गृह मंत्रालय
कुवेतचे अमिर महामहीम शेख नवाफ अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांच्या निधनाबद्दल 17 डिसेंबर 2023 रोजी एक दिवसाचा राजकीय दुखवटा
प्रविष्टि तिथि:
16 DEC 2023 9:54PM by PIB Mumbai
कुवेतचे अमीर महामहिम शेख नवाफ अल-अहमद अल-जाबेर अल-सबाह यांचे 16 डिसेंबर 2023 रोजी निधन झाले. त्यांच्या सन्मानार्थ, 17 डिसेंबर 2023 रोजी संपूर्ण भारतात एक दिवसाचा राजकीय दुखवटा पाळण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे.
या दिवशी संपूर्ण भारतात ज्या इमारतींवर नियमितपणे राष्ट्रीय ध्वज फडकवला जातो त्या सर्व इमारतींवर तो अर्ध्यावर फडकवला जाईल. तसेच, या दिवशी मनोरंजनाचे कोणतेही अधिकृत शासकीय कार्यक्रम होणार नाहीत.
***
S.Kane/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1987326)
आगंतुक पटल : 187