कोळसा मंत्रालय

नोव्हेंबर महिन्यात कॅप्टिव्ह आणि  व्यावसायिक कोळसा खाणींमधून आतापर्यंतचा सर्वाधिक कोळसा खणन आणि पाठवणी


उत्पादन आणि वितरण अनुक्रमे 37% आणि 55% ने वाढले

Posted On: 02 DEC 2023 12:37PM by PIB Mumbai

 

कॅप्टिव्ह आणि  व्यावसायिक कोळसा खाणींमधील कोळसा उत्पादन नोव्हेंबर 2022 मधील 8.74 मेट्रिक टनच्या तुलनेत 37 टक्क्यांनी वाढून नोव्हेंबर 2023 मध्ये 11.94 दशलक्ष टन (एमटी) झाले आहे. त्याच वेळी, नोव्हेंबर 2023 मध्ये कॅटिव्ह आणि  व्यावसायिक  कोळसा खाणींमधील कोळसा पाठवणूक मागील वर्षाच्या 8.36 मेट्रिक टनच्या तुलनेत 55 टक्के वाढीसह 12.92 मेट्रिक टन इतकी आहे. नोव्हेंबर 2023 मध्ये अशा खाणींमधून दररोज सरासरी 4.3 लाख टन कोळसा पाठवला गेला, जो आतापर्यंतचा सर्वाधिक आहे.

एप्रिल ते नोव्हेंबर 2023 या कालावधीत कॅप्टिव्ह आणि  व्यावसायिक बंदिस्त आणि व्यावसायिक कोळसा खाणींमधील कोळसा उत्पादन आणि पाठवणूकीत लक्षणीय वाढ दिसून आली आहे. 1 एप्रिल 2023 ते 30 नोव्हेंबर 2023 या कालावधीत कॅप्टिव्ह आणि व्यावसायिक कोळसा खाणींमधून एकूण कोळसा उत्पादन सुमारे 83.90 एम. टी. होते, तर एकूण कोळसा पाठवणूक 89.67 एम. टी. होती.  वित्तीय वर्षाच्या याच कालावधीपासून ही अनुक्रमे 24 टक्के आणि 31 टक्के वार्षिक वाढ दर्शवते. कोळशाच्या उत्पादनात सर्वाधिक वाढ ही बिगर-नियंत्रित क्षेत्र आणि व्यावसायिक कोळसा खाणींमधून झाली, ज्यात अनुक्रमे 101% आणि 98 टक्के वाढ झाली.

भारताची ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या आणि आर्थिक विकासाला चालना देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल असलेले कोळसा उत्पादन आणि ते पाठवण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मंत्रालय वचनबद्ध आहे.

***

M.Iyengar/V.Ghode/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1981885) Visitor Counter : 70