रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

उत्तरकाशी बोगदा बचाव मोहीमेबाबत माध्यमांना माहिती (27/11/2023 रोजी दुपारी 1.30 पर्यंत प्राप्त माहितीसह अद्यतनित)


सिलक्यारा बोगदा कोसळलेल्या ठिकाणी बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू

Posted On: 27 NOV 2023 7:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 नोव्हेंबर 2023

सर्व कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्याच्या कटिबद्धतेसह, केंद्र सरकार सक्रियपणे, उत्तरकाशी मधल्या सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांच्या बचावाचे अभियान युद्धपातळीवर राबवत आहे.

विविध सरकारी यंत्रणा, अथकपणे त्यांना दिलेल्या विशिष्ट कार्यात गुंतल्या असून, कामगारांच्या सुरक्षित सुटकेसाठी काम करत आहेत. या ठिकाणी बचाव कार्याबाबत सूचना करण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तज्ञ उपस्थित आहेत. अडकलेल्या कामगारांचे मनोधैर्य कायम राखण्यासाठी, सरकार सातत्याने त्यांच्या संपर्कात आहे.

बचाव कार्यातील महत्वाची अद्ययावत माहिती :

1. एनचआयडीसीएलचे  जीवनरक्षणासाठीचे  प्रयत्न :

  • ताजे शिजवलेले अन्न आणि ताजी फळे नियमित अंतराने दुसऱ्या लाईफ लाइन (150 मिमी व्यास) सेवेचा वापर करून बोगद्याच्या आत पोहोचवली जात आहेत.
  • एसडीआरएफने उपलब्ध मनुष्यबळासह व्हिडिओ संप्रेषण स्थापित केले आहे
  • एनडीआरएफने थेट लाईन कम्युनिकेशन स्थापित केले आहे.

2. एनएचआयडीसीएल द्वारे हॉरीझॉन्टल बोरिंग

  • परिचालन क्षेत्राच्या (Ch. 194.50 ते Ch. 184.50) सुरक्षेसाठी सिल्क्यराच्या बाजूने बोगद्याच्या दर्शनी भागापासून बोगद्याच्या बाहेर पडण्याच्या दिशेने फॉल्स रिब्स उभारले जात आहेत  - 25.11.023 रोजी 19. 50 वाजता फॉल्स रिब्सची उभारणी सुरू झाली. वृत्तांकनाच्या  वेळी एकूण 8 रिब इरेक्शन पूर्ण झाले होते.

3. सतलुज जल विद्युत निगम- या निगम  द्वारे बचावासाठी व्हर्टिकल ड्रिलिंग  ( उभे खोदकाम)(1.0m dia) :

  • ड्रिलिंग यंत्रे  घटनास्थळी दाखल झाली.
  • ड्रिलिंग मशिन सुरू करण्यासाठी प्लॅटफॉर्मचे काम  पूर्ण झाले आहे.
  • बोगद्यावरील ड्रिलिंग पॉईंटचे मार्किंग Ch 300 L/S. या ठिकाणी जीएसआय, आरव्हीएनएल आणि ओएनजीसी यांच्याशी चर्चा केल्यानंतर अंतिम रूप देण्यात आले आहे.
  • मुख्य मशीनची ड्रिलिंग ठिकाणी पोहचले आहे.

4.टिहरी हाइड्रो विकास निगम लिमिटेड (टीएचडीसीएल) द्वारे बरकोटच्या  बाजूने हॉरीझॉन्टल  ड्रिलिंग:

  • टीएचडीसीएलने बरकोटच्या टोकापासून बचाव बोगद्याचे बांधकाम सुरू केले आहे,
  • सहावा स्फोट 27. 11.2023 रोजी सकाळी  सव्वासहाला  करण्यात आला.
  • कार्यान्वित  ड्रिफ्टची एकूण लांबी 12 मीटर आहे.
  • 18 रिब्सचे फॅब्रिकेशनचे काम पूर्ण झाले आहे.

5. आरव्हीएनएल द्वारे काटकोनात ड्रिलिंग

  • कामगारांना वाचवण्यासाठी काटकोनात ड्रिलिंग करण्यासाठी लागणारी सूक्ष्म बोगद्याची उपकरणे नाशिक आणि दिल्लीहून घटनास्थळी पोहोचली आहेत.
  • प्लॅटफॉर्म उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

 6.सिल्क्याराच्या बाजूने आरव्हीएनएल द्वारे व्हर्टिकल ड्रिलिंग (8 इंच व्यास)

  • बीआरओ ने 1150 मीटरचा प्रवेश रस्ता पूर्ण केला आहे आणिआरव्हीएनएलला सुपूर्द केला आहे. बीआरओ ने ड्रिलिंगसाठी उपकरणे कामाच्या ठिकाणी आणली आहेत.
  • 26.11.2023 रोजी पहाटे 4. 00 वाजता ड्रिलिंग सुरू झाले आणि 72 मीटर पूर्ण झाले आहे.

7. बीआरओ द्वारे रोड कटिंग आणि सहाय्यक काम:

  • बीआरओ ने एसजेवीएनएल आणि आरव्हीएनएल  द्वारे केल्या जाणाऱ्या व्हर्टिकल ड्रिलिंगसाठी अप्रोच रोडचे बांधकाम पूर्ण केले आहे.
  • ओएनजीसी द्वारे करण्यात आलेल्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणाच्या आधारावर बीआरओ,ओएनजीसी साठी अप्रोच रोड देखील बनवत आहे. 5000 मीटरपैकी 1050 मीटरचा अप्रोच रोड तयार करण्यात आला आहे.

पार्श्वभूमी:

12 नोव्हेंबर 2023 रोजी, सिल्क्यरा ते बरकोट दरम्यान बांधल्या जाणाऱ्या बोगद्यात सिल्क्यराच्या बाजूला  बोगद्याचा काही भाग कोसळला होता. त्यानंतर बोगद्यात अडकलेल्या 41 कामगारांची सुटका करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने  तातडीने साधन सामुग्रीची जमवाजमव सुरु केली असून युद्धपातळीवर काम सुरु आहे.

टीप: तांत्रिक त्रुटी, हिमालयातील खडतर भौगोलिक स्थिती आणि अनपेक्षित आपत्कालीन परिस्थितीमुळे बचाव कार्याला  वेळ लागू शकतो.

 

 

 

 

 

N.Chitale/S.Kane/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 1980219) Visitor Counter : 74