सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

दिव्यांगजन सक्षमीकरण मंत्रालय (सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय ) 2023 वर्षाअखेर आढावा


दिव्यांगजन सक्षमीकरण-2023 साठी राष्ट्रीय पुरस्कारांचे राष्ट्रपतींच्या हस्ते वितरण

दिव्यांगत्व क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामधील सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी

मध्य प्रदेशात दिव्यांग जनांसाठी असलेल्या देशातील पहिल्या हायटेक क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

केंद्रीय मंत्री डॉक्टर विरेंद्र कुमार यांनी एक कोटींवे युडीआयडी कार्ड दिले

डॉक्टर विरेंद्र कुमार यांनी भारतात तयार झालेला बुद्ध्यांक तपासणी संच देशाला अर्पण केला

सामाजिक न्याय सक्षमीकरण मंत्रालयाने एनडीएफडीसी कर्ज योजनेअंतर्गत कर्ज घेणाऱ्या दिव्यांगजनांना व्याज दरात एक टक्का सवलत केली घोषित

भारताचा पहिला सर्वसमावेशकता उत्सव, पर्पल फेस्ट गोव्यात सुरू

दिव्य कला मेळाव्यात भारतभरातील बुद्धिमत्ता आणि कलाकृती यांचे प्रदर्शन

दिव्यांग जन सक्षमीकरण विभागाने विविध दिव्यांग जागरूकता दिन केले साजरे

जागतिक सांकेतिक भाषा दिनी 10,000 श्रवण दोष असणाऱ्यांसाठी आयएसएल डिक्शनरीमधील नोंदी तसंच व्हिडिओ प्रसारण सेवा, व्हाट्सअप माध्यमातून व्हिडिओ कॉल यांचा आरंभ केला यामध्ये भारतीय सांकेतिक भाषातील 260 संकेत आहेत

एटीपी( एडीआयपी) योजने मधून 1582 कॅम्प साठी एकूण 368.5 कोटी रुपये मदत दिली गेली ज्याचा लाभ 2 लाख 91 हजार लाभार्थ्यांना मिळाला

Posted On: 27 DEC 2023 11:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 डिसेंबर 2023

 

दिव्यांगजनांच्या  विकासासाठी आवश्यक असणारे सहकार्य तसेच त्यांना उत्पादनक्षम, सुरक्षित आणि प्रतिष्ठित जीवन प्रत्यक्षात आणता यावे आणि सर्वसमावेशक समाज उभारता यावा याकरिता असलेली दिव्यांग सक्षमता मंत्रालयाची बांधिलकी दिसून येते. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या अखत्यारीत मे 2012 मध्ये स्थापना करण्यात आलेला दिव्यांगजन विभाग नेहमीच दिव्यांग जनांच्या सक्षमतेसाठी आणि सर्वसमावेशकतेसाठी कार्यशील राहिला आहे. या विभागाच्या बहुमुखी दृष्टीमुळे हा विभाग दिव्यांगत्वाला अटकाव,  त्याचे वेळेवर निदान, त्यांना सांभाळून घेणे, शिक्षण आरोग्य व्यावसायिक शिक्षण पुनर्वसन सामाजिक अभिसरण ह्या बाबतीत काम करत आला आहे. दिव्यांग जनांचे सक्षमीकरण अभियान हे दिव्यांगांना विविध कृती, संस्था, संघटना, आणि योजना यांच्यामार्फत समान संधी मिळून त्यांच्या हक्कांचे रक्षण आणि समाजाचे स्वतंत्र आणि उत्पादनक्षम सदस्य म्हणून सक्रिय सहभाग या गोष्टी पार पाडण्यासाठी योग्य ते वातावरण निर्माण करतात.

दिव्यांग जन सक्षमीकरण विभागाची मुख्य कामगिरी:

दिव्यांग जन सक्षमीकरण विभागाने 2023 मध्ये दिव्यांग जणांची समावेशकता आणि सक्षमता याबाबतीत महत्त्वाची भूमिका पार पाडत  अनेक दमदार कामगिरी केल्या.

