श्रम आणि रोजगार मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

ऑक्टोबर-2023 मध्ये ईएसआय योजनेअंतर्गत 17.28 लाख नवीन कामगारांची नोंदणी


नवीन नोंदण्यांमध्ये 25 वर्षापर्यंतच्या वयोगटातील तरुण कर्मचाऱ्यांची संख्या 8.25 लाख

ऑक्टोबर-2023 मध्ये ईएसआय योजनेअंतर्गत सुमारे 23,468 नवीन आस्थापनांची नोंदणी

ऑक्टोबर-2023 मध्ये ईएसआय योजना विस्तारून 51 तृतीयपंथीय (ट्रान्सजेंडर) कर्मचाऱ्यांना लाभ

Posted On: 15 DEC 2023 11:35AM by PIB Mumbai

ऑक्टोबर-2023 मध्ये ईएसआय योजनेअंतर्गत 17.28 लाख नवीन कामगारांची नोंदणी झाली असल्याची माहिती कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसीवेतनपटाच्या तात्कालिक आकडेवारीवरून मिळते.

ऑक्टोबर-2023 मध्ये ईएसआय योजनेअंतर्गत सुमारे 23,468 नवीन आस्थापनांची नोंदणी झाली आहेत्यामुळे ते कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या सामाजिक सुरक्षेच्या छत्राखाली आले असून यावरून योजनेचा विस्तार होत असल्याची खातरजमा होत आहे.

देशाच्या तरुणाईसाठी अधिक नोकऱ्या उपलब्ध झाल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होतेकारण ऑक्टोबर-2023 मध्ये भर पडलेल्या 17.28 लाख नवीन कर्मचाऱ्यांपैकी 25 वर्षापर्यंतच्या वयोगटातील तरुण कर्मचाऱ्यांची संख्या 8.25 लाख आहेनवीन नोंदण्यांपैकी बहुतांश भाग युवावर्गाने व्यापलेला असून एकूण कर्मचाऱ्यांच्या तुलनेत हे प्रमाण 47.76% इतके आहे.

वेतनपटाच्या आकडेवारीचे लिंगनिहाय विश्लेषण केले असता असे दिसून येते कीऑक्टोबर-2023 मध्ये नोंदल्या गेलेल्या स्त्री-कर्मचाऱ्यांची संख्या 3.31 लाख आहेतसेच ऑक्टोबर-2023 मध्ये एकूण 51 तृतीयपंथीय (ट्रान्सजेंडरकर्मचाऱ्यांचीही नोंदणी झाल्याचे ही आकडेवारी सांगतेसमाजाच्या प्रत्येक वर्गाला लाभ मिळवून देण्यासाठी ईएसआयसी वचनबद्ध असल्याचेच यावरून सिद्ध होते.

वेतनपटाची आकडेवारी तात्कालिक आहेकारण आकडेवारी तयार होत राहणे हा एक सातत्यपूर्ण विषय आहे.

***

NM/JaiV/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1986621) Visitor Counter : 100