पंतप्रधान कार्यालय
नमो ऍपवरील 'विकसित भारत सदिच्छादूत' प्रारुपामध्ये प्रभावी कामे करण्याचे 100 दिवसांचे आव्हान स्वीकारण्याचे पंतप्रधानांचे नागरिकांना आवाहन
Posted On:
07 DEC 2023 6:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 डिसेंबर 2023
नमो ऍपवरील 'विकसित भारत सदिच्छादूत'' प्रारुपामध्ये प्रभावी कामे करण्याचे 100 दिवसांचे आव्हान स्वीकारण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना केले आहे.विकसित भारताचे सदिच्छादूत असणे हा सामर्थ्य एकवटण्याचा,विकासाचा अजेंडा पसरवण्याचा आणि विकसित भारताचे आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्या उर्जेचा वापर करण्याचा एक आदर्श मार्ग आहे असेही ते म्हणाले.
एक्सवरील आपल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले:
"140 कोटी भारतीयांनी जगाला दाखवून दिले आहे की लोक-घडवत असलेला विकास म्हणजे काय!
विकसित भारत बनण्याच्या सामूहिक प्रयत्नांमध्ये आपल्यापैकी प्रत्येकाचे अविभाज्य योगदान असणार आहे.
https://www.narendramodi.in/ViksitBharatAmbassador
आपली ताकद एकवटण्याचा,विकासाच्या अजेंड्याचा प्रसार करण्याचा आणि भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्याचे आपले ध्येय पूर्ण करण्यासाठी आपल्या उर्जेचा वापर करण्याचा एक आदर्श मार्ग म्हणजे 'विकसित भारत सदिच्छादूत' असणे.
नमो ऍपवर साइन अप करून आणि 'विकसित भारत सदिच्छादूत' प्रारुपामध्ये सोपी परंतु अत्यंत प्रभावी कामे करण्याचे 100 दिवसांचे आव्हान स्वीकारून या लोकचळवळीत सामील व्हा.
मी सर्व क्षेत्रातील काही सर्वात उत्साही आणि उज्ज्वल सदिच्छादूतांना वैयक्तिकरित्या भेटण्यास उत्सुक आहे".
S.Patil/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1983711)
Visitor Counter : 102
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam