टलवर ऑनबोर्ड’  करण्यात आले आहेत. आर्थिक वर्ष 22-23 साठी एकूण 691 डीएसडीपी जिल्ह्यांनी संकल्प पोर्टलवर सादर केले आहेत.

हा उपक्रम संकल्प कार्यक्रमांतर्गत स्वयं-सहायता समूह (एसएचजी) आणि तृतियपंथातील  4,500 महिलांना व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रमाणित करणार आहे. आजपर्यंत या प्रकल्पांतर्गत 2, 842 महिलांची नोंदणी झाली असून 31 महिलांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत, एकूण 4,468 महिलांना प्रशिक्षित करण्यात आले आहे आणि 2738 महिलांना या प्रकल्पाअंतर्गत प्रमाणित करण्यात आले आहे.

इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स कानपूर:

इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ स्किल्स (आयआयएस) कानपूरने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, (आयआयटी) कानपूर आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) आणि Dassault Aircraft Services India Pvt Ltd. (DASI) सोबत एमएसडीई च्या उद्देशाने संरेखित केलेल्या तीन महत्त्वाच्या भागीदारीची घोषणा केली, यामुळे  विशेषत: उत्तर प्रदेशमधील संरक्षण औद्योगिक कॉरिडॉरला पाठिंबा देण्यासाठी स्थानिक तरुणांना एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रासाठी सक्षम करणे आणि तयार करणे शक्य होणार आहे.

इंडिया स्किल्स 2023-24

इंडिया स्किल्स 2023-24 - संपूर्ण भारतामधून लाखो इच्छुकांच्या सहभागाची अपेक्षा असलेली ही स्पर्धा आहे.  या प्रतिष्ठित कार्यक्रमामुळे  असंख्य कौशल्ये देण्‍याचा  करण्याचा प्रयत्न केला जातो, ज्यामुळे व्यक्तींना अनेक संधींनी  भरलेल्या भविष्याची कल्पना करता येते.

इंडिया स्किल्स स्पर्धेची रचना आणि प्रशिक्षण मानांकन  जागतिक बेंचमार्कसह संरेखित करण्यासाठी, विविध उद्योगांशी समन्वय वाढवण्यासाठी केली  आहे. यातील विजेत्यांना 2024 मध्ये फ्रान्समधील लियॉन येथे होणाऱ्या जागतिक कौशल्य स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळू शकणार आहे.  अंतिम पुरस्कार जिंकण्‍यासाठी सर्व सहभागीतांना   जिल्हा, राज्य, क्षेत्रीय आणि राष्ट्रीय अशा अनेक स्तरांवर कठोर निवड प्रक्रियेतून सामोरे जावे लागेल.

 

* * *

NM/Ashutosh/Suvarna/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1992350) Visitor Counter : 125