राष्ट्रपती कार्यालय

वाराणसी येथील महात्मा गांधी काशी विद्यापीठाच्या 45 व्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची उपस्थिती

Posted On: 11 DEC 2023 3:11PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 डिसेंबर 2023


राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज (11 डिसेंबर, 2023) वाराणसी येथे महात्मा गांधी काशी विद्यापीठाच्या 45 व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहिल्या आणि त्यांनी कार्यक्रमाला संबोधित केले.

यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, दोन भारतरत्न प्राप्त व्यक्तींचा या संस्थेशी असलेला संबंध हा महात्मा गांधी काशी विद्यापीठाच्या वैभवशाली वारशाचा दाखला आहे. भारतरत्न डॉ.भगवान दास हे या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू होते आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री हे या संस्थेत शिकलेल्या पहिल्या तुकडीचे विद्यार्थी होते. या संस्थेतील विद्यार्थ्यांनी आपल्या आचरणामध्ये शास्त्रीजींची जीवनमूल्ये अंगीकारावीत, अशी अपेक्षा असल्याचे त्या म्हणाल्या.

या विदयापीठाचा प्रवास आपल्या देशाच्या स्वातंत्र्याच्या 26 वर्षे आधी, गांधीजींना अभिप्रेत असलेल्या स्वावलंबन आणि स्वराज्याच्या ध्येयाने सुरू झाल्याचे राष्ट्रपतींनी नमूद केले. असहकार चळवळीतून जन्माला आलेली संस्था असलेले हे विद्यापीठ आपल्या थोर  स्वातंत्र्यलढ्याचे जिवंत प्रतीक आहे. त्या म्हणाल्या की, महात्मा गांधी काशी विदयापीठाचे सर्व विद्यार्थी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील आदर्शांची धुरा यापुढेही वाहून नेणार आहेत.

राष्ट्रपती म्हणाल्या की, वाराणसी हे प्राचीन काळापासून भारतीय ज्ञान परंपरेचे केंद्र राहिले आहे. महात्मा गांधी काशी विदयापीठातील विद्यार्थी आणि शिक्षकांनी ज्ञानाचे केंद्र म्हणून आपल्या परंपरेला अनुसरून, संस्थेचे वैभव वृद्धिंगत करावे, असे आवाहन त्यांनी केले.

राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.

 

S.Kane/R.Agashe/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1984957) Visitor Counter : 80