दहा हजारांपेक्षा जास्त दिव्यांग ,  शंभराहून अधिक ट्रान्सजेंडर्स यांची उपस्थिती असलेला पर्पल फेस्ट हा भारताचा पहिला समावेशकतेचा उत्सव गोव्यात पार पाडला. राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन झालेल्या या उत्सवातून विभागाने दिव्यांगांचे प्रति जागरूकता आणि संवेदना यांची जोपासना मुख्य प्रवाहात आणली. यामध्ये केली गेलेली महत्त्वाची उल्लेखनीय कामे म्हणजे एबिलिएम्पिकमधील विजेत्यांचा सत्कार, एक करोड वे आधार कार्ड देणे.  RPwDA कायदा 2016 हा दिव्यांगांसाठी सुगम मापदंड स्थापित करणारा कायदा लागू केला.  कर्णबधिरांसाठीचा अभ्यासक्रम नाविन्यपूर्ण पद्धतीने सादर करण्यासाठी ISLRT आणि NIOS  यांची भागीदारी.  दिव्यांग जन सक्षमता विभागाने अनेक आमुलाग्र बदल करणारे कार्यक्रम हाती घेतले. याशिवाय भारतीय नवोद्योजकता विकास संस्था  यांच्याबरोबर भागीदारी सुरू केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिव्यांगांसाठीच्या देशातील पहिल्या हायटेक क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन झाले.

1. राष्ट्रपती भवनातील अमृत उद्यान येथे दिव्यांग जनांसाठी विशेष कार्यक्रम :

राष्ट्रपती भवनात अमृत उद्यान येथे सर्व समावेशकतेचा विशेष कार्यक्रम पार पडला यासाठी राष्ट्रपतींनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत दहा हजार दिव्यांग जन आणि शंभराहून अधिक ट्रान्सजेंडर उपस्थित होते. राष्ट्रपतींचे संवाद हा दिव्यांग जनांना सुखावून गेला. त्याबरोबरच देशाच्या विविध रंगी स्वरुपाच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे आपलेपणाचे आणि स्व-ओळख निर्माण करणारे कार्यक्रम आखण्याची गरज अधोरेखित होते.

2. भारताचा पहिला सर्वसमावेशकतेचा उत्सव पर्पल फेस्ट गोव्यात उत्साहाने सुरू झाला. केंद्रीय मंत्री डॉक्टर विरेंद्र कुमार यांनी दिव्यांग जणांच्या सक्षमीकरणाशी संबंधित घटकांवर दोन दिवसांची कार्यशाळा घेतली :

पर्पल फेस्ट या विविधतेच्या पहिलाच उत्सवाच्या माध्यमातून  भारताचा सर्वसमावेशकतेचा ऐतिहासिक प्रवास सुरू झाला. या कार्यक्रमादरम्यान गोव्यात 6 जानेवारी 2023 रोजी भव्य महोत्सवात केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री वीरेंद्र कुमार यांनी दोन दिवसांच्या संवेदना कार्यशाळेमध्ये दिव्यांग जणांच्या सक्षमीकरणासाठी संबंधित घटक आणि त्यांचा पर्पल फेस्टिवलची संबंध यावर संबोधित केले. सरकारी संस्था, गैरसरकारी संघटना आणि कॉर्पोरेट क्षेत्राला सर्वसमावेशक समाजाच्या निर्मितीत त्यांची मुख्य सहभागामागील भूमिका दिव्यांग जणांना पाठीशी उभे राहण्यासाठी सहकार्याचा संदेश दिला.

4. सर्जनशीलता सशक्त करणे: दिव्य कला मेळावा 2023 द्वारे संपूर्ण भारतातील प्रतिभा आणि हस्तकला प्रदर्शित केले गेले.

