पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी लाभार्थी शेतकऱ्याचे  ‘जय जगन्नाथ’ म्हणत केले स्वागत


ओडिशातील शेतकरी आपल्या मुलांच्या भवितव्याबद्दल आश्वस्त 

Posted On: 30 NOV 2023 1:25PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून  विकसित भारत संकल्प यात्रेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला.  प्रधानमंत्री महिला किसान ड्रोन केंद्राचाही त्यांनी प्रारंभ केला. या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधानांनी एम्स, देवघर येथे ऐतिहासिक 10,000  व्या जन औषधी केंद्राचे लोकार्पण केले.देशातील जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत वाढवण्याचा कार्यक्रमही मोदी यांनी यावेळी  सुरू केला.या वर्षाच्या सुरुवातीला स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान, महिला बचत गटांना ड्रोन पुरवणे आणि जनऔषधी केंद्रांची संख्या 10,000 वरून 25,000 पर्यंत वाढवणे या या दोन्ही उपक्रमांची घोषणा पंतप्रधानांनी  केली होती. या आश्‍वासनांची पूर्तता झाल्याची साक्ष आजचा  हा कार्यक्रम आहे..

ओडिशातील  रायगढ इथले शेतकरी पूर्ण चंद बेनिया यांचे पंतप्रधानांनी जय जगन्नाथम्हणत  स्वागत केले.बेनिया जी अनेक सरकारी योजनांचे लाभार्थी आहेत.

उज्ज्वला सारख्या योजनांनी त्यांचे जीवन कशाप्रकारे  बदलले हे लाभार्थ्यानी यावेळी  सांगितले. आपल्या मुलांच्या उज्वल भविष्याचे स्वप्न पाहण्याचा  आत्मविश्वास वाटत असल्याचे त्यांनी  पंतप्रधानांना सांगितले. त्यांच्या फायद्यासाठी आणखी कोणकोणत्या योजना उपलब्ध आहेत याची चौकशी, यात्रेसोबत आलेल्या अधिकाऱ्यांकडून करावी असे पंतप्रधानांनी लाभार्थ्यांना सांगितले.

***

R.Aghor/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1981099) Visitor Counter : 76