अर्थ मंत्रालय

वित्त मंत्रालयाचा वार्षिक आढावा 2023: गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग (डीआयपीएएम)

Posted On: 27 DEC 2023 11:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 डिसेंबर 2023

 

वर्ष 2023 मध्ये, गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग (DIPAM) ने मूल्य निर्मिती, धोरणात्मक निर्गुंतवणूक आणि सातत्यपूर्ण आर्थिक नियोजन यासाठी दृढ वचनबद्धता दर्शवली.

वर्ष 2023 मधील मुख्य ठळक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमात (सीपीएसई) मूल्य निर्मितीवर भर देण्यात आला. जानेवारी 2021 मध्ये नवीन पीएसई धोरण लागू झाल्यापासून, एनएसई सीपीएसीई आणि बीएसई सीपीएसई निर्देशांकांनी निर्धारित टप्पा ओलांडला आहे, जे नोव्हेंबर 2023 पर्यंत अनुक्रमे 160.49% आणि 128.66% परतावा दर्शवितात.

इनिशियल पब्लिक ऑफरिंग्ज (आयपीओ) च्या क्षेत्रात, डीआयपीएएम ने भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास संस्थेसाठी (आयआरईडीए) आयपीओ यशस्वीपणे सुरू केले.

सीपीईसी मधील समभाग विक्रीसाठी सरकारने ऑफर फॉर सेल (ओएफएस) मार्गाचा सक्रियपणे पाठपुरावा केला आहे.

एचएएल, कोल इंडिया लिमिटेड, आरव्हीएनएल, इसजेव्हीएन लिमिटेड आणि हुडको सारख्या सीपीएसई मधील उल्लेखनीय व्यवहारांनी एकत्रितपणे 10,860.91 कोटी रुपयांची कमाई केली आहे. गुंतवणुकदारांच्या भांडवली नफ्यामध्ये योगदान देत, सामील समभागांनी सामान्यत ओएफएस नंतरच्या वाढीचा अनुभव घेतला.

डीआयपीएएम ने गेल्या काही वर्षांमध्ये सातत्यपूर्ण लाभांश धोरण देखील लागू केले आहे, ज्यामध्ये सीपीएसई द्वारे आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये सुधारित अंदाजांना मागे टाकत एकूण 59,533 कोटी रुपयांची उल्लेखनीय लाभांश प्राप्ती झाली आहे. चालू आर्थिक वर्षात सरकारला 4 डिसेंबर 2023 पर्यंत सीपीएसई कडून लाभांश पावत्यानुसार  26,644 कोटी रुपये मिळाल्याचे निदर्शनास आले आहे.

तसेच, डीआयपीएएम सक्रियपणे आयडीबीआय बँक लिमिटेड, पीडीआयएल, एचएलएल लाइफ केअर लिमिटेड, एनएमडीसी स्टील लिमिटेड, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि बीईएमएल लिमिटेड यासारख्या संस्थांमध्ये धोरणात्मक निर्गुंतवणुकीचा पाठपुरावा करत आहे.

वर्ष 2023 मध्ये वित्त मंत्रालयाच्या गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाच्या (डीआयपीएएम) काही प्रमुख यशस्वी कामगिरी पुढीलप्रमाणे आहेत:

 

केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (सीपीएसई) मध्ये मूल्य निर्मिती

  • समतोल भांडवल व्यवस्थापन धोरणाद्वारे CPSEs मध्ये मूल्य निर्मितीला प्राधान्य दिले जाते आणि मूल्य घट न होता योग्य किमतीत आणि योग्य वेळी निर्गुंतवणूक व्यवहारांचे नियोजन केले जाते.
  • जानेवारी 2021 मध्ये नवीन पीएसई धोरण जाहीर झाल्यापासून, निफ्टी 50 आणि मुंबई शेअर बाजार निर्देशांकाने अनुक्रमे 44.00% आणि 40.29% ची वाढ नोंदवली आहे, तर एनएसई सीपीएसीई आणि बीएसई सीपीएसई निर्देशांकांनी नोव्हेंबर, 2023 पर्यंत अनुक्रमे 160.49% आणि 160.28% च्या परताव्यासह मोठ्या फरकाने कामगिरी केली आहे.