दिल्ली, मुंबई, भोपाळ, गुवाहाटी, इंदूर, वाराणसी, जयपूर, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई आणि पाटणा येथे वर्षभर वेगवेगळ्या तारखांना आयोजित केलेला दिव्य कला मेळावा 2023 हा सर्वांगीण विकास आणि सक्षमीकरणाला चालना देण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे. दिव्यांग व्यक्तींसाठी पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमाशी निगडीत दृष्टीकोनातून,  भारताच्या सर्वांगीण विकासामध्ये दिव्यांग व्यक्तींचा समान सहभाग सुनिश्चित करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

5. दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण विभाग 2023 मध्ये विविध दिव्यांग जनजागृती दिवस साजरे केले गेले. :

4 जानेवारी रोजी जागतिक ब्रेल दिवसापासून ते 3 डिसेंबर 2023 रोजी दिव्यांग व्यक्तींच्या आंतरराष्ट्रीय दिवसापर्यंतच्या कालखंडात महत्त्वाचे कार्यक्रम आयोजित केले गेले होते. या उत्सवांमध्ये जागतिक कुष्ठरोग दिन, आंतरराष्ट्रीय अपस्मार दिन, जागतिक डाउन सिंड्रोम दिन आणि अशा अनेक दिनांचा समावेश होता. दिव्यांगत्वच्या विविधतेवर प्रकाश टाकणे आणि जागरूकता वाढवणे हा यामागचा उद्देश होता.

14. दिव्य कला शक्ती कार्यक्रमातून दिव्यांग कलाकारांच्या क्षमतांचे प्रदर्शन केले गेले.

पोस्ट केलेले: 27 मे 2023

वाराणसी दिव्य कला शक्ती कार्यक्रम 27 मे 2023 रोजी आयोजित करण्यात आला होता आणि आगामी दिव्य कला शक्ती कार्यक्रम जानेवारी आणि फेब्रुवारी 2024 मध्ये बंगळुरू (06 जानेवारी 2024), अहमदाबाद (1 जानेवारी 2024), इंदूर (05 जानेवारी 2024) आणि हैदराबाद (07 फेब्रुवारी, 2024) येथे होणार आहेत.

17. दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण विभागाने दिव्यांग व्यक्तींना सक्षम करण्यासाठी परिवर्तनात्मक कार्यक्रम सुरु केले / दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण विभागाने दिव्यांग व्यक्तींना सक्षम बनवण्यासाठी कार्यक्रमात

 पाच नाविन्यपूर्ण पुढाकारांचा समावेश  केला होता.

18. भारतीय उद्योजकता विकास संस्थेने (EDII), दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागाच्या (DPEwD) सहकार्याने कॉर्पोरेट कंपन्यांची सामाजिक जबाबदारी अंतर्गत (CSR) अंतर्गत दिव्यांग व्यक्तींसाठी 'समर्थन, सक्रिय आणि खात्रीशीर उपजीविका (SABAL) तयार करण्यासाठी कॉर्पोरेटसाठी गोलमेज बैठक आयोजित केली होती.

19. जागतिक सांकेतिक भाषा दिनानिमित्त 23 सप्टेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे भारतीय सांकेतिक भाषेतील 260 आर्थिक संकल्पनांसह WhatsApp व्हिडिओ कॉलद्वारे 10,000  भारतीय सांकेतिक भाषा शब्दकोश संकल्पना आणि व्हिडिओ रिले सेवा सुरू करण्यात आली.

20. महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिव्यांगजनांसाठी देशातील पहिल्या उच्च तंत्रज्ञान क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन केले.

21. दिव्यांग व्यक्तींचे सक्षमीकरण विभाग आणि नीती आयोग यांनी संयुक्तपणे 3 नोव्हेंबर 2023 रोजी "भारतीय विमा क्षेत्राची वाढ आणि दिव्यांग व्यक्तींचा समावेश करणे" या विषयावर एक ऐतिहासिक परिषद आयोजित केली. या कार्यक्रमाने विविध भागधारकांना एकत्र आणले. भारतातील दिव्यांग व्यक्तींसाठी (दिव्यांगजन) सुधारित विमा संरक्षणाची तीव्र गरज पूर्ण करणे हा यामागचा उद्देश होता.

23. दिव्यांगजनांमध्ये आर्थिक समावेशकता वाढवण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी, दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागाने (एनडीएफडीसी) कर्जाअंतर्गत दिव्यांगजन कर्जदारांना वेळेवर परतफेड करण्यासाठी 1% व्याजदरात सूट जाहीर केली आहे. विशिष्ट अटी व शर्तींच्या अधीन राहून/ दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागाचे सचिव यांनी 8 दिव्यांग कर्ज लाभार्थ्यांना धनादेश देखील सुपूर्द केले.

26. नवी दिल्ली येथे दिव्यांग व्यक्ती आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमात, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विविध क्षेत्रातील त्यांच्या असामान्य योगदानाची दखल घेऊन 21 व्यक्ती आणि 9 संस्थांना दिव्यांगजन 2023 च्या सक्षमीकरणासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केले.

28. भारतीय कृत्रिम अवयव निर्मिती महामंडळ (एलिम्को) दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरण विभागाच्या अधिपत्याखाली, 2022-23 या आर्थिक वर्षात 482 कोटी रुपयांची अभूतपूर्व उलाढाल झाली,  जी आजपर्यंतची सर्वात मोठी आकडेवारी असलेली उलाढाल आहे. विविध सरकारी योजना आणि  कॉर्पोरेट कंपन्यांची सामाजिक जबाबदारी उपक्रमांद्वारे 3.47 लाखांहून अधिक दिव्यांगजन आणि ज्येष्ठ नागरिकांची सेवा करण्याचे महामंडळाचे समर्पणाचे कार्य उल्लेखनीय आहे. अलिम्कोचा पुढाकाराने प्रधान मंत्री दिव्याशा केंद्र (पीएमडीके) पात्र लाभार्थ्यांना मोफत सहाय्य, साधने आणि उपकरणे प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहे, यापैकी 46 केंद्रे आधीच स्थापित आहेत.

29. 1 जानेवारी 2023 ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत एटीडी (एडीआयपी) योजनेंतर्गत महत्त्वपूर्ण यश प्राप्त झाले. या कालावधीत, आयोजित केलेल्या 1,582 शिबिरांमधून एकूण 368.05 कोटी रुपयांचे अनुदान वाटप करण्यात आले. याचा लाभ 2.91 लाख लाभार्थ्यांना झाला. 12,845 मोटार लावलेल्या ट्रायसायकलचे वितरण गतिशीलता सुधारण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण प्रगती दर्शवते. 151 हॉस्पिटल्सच्या पॅनेलमेंटमुळे 1,742 कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण झाल्या, त्यापैकी 1,691 एडीआयपी अंतर्गत आणि 51 सीएसआर उपक्रमांतर्गत होत्या. येथे हे उल्लेखनीय आहे की 14 जानेवारी 2023 रोजी आयोजित केलेल्या 65 शिबिरांमधून 50,000 हून अधिक दिव्यांग व्यक्तींना मदत आणि सहाय्यक उपकरणांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर 25 मार्च 2023 रोजी 17 शिबिरे आयोजित करण्यात आली, जिथे 13,500 हून अधिक दिव्यांग व्यक्तींपर्यंत पोहोचले. 25 सप्टेंबर 2023 रोजी 72 शिबिरे आयोजित करण्यात आली होती ज्याच्या 35,000 हून अधिक लोकांनी लाभ घेतला. त्याचप्रमाणे 25 नोव्हेंबर 2023 रोजी 20 शिबिरांच्या माध्यमातून 54,000 हून अधिक दिव्यांगांना मदत करण्यात आली. हे सर्वसमावेशक सक्षमीकरणासाठी दिव्यांग व्यक्ती सक्षमीकरण विभागाची प्रशंसनीय वचनबद्धता दर्शवते.


N.Meshram/V.Sahjrao/G.Deoda/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 1991310) Visitor Counter : 354