पंतप्रधान कार्यालय
मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबद्दल डॉ. मोहन यादव यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबद्दल जगदीश देवरा आणि राजेंद्र शुक्ला यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
13 DEC 2023 3:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 डिसेंबर 2023
डॉ. मोहन यादव यांनी मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून जगदीश देवरा आणि राजेंद्र शुक्ला यांनी शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचेही अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X समाज माध्यमावर पोस्ट केले आहे:
“देशाच्या हृदय स्थानी असलेल्या मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्या बद्दल डॉ. मोहन यादव यांचे आणि उपमुख्यमंत्री जगदीश देवरा आणि राजेंद्र शुक्ला यांचे हार्दिक अभिनंदन! तुमच्या नेतृत्वाखाली राज्यातील डबल इंजिन सरकार दुप्पट जोमाने काम करेल आणि विकासाचा नवा आयाम निर्माण करेल, असा मला विश्वास आहे. या निमित्ताने, मी माझ्या कुटुंबातील सर्व सदस्यांना आश्वासन देतो, की भाजपा सरकार तुमचे जीवन सुकर करण्यामध्ये कोणतीही कसर ठेवणार नाही.
* * *
S.Tupe/R.Agashe/D.Rane
(रिलीज़ आईडी: 1985806)
आगंतुक पटल : 139
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam