गृह मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह रविवार, दिनांक 10 डिसेंबर रोजी बिहार मधील पाटणा येथे होणाऱ्या पूर्व विभागीय परिषदेच्या 26 व्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील.

Posted On: 09 DEC 2023 9:34AM by PIB Mumbai

केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह रविवार, दिनांक १० डिसेंबर २०२३ रोजी बिहार मधील पाटणा येथे होणाऱ्या पूर्व विभागीय परिषदेच्या 26 व्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवतील. या पूर्व विभागीय परिषदेमध्ये बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा आणि झारखंड या राज्यांचा समावेश आहे. ही बैठक भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या आंतर राज्य परिषद सचिवालय आणि बिहार सरकारच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे. या पूर्व विभागीय परिषदेच्या 26 व्या बैठकीला सदस्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह, प्रत्येक राज्यातले दोन वरिष्ठ मंत्री उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर या बैठकीत राज्य सरकारांचे मुख्य सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी तसेच केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारीही सहभागी होणार आहेत.

***

JPS/VPY/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1984348) Visitor Counter : 143