आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

‘आयुष्मान भव’ विषयी अद्ययावत माहिती


आरोग्य शिबिरात 34 लाख आयुष्मान कार्डस तयार

40 लाखांपेक्षा अधिक आभा (आरोग्य ओळखपत्र) कार्डस वितरित

Posted On: 15 DEC 2023 4:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 15 डिसेंबर 2023

 

देशातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत, आरोग्य सुविधा पोहोचवण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेल्या अभिनव उपक्रमाअंतर्गत, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते, 13 सप्टेंबर 2023 रोजी, गुजरातच्या गांधीनगर इथून आभासी पद्धतीने, आयुष्मान भव अभियान आणि आयुष्मान भवन पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले होते.

आयुष्मान कार्डांची उपलब्धता अधिक सुलभ करण्यासाठी,  तसेच आभा (ABHA) आरोग्य ओळखपत्र तयार करण्यासाठी तसेच असंसर्गजन्य रोग, क्षयरोग आणि सिकलसेल अशा आजारांबद्दल जागरूकता  वाढवणे  आणि सरकारच्या विविध योजनांची माहिती लोकांना देण्यासाठी, 17 सप्टेंबर 2023 पासून देशाच्या विविध भागात आरोग्य मेळ्यांची सुरुवात करण्यात आली आहे. नागरिकांना सरकारच्या प्रमुख योजनांबद्दल माहिती मिळावी यासह, लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि कल्याणकारी कार्यक्रमांचे लाभ थेट लोकांपर्यंत पोहोचवणे या उद्देशाने या शिबिरांची रचना करण्यात आली आहे.

4 डिसेंबर 2023 ते 10 डिसेंबर 2023 या आठवड्यात 73,963 आयुष्मान आरोग्य मंदिर आरोग्य मेळ्यांचे आयोजन करण्यात आले असून 17 सप्टेंबर 2023 पासून या मोहिमेच्या सुरुवातीपासून एकूण 11,48,855 आयुष्मान आरोग्य मंदिर आरोग्य मेळ्यांचे आयोजन करण्यात आले. 10 डिसेंबर 2023 रोजी संपलेल्या आठवड्यात या आरोग्य शिबिरांना एकूण 8,25,14,633 लोक उपस्थित होते, तर 58,85,737 लोक या शिबिरांना उपस्थित होते.

17 सप्टेंबर 2023 पासून 16 कोटींहून अधिक (16,03,17,875) लोकांची क्षयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, तोंडाचा कर्करोग, स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग आणि मोतीबिंदू या सात प्रकारच्या आजारांची तपासणी करण्यात येत आहे. 10 डिसेंबर 2023 रोजी संपलेल्या आठवड्यात 1,12,87,779 रुग्णांनी या सात आजारांची मोफत तपासणी करण्यात आली.

सामुदायिक आरोग्य केंद्रांतर्गत (सीएचसी) आतापर्यंत 32,792 आरोग्य मेळावे पूर्ण झाले असून एकूण 1,30,39,084 लोकांची नोंद झाली आहे.

आरोग्य मेळाव्यामध्ये आतापर्यंत एकूण 34,49,204 आयुष्मान कार्ड तयार करण्यात आले आहेत, तर 10 डिसेंबर 2023 रोजी संपलेल्या आठवड्यात 27,023 कार्ड तयार करण्यात आले. तर एकूण 40,81,135 आभा (आरोग्य ओळखपत्र) कार्ड तयार करण्यात आले.

Glimpses of Ayushman Bhav Campaign organized across the country

Picture 9

Ayushman Bhav Health Mela Organized in Uttarakhand

Ayushman Bhav Health Mela organized in Madhya Pradesh

Ayushman Bhav Health Mela conducted in Maharashtra

Ayushman Bhav Health Mela conducted in Haryana

Ayushman Bhav Health Mela conducted in Karnataka

Picture 4

Ayushman Bhav Health Mela conducted in Jharkhand

Glimpses of CHC Mela

Picture 3

Picture 1

 

* * *

S.Kane/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1986718) Visitor Counter : 53