पंतप्रधान कार्यालय
देवघर येथील जनऔषधी केंद्र संचालक आणि लाभार्थी यांच्याशी पंतप्रधानांनी संवाद साधला
बाबाधाम मध्ये दहाहजारावे जन औषधी केंद्र सुरू झाले ही आनंदाची बाब आहे: पंतप्रधान
दर्जेदार आणि परवडणारी औषधे ही एक मोठीच सेवा आहे: पंतप्रधान
Posted On:
30 NOV 2023 1:23PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. त्यांनी यावेळी प्रधानमंत्री महिला किसान ड्रोन केंद्राचाही शुभारंभ केला. कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी एम्स, देवघर येथील 10,000 व्या जनऔषधी केंद्राचे लोकार्पण केले. याशिवाय, मोदींनी देशातील जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत वाढवण्याच्या उपक्रमाचाही शुभारंभ केला. महिला बचत गटांना ड्रोन पुरवणे आणि जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत वाढवणे या दोन्ही उपक्रमांची घोषणा या वर्षाच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधानांनी केली होती.या आश्वासनांची पूर्तता या कार्यक्रमाने केली आहे.
पंतप्रधानांनी एम्स देवघर येथील लाभार्थी आणि जन औषधी केंद्राच्या संचालक रुची कुमारी यांच्याशी संवाद साधत सुरुवात केली. बाबा धाम देवघरमध्ये हा दहा हजारावा टप्पा गाठल्याबद्दल आनंद व्यक्त करत पंतप्रधानांनी दहा.हजारावे विशेष जन औषधी केंद्र सुरू केल्याबद्दल तिचे अभिनंदन केले. जनऔषधी केंद्राबाबत तिच्याकडे विचारणा केल्यावर, ती तिचा अनुभव सांगत म्हणाली, की बाजारात 100 रुपयांना मिळणारे औषध जनऔषधी केंद्रात 10 ते 50 रुपयांना उपलब्ध असल्याने स्वस्त औषधांची गरज तीव्रतेने जाणवते. पंतप्रधानांनी या भागातील जनऔषधी केंद्रांबद्दल जागरुकता निर्माण करण्याच्या विषयालाही स्पर्श केला आणि रुचीने या योजनेच्या प्रचारासाठी ती,सामाजिक माध्यमांचा वापर करत असल्याची माहिती दिली.
जनऔषधी योजनेच्या लाभार्थी, श्री. सोना मिश्रा यांनी पंतप्रधानांना सांगितले, की त्यांनी जनऔषधी केंद्रातून स्वस्त दरातील औषधे खरेदी करून दरमहा अंदाजे 10,000 रुपयांची बचत केली आहे. पंतप्रधानांनी श्री मिश्रा यांना त्यांच्या दुकानावर जन औषधी केंद्राच्या अनुभवांबद्दलचा एक फलक लावण्याची सूचना केली आणि स्वस्त औषधांच्या उपलब्धतेबद्दल जनजागृती करण्यावर भर देण्यास सांगितले.
स्थानिक लोक योजनांबाबत जागरूक असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. “दर्जेदार आणि परवडणारी औषधे ही एक मोठीच सेवा आहे आणि लोकांनी याबद्दल जागरूक असले पाहिजे, असे पंतप्रधान म्हणाले.
***
NM/SampadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1981463)
Visitor Counter : 100
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam