सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय

वार्षिक आढावा 2023 : सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय


सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाकडून विविध आंतरराष्ट्रीय सांख्यिकी मंचांवर भारताचे प्रतिनिधित्व

संयुक्त राष्ट्रांच्या सांख्यिकी आयोगात (युएनएससी) भारताची सदस्य म्हणून चार वर्षांसाठी निवड

युनएनएससीच्या माध्यमातून मंत्रालयाने, अधिकृत सांख्यिकी कार्यात, आंतरराष्ट्रीय मानके, संकल्पना आणि पद्धती निश्चित करण्यात बजावली महत्वाची भूमिका

सांख्यिकी मंत्रालयाने, सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय मानकांच्या बरोबरीने, कमी कालावधीत मासिक आकडेवारी/सांख्यिकी निर्देशक केले प्रकाशित

सर्वेक्षण करतांना, जलद पडताळणी आणि सुधारित डेटा गुणवत्ता मिळवण्यासाठी, संगणक आधारित वैयक्तिक मुलाखती पद्धतीचा अवलंब

तंत्रज्ञानातील सुधारणेमुळे, तिमाही नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षणासह, इतर सर्वेक्षणाच्या निकालाच्या वेळी, प्रत्यक्ष काम झाल्यानंतर होणारा विलंब, नऊ महिन्यांवरुन 2 -3 महिन्यांपर्यंत कमी करण्यात झाली मदत

एन. ए. एस./जी. डी. पी., सी. पी. आय., पी. एल. एफ. एस. आणि आय. आय. पी. शी संबंधित डेटा व्हिज्युअलायझेशन विभाग (माहितीचा अंदाज बांधणारा) प्रथमच मंत्रालयाच्या संकेतस्थळावर जोडला गेला

वापरकर्ते आणि भागधारकांसाठी, डेटा वापरकर्त्यांची परिषद आयोजित, या परिषदेत अध्ययन, उद्योग, माध्यम आणि संशोधक क्षेत्रातील तज्ञांची उपस्थिती

एमपीएलएडी योजनांच्या सुधारित मार्गदर्शक सूचना जारी, तसेच या योजनेअंतर्गत सुधारित निधी वितरण प्रक्रियेच्या अंमलबजावणीसाठी नव्या वेब -पोर्टलच्या सुरुवात

वायू आणि जल गुणवत्तेसह, कचरा निर्मिती आणि विघटन, जैव विविधता आणि भूमीवापर,हरित वायू उत्सर्जन आणि ऊर्जा वापर अशा पर्यावरणाशी संबंधित विस्तृत विषयांवर सांख्यिकी अहवाल प्रसिद्ध

Posted On: 18 DEC 2023 11:20PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 18 डिसेंबर 2023

 

बहुराष्ट्रीय संस्थांसोबत सहकार्य आणि समन्वय

सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय, विविध आंतरराष्ट्रीय सांख्यिकी मंचांवर  भारताचे प्रतिनिधित्व करत असते. भारतीय सांख्यिकी मंत्रालयाची यथोचित ओळख लक्षात घेऊन,दोन दशकांच्या गळतीनंतर, संयुक्त राष्ट्रांच्या सांख्यिकी आयोगावर सदस्य म्हणून, एक जानेवारी 2024 पासून चार वर्षांसाठी निवड करण्यात आली आहे. संयुक्त राष्ट्र सांख्यिकी आयोगाच्या  माध्यमातून, सांख्यिकी मंत्रालयाने, अधिकृत सांख्यिकी व्यवस्थेत आंतरराष्ट्रीय मानके, संकल्पना आणि पद्धती निश्चित करण्यात महत्वाचे योगदान दिले आहे.

याव्यतिरिक्त, भारताची 2022-2024 या कालावधीसाठी (अ) संयुक्त राष्ट्रांच्या सांख्यिकी ईएससीएपी समितीच्या (सीएसटी) ब्युरोच्या तीन उपाध्यक्षांपैकी एक आणि (ब) आशिया आणि पॅसिफिकसाठीच्या सांख्यिकी संस्थेच्या (एसआयएपी) गव्हर्निंग कौन्सिलमध्ये पुन्हा निवड झाली होती.

काही महत्त्वाच्या सांख्यिकीय उत्पादनांचे मानांकन

सांख्यिकी मंत्रालयाने ने इतर राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयांनी अनुसरलेल्या सर्वोत्तम पद्धतींसह काही महत्त्वाच्या सांख्यिकी उत्पादनांचे मानांकन केले. सी. पी. आय. आणि आय. आय. पी. सारख्या विविध मासिक डेटा/सांख्यिकीय निर्देशक सांख्यिकी मंत्रालयाद्वारे प्रकाशित केले जातात, ज्यात किमान संभाव्य कालावधी, सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय मानकांच्या बरोबरीचा असतो. एन. ए. एस./जी. डी. पी. च्या तिमाही तसेच वार्षिक अंदाजांसाठीही हीच मानके लागू आहेत.

संगणक आधारित वैयक्तिक मुलाखती (CAPI)

पद्धतशीर सुधारणा आणि माहिती वेळेवर प्रकाशित करण्यासाठी सांख्यिकी मंत्रालयाने, डेटा संकलन आणि पुढच्या प्रक्रियेसाठी आधुनिक माहिती तंत्रज्ञान साधनांचा वापर सुरू केला  जात आहे. याचाच एक भाग म्हणून, सध्या सुरू असलेल्या सर्व सर्वेक्षणात, आता डेटा गोळा करण्याच्या  विविध टप्प्यांवर डेटा पडताळणीसाठी इन-बिल्ट कॉम्प्युटर स्क्रूटनी पॉईंट्स (सीएसपी) असलेल्या, संगणक आधारित मुलाखती घेतल्या जातात.  यात एकाच वेळी डेटा प्रक्रिया  सुनिश्चित करणारे क्लाऊड आधारित डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. ह्या सर्वेक्षणात, अध्यायनाचे निकाल प्रकाशित करण्यास, आधी लागणाऱ्या वेळेपेक्षा जलद प्रमाणीकरण आणि सुधारित डेटा गुणवत्ता मिळणे सुलभ झाले आहे.

तंत्रज्ञानात झालेल्या सुधारणेमुळे, सर्वेक्षणाचे निष्कर्ष, ज्यात नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षणाचे तिमाही निष्कर्ष जारी करण्यासाठी, प्रत्यक्ष आकडेवारी आणि माहिती संकलनाचे काम पूर्ण होण्यासाठी आधी लागणारा नऊ महिन्यांचा वेळ आता 2 ते 3 महिन्यांपर्यंत  कमी झाला आहे. तसेच,  (नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण अहवाल) पीएलएफएस 2021-22 च्या वार्षिक अहवालासाठी सर्वेक्षण संपल्यानंतरचा वेळ देखील आठ महिन्यांवरुन तीन महिन्यांपर्यंत कमी झाला आहे.

डेटा व्हीज्यूअलायझेशन

मंत्रालयाने,  विविध वापरकर्त्यांच्या अभिप्रायाच्या आधारे, आपल्या संकेतस्थळाचे आधुनिकीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचाच भाग म्हणून, एमओएसपीआयच्या संकेतस्थळावर प्रथमच डेटा व्हिज्युअलायझेशन विभाग जोडण्यात आला आहे. सुरुवातीला या विभागात एम. ओ. एस. पी. आय. च्या चार डेटाबेसेसशी संबंधित दृश्ये आहेत. एन. ए. एस/जी. डी. पी., सी. पी. आय. (ग्रामीण, शहरी, एकत्रित) पी. एल. एफ. एस. आणि आय. आय. पी. या अनुभवासह, आम्ही इतर संबंधित मंत्रालये/विभागांची माहिती एकत्रित करण्यासाठी व्याप्ती आणि आवाका वाढवला जात आहे.  डेटा वापरकर्त्यांच्या परिषदेत सहभागी मान्यवरांनी  संकेतस्थळावरच्या या वैशिष्ट्यांचे कौतुक केले.

डेटा वापरकर्त्यांच्या परिषदा:

ऑक्टोबर 2022 पासून, सांख्यिकी मंत्रालयाने वापरकर्ते आणि भागधारकांसाठी तीन डेटा वापरकर्ते परिषदा आयोजित केल्या आहेत. सुरुवातीला, सांख्यिकी मंत्रालयाने राष्ट्रीय लेखा सांख्यिकीची परिषद घेतली होती.  ज्यात शैक्षणिक, उद्योग, माध्यमे, संशोधन इत्यादींमधील तज्ञ उपस्थित होते. सहभागींनी या उपक्रमाचे कौतुक केले.

एम. पी. एल. ए. डी. वर सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी करणे आणि नवीन वेब-पोर्टल सुरू करणे

सांख्यिकी मंत्रालय, संसद सदस्य स्थानिक क्षेत्र विकास योजना (एमपी. एलएडीएस.) चालवते, ही योजना, संसद सदस्यांच्या मतदारसंघातील स्थानिक गरजांच्या आधारे शाश्वत सामुदायिक मालमत्ता निर्माण करण्यावर भर देत, विकासात्मक स्वरूपाच्या कामांची शिफारस करते. ही योजना एक एप्रिल 2023 पासून सुधारित स्वरूपात लागू असून मार्गदर्शक तत्त्वांच्या संचाद्वारे नियंत्रित केली जाते.

निधी प्रवाह प्रक्रिया राबवण्यासाठी मंत्रालयाने एक वेब पोर्टल सुरू केले आहे. नवीन वेब-पोर्टलमध्ये संसद सदस्यांसाठीच्या विकास प्रकल्पाचे संपूर्ण जीवनचक्र आणि ऑनलाइन कामाची शिफारस, ऑनलाइन मंजुरी/नकार, डॅशबोर्ड, अलर्ट जनरेशन, स्वयंचलित वापर/पूर्णता प्रमाणपत्र निर्मिती, विक्रेत्यांना पैसे देणे यासारख्या ऑनलाइन देखरेख प्रणालीचा समावेश असलेल्या अनेक तंत्रज्ञान-सक्षम कार्यांचा समावेश आहे. या नवीन प्रणालीमुळे डिजिटल इंडियाच्या धर्तीवर सांसद एलएडीएस योजनेचे कामकाज, अंमलबजावणी आणि देखरेखीमध्ये अधिक सुधारणा झाल्या आहेत.

नीती आयोगाचा डेटा गव्हर्नन्स गुणवत्ता निर्देशांक (DGQI)

नीती आयोगाच्या चालू आवृत्तीत, म्हणजे आर्थिक वर्ष 2022-23/ची चौथी तिमाही मध्ये, सांख्यिकी मंत्रालयाचे गुण, आधीच्या आवृत्तीतील  4.08 या (2021-22/Q4) गुणांच्या तुलनेत, 4.27 गुणांपर्यंत वाढले आहे. महत्वाची मंत्रालये/विभागांच्या यादीत, सांख्यिकी मंत्रालय दुसऱ्या स्थानी आहे.

स्वच्छता पंधरवडा :

सांख्यिकी मंत्रालयाने, 1 जुलै ते 15 जुलै 2023 पर्यंत विशेष स्वच्छता पंधरवडा साजरा केला. या पंधरवड्यात स्वच्छतेशी संबंधित विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते, ज्यात कार्यशाळा, मुलांसाठी विविध प्रकारच्या स्पर्धा, आरोग्य शिबिरे, पथनाट्ये, रॅली, स्वच्छता जागरूकता मोहिमा इत्यादींचा समावेश होता. मंत्रालयाच्या कार्यालयांव्यतिरिक्त देशभरातील विविध शाळा, रुग्णालये, अनाथाश्रम, बाजारपेठा, औद्योगिक क्षेत्रे आणि गावांमध्ये स्वच्छता मोहीम साजरी केली गेली.

