संरक्षण मंत्रालय
एव्हीएसएम, व्हीएसएम व्हाइस अॅडमिरल बी शिवकुमार यांनी स्वीकारला युद्धनौका उत्पादन आणि अधिग्रहण नियंत्रक म्हणून कार्यभार
Posted On:
01 JAN 2024 3:24PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 जानेवारी 2024
अतिविशिष्ट सेवा पदक, विशिष्ट सेवा पदक प्राप्त व्हाइस अॅडमिरल बी शिवकुमार यांनी 01 जानेवारी 24 रोजी युद्धनौका उत्पादन आणि अधिग्रहण नियंत्रक म्हणून कार्यभार स्वीकारला. राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे माजी विद्यार्थी (70 वा अभ्यासक्रम), असलेल्या शिवकुमार यांना 01 जुलै 1987 रोजी भारतीय नौदलात विद्युत अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांनी आयआयटी चेन्नईमधून अभियांत्रिकी आणि उस्मानिया विद्यापीठातून व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. या फ्लॅग ऑफिसरनी नौदल आणि कमांड मुख्यालय, डॉकयार्ड आणि प्रशिक्षण आस्थापना येथील कर्मचारी आणि सामग्री शाखेत विविध महत्त्वाची पदे भूषवली आहेत.

या फ्लॅग ऑफिसरनी रणजीत, किरपाण आणि अक्षय यांसारख्या युद्धासाठी तैनात जहाजांवर विविध स्तरावर जबाबदारी पेलली आहे आणि आयएनएस वालसुराची धुरा सांभाळली आहे. त्यांच्या विशिष्ट सेवेसाठी ते अति विशिष्ट सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदक प्राप्तकर्ते आहेत. युद्धनौका उत्पादन आणि अधिग्रहण नियंत्रक म्हणून नियुक्ती होण्यापूर्वी, त्यांनी नवी दिल्लीतील एटीव्हीपी मुख्यालयाचे कार्यक्रम संचालक, नौदल मुख्यालयात सामग्री सहाय्यक प्रमुख (IT&S), ऍडमिरल सुपेरिटेंडंट डॉकयार्ड (मुंबई) आणि मुख्य कर्मचारी अधिकारी (तांत्रिक)/ पश्चिम नौदल कमांड मुख्यालयात सेवा बजावली आहे.
* * *
S.Patil/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1992097)
Visitor Counter : 181