मत्स्योत्पादन, पशुविकास आणि दुग्धविकास मंत्रालय
केंद्रीय पशुपालन आणि दुग्धविकास विभागातर्फे 26 नोव्हेंबर रोजी गुवाहाटी येथील पशुवैद्यक महाविद्यालयाच्या प्रांगणात “राष्ट्रीय दुग्ध दिन 2023” होणार साजरा
या कार्यक्रमात राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार-2023 देखील वितरीत केले जाणार
Posted On:
25 NOV 2023 12:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 25 नोव्हेंबर 2023
केंद्रीय पशुपालन आणि दुग्धविकास विभागातर्फे उद्या गुवाहाटी येथील पशुवैद्यक महाविद्यालयाच्या प्रांगणात “राष्ट्रीय दुग्ध दिन 2023” साजरा करण्यात येणार आहे. “भारतातील श्वेत क्रांतीचे जनक” म्हणून प्रसिध्द असलेल्या डॉ. वर्गीस यांच्या 102व्या जयंतीदिनाचे औचित्य साधून आपल्या देशातील दुग्धविकास क्षेत्राचे यश आणि महत्त्व अधोरेखित करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन आणि दुग्धविकास मंत्री परशोत्तम रुपाला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी केंद्रीय मत्स्यपालन, पशुपालन आणि दुग्धविकास राज्यमंत्री डॉ. संजीव कुमार बलियान आणि आसाम. मेघालय तसेच अरुणाचल प्रदेश या राज्यांचे मत्स्यपालन, पशुपालन आणि दुग्धविकास मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत.
पशुपालन आणि दुग्धविकास विभागाच्या केंद्रीय सचिव अलका उपाध्याय यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या समारंभानिमित्त आयोजित प्रदर्शनात या क्षेत्रातील अभिनव तंत्रज्ञाने, पशुधनासाठी उपयुक्त उत्पादने आणि सेवा तसेच देशाच्या ईशान्येकडील राज्यांसाठी पशुखाद्यविषयक धोरण तयार करण्यावर विशेष भर देण्यासह चारा आणि पशुखाद्य या विषयांवर आधारित तांत्रिक सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत. याच कार्यक्रमादरम्यान ए-एचईएलपी (पशुधन निर्मितीचे आरोग्य आणि विस्तार यांसाठीचा मान्यताप्राप्त एजंट) या कार्यक्रमाचे राज्यस्तरीय उद्घाटन करण्याचे देखील नियोजन आहे.
***
S.Pophale/S.Chitnis/P.kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1979708)
Visitor Counter : 150