स्त्री पुरुष आकडेवारी

मंत्रालयाने मार्च 2023 मध्ये "धोरण निर्मितीमध्ये स्त्री-पुरुष सांख्यिकीची भूमिका" या विषयावर चर्चासत्र आयोजित केले होते.आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या स्मरणार्थ 15.03.2023 रोजी 'वुमन अँड मेन इन इंडिया 2022' या शीर्षकाच्या प्रकाशनाचा 24 वा अंक प्रकाशित करण्यात आला. हे प्रकाशन एक सर्वसमावेशक आणि अंतर्दृष्टी असलेले महत्वाचे दस्तऐवज ठरले. यातून आपल्याला महिला आणि पुरुषांच्या विविध गटांमधील विषमता समजून घेण्यास मदत होते.

पर्यावरणीय सांख्यिकी

एनव्हीस्टॅट्स इंडिया 2023 खंड' चे प्रकाशन करण्यात आले. यात,  हवा आणि पाण्याची गुणवत्ता, कचरा निर्मिती आणि त्याचे विघटन, जैवविविधता आणि जमीनीचा वापर, हरितगृह वायू उत्सर्जन आणि ऊर्जेचा वापर यासह विविध विषयांचा समावेश असलेला 'पर्यावरण सांख्यिकी अहवाल' 31.03.2023 रोजी प्रकाशित करण्यात आला आहे. "Envistats India Vol.II: Environment Accounts" चे प्रकाशन 29 सप्टेंबर 2023 रोजी करण्यात आले.

https://www.mospi.gov.in/sites/default/files/reports_and_publication/statistical_publication/EnviStats/Complete_ES1_2023_Vol1.pdf

https://www.mospi.gov.in/sites/default/files/reports_and_publication/statistical_publication/EnviStats/ES_Vol_II_2023.pdf

 

शाश्वत विकासाची उद्दिष्टे राष्ट्रीय निर्देशक आराखडा (NIF)

सांख्यिकी मंत्रालयाने, 22 फेब्रुवारी 2023 रोजी "एसडीजी राष्ट्रीय निर्देशकांसाठी मैलाचा टप्पा ठरवण्यावर चर्चा आणि अद्याप ज्यावर विचार झालेला नाही अशा  शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांसाठी राष्ट्रीय निर्देशकांची ओळख" या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले होते. 2030 पर्यंत शाश्वत विकास उद्दिष्टे संयुक्त राष्ट्रांनी  निश्चित केली असल्याने, ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी केलेल्या प्रगतीवर अधिक चांगल्या प्रकारे देखरेख ठेवण्यासाठी अंतरिम कालावधीसाठी टप्पे निश्चित करण्याची विनंती संबंधित मंत्रालये आणि विभागांना करण्यात आली. पुढे, 169 उद्दिष्टांच्या तुलनेत, काही उद्दिष्टांसाठी राष्ट्रीय निर्देशक अद्याप निश्चित करणे बाकी आहे. संबंधित माहिती स्रोत संस्था/संबंधित मंत्रालये, नीती आयोग आणि एमओएसपीआयचे सुमारे 75 अधिकारी या कार्यशाळेत सहभागी झाले होते.

यावेळी  प्रकाशित केलेली प्रकाशनेः

शाश्वत विकासाची उद्दिष्टे राष्ट्रीय निदर्शक आराखडा (NIF)  प्रगती अहवाल 2023.

https://www.mospi.gov.in/sites/default/files/publication_reports/SDGs_NIF_Progress_Report_2023N_0.pdf?download=1

शाश्वत विकास उद्दिष्टे- राष्ट्रीय निर्देशक आराखडा 2023 वरील डेटा स्नॅपशॉट. 

https://www.mospi.gov.in/sites/default/files/publication_reports/DataSnapshot_on_SDGs_NIF_2023.pdf?download=1

 शाश्वत विकास उद्दिष्टे राष्ट्रीय सूचक आराखडा 2023. (अद्ययावत आवृत्ती 2022)

https://www.mospi.gov.in/sites/default/files/publication_reports/SDGs_NIF_Progress_Report_2023N_0.pdf

 

* * *

NM/R.Aghor/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1988185) Visitor Counter : 103