कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
‘विकसित भारत संकल्प यात्रा’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सार्वजनिक सेवा वितरणाचे लोकशाहीकरण प्रतिबिंबित करत आहे- डॉ. जितेंद्र सिंह
प्रविष्टि तिथि:
14 DEC 2023 7:27PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 डिसेंबर 2023
‘विकसित भारत संकल्प यात्रा’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सार्वजनिक सेवा वितरणाचे लोकशाहीकरण प्रतिबिंबित करत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी आज केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने गेल्या 9 वर्षात जनतेच्या कल्याणासाठी अनेक महत्त्वाच्या योजना सुरू केल्या, विशेषतः यामध्ये त्या उपेक्षित घटकांवर लक्ष केंद्रित करण्यात आले ज्यांच्याकडे आधीच्या सरकारांनी दुर्लक्ष केले होते, असे ते म्हणाले.

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री, पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री, सार्वजनिक तक्रार निवारण, निवृत्तीवेतन, अणुऊर्जा आणि अंतराळ या खात्याचे मंत्री डॉ. जितेंद्र सिंह आज एका राष्ट्रीय टीव्ही परिसंवादात बोलत होते.
रांगेत असलेल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकार पोहोचत आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनिश्चित केले आहे, असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले.
सध्या सुरू असलेली “विकसित भारत संकल्प यात्रा” म्हणजे केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांच्या लाभापासून कोणीही वंचित राहणार नाही हे सुनिश्चित करण्यासाठी कोणत्याही सरकारने आतापर्यंत हाती घेतलेला कदाचित पहिलाच उपक्रम असेल, असे ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी मध्यस्थांचे उच्चाटन केले आहे आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन दिले आहे, असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी नमूद केले.
भारतीय राज्यघटनेतील 370 वे कलम रद्दबातल करण्यासंदर्भात भाष्य करताना ते म्हणाले की पंतप्रधान मोदी यांनी जम्मू आणि काश्मीरच्या जनतेला उर्वरित भारतासोबत मुख्य प्रवाहात आणण्याचा मार्ग मोकळा केला आहे.
* * *
S.Kakade/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1986430)
आगंतुक पटल : 89