 

इनिशिअल पब्लिक ऑफर (आयपीओ)

  • सीसीईए ने 17.03.2023 रोजी भारतीय नवीकरणीय ऊर्जा विकास संस्थेच्या (आयआरईडीए) च्या इनिशियल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ) साठी मान्यता दिली.
  • आयआरईडीए या सरकार-संचालित बिगर -बँकिंग वित्तीय कंपनी (एनबीएफसी) चा आयपीओ 21.11.2023 रोजी सुरू करण्यात आला.
  • आयआरईडीए 29.11.2023 रोजी शेअर बाजारात यशस्वीरित्या सूचीबद्ध झाली.
  • आयआरईडीए आयपीओ सह, सरकारला निर्गुंतवणूक पावती म्हणून 858.36 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत.
  • कंपनीने 15% नवीन समभाग जारी करून अंदाजे 1290 कोटी रुपये वसूल केले आहेत.

 

विक्रीसाठी ऑफर (ओएफएस)

  • सरकारने ऑफर फॉर सेल (ओएफएस) मार्गाद्वारे सीपीएसई मधील समभाग विक्री सुरू ठेवली आहे.
  • जानेवारी 2023 पासून, एचएएल, कोल इंडिया लिमिटेड, आरव्हीएनएल, एसजीव्हीएन लिमिटेड आणि हुडको मध्ये ओएफएस व्यवहार केले गेले आणि सरकारला या व्यवहारांद्वारे 10,860.91 कोटी रुपये (एचएएल- रु. 2,910.39 कोटी, कोल इंडिया- रु. 4,185.69 कोटी, आरव्हीएनएल 1,365.61 कोटी, आणि एसजीव्हीएन- रु. 1,349.27 कोटी, हुडको रु. 1,049.95 कोटी) प्राप्त झाले आहेत.
  • समभागांमध्ये साधारणपणे ओएफएस नंतर तेजीचा कल दिसून आला, ज्यामुळे गुंतवणूकदारांच्या भांडवली नफ्यात भर पडली.

 

सातत्यपूर्ण लाभांश धोरणाची अंमलबजावणी

  • डीआयपीएएम ने नोव्हेंबर 2020 मध्ये सातत्यपूर्ण लाभांश धोरणाबाबत मार्गदर्शक सूचना जारी केली.
  • केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांद्वारे (सीपीएसई) लाभांश अदा करण्यात गेल्या 3 वर्षांमध्ये सुधारणा झाली आहे.
  • S. आर्थिक वर्ष 2020-21, आर्थिक वर्ष 2021-22 आणि आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये सीपीएसई कडून एकूण लाभांश प्राप्ती अनुक्रमे 39,750 कोटी रुपये, 59,294 कोटी रुपये आणि 59,533 कोटी रुपये होती जी अनुक्रमे 34,717 कोटी रुपये, 46,000 कोटी रुपये आणि 43,000 कोटी रुपये या सुधारित अंदाजापेक्षा (आरई) जास्त आहे.
  • चालू आर्थिक वर्षात सरकारला 04.12.2023 रोजी सीपीएसई कडून लाभांश पावत्या म्हणून 26,644 कोटी रुपये कमाई झाली आहे.

 

धोरणात्मक निर्गुंतवणूक

चालू व्यवहारांसाठी, आयडीबीआय बँक लिमिटेड, पीडीआयएल, एचएलएल लाईफ केअर लिमिटेड, एनएमडीसी स्टील लिमिटेड, शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया आणि बीईएमएल लिमिटेड च्या धोरणात्मक निर्गुंतवणुकीसाठी स्वारस्य व्यक्त करण्यात आले.

 

* * *

S.Patil/V.Joshi/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1992206) Visitor Counter : 61