पंतप्रधान कार्यालय
सर्वाधिक लोकांनी एकाच वेळी 108 ठिकाणांवर सूर्यनमस्कार करण्याचा जागतिक विक्रम केल्याबद्दल पंतप्रधानांनी गुजरातचे केले अभिनंदन
Posted On:
01 JAN 2024 3:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जानेवारी 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सर्वाधिक लोकांनी एकाच वेळी 108 ठिकाणांवर सूर्यनमस्कार करण्याचा जागतिक विक्रम केल्याबद्दल गुजरातचे अभिनंदन केले.
सूर्यनमस्काराचे नानाविध फायदे असल्यामुळे प्रत्येकाने सूर्यनमस्काराला आपल्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनवावा असे आवाहनही त्यांनी केले.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:
"गुजरातने 2024 चे स्वागत एका उल्लेखनीय उपक्रमाने केले, तो म्हणजे - सर्वाधिक लोकांनी एकाच वेळी 108 ठिकाणांवर सूर्यनमस्कार करण्याचा गिनीज जागतिक विक्रम प्रस्थापित करणे! आपल्या सर्वांना माहीत आहेच की, 108 क्रमांकाचे आपल्या संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. या स्थळांमध्ये मोढेरा सूर्य मंदीराचाही समावेश आहे. येथील कार्यक्रमात अनेक लोक सामील झाले होते. योग आणि आपल्या सांस्कृतिक वारशाच्या जतनासाठी आमच्या वचनबद्धतेचा हा खरा पुरावा आहे.
मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की मौलिक फायदे असलेल्या सूर्यनमस्काराला तुमच्या दिनचर्येचा भाग बनवा.”
* * *
S.Patil/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1992105)
Read this release in:
Telugu
,
Malayalam
,
Assamese
,
Odia
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Kannada