इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
डीपफेक्स आणि माहिती तंत्रज्ञान नियमांचे पालन याविषयावर मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी डिजिटल मध्यस्थांशी साधला संवाद
विद्यमान कायद्यामधील माहिती तंत्रज्ञान नियमांतर्गत डिजिटल मंच आणि मध्यस्थ डीपफेक्सवर मात करण्यासाठी वचनबद्ध
Posted On:
24 NOV 2023 7:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर 2023
नवी दिल्लीत शुक्रवारी झालेल्या डिजिटल इंडिया संवाद सत्रात, केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी संवाद साधला. सुरक्षित आणि विश्वासार्ह इंटरनेटच्या गरजांचा विचार करता, डिजिटल समाजमाध्यम मध्यस्थांनी नागरिकांच्या बाबतीत उत्तरदायी राहण्यासंदर्भात पुनरुच्चार केला. डीपफेकच्या धोक्यांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेल्या चिंतेनंतर, ,विशेषत: डीपफेकसह वापरकर्त्याला हानी पोहोचवणाऱ्या 11 प्रकारच्या आशयाला चाप लावण्याच्या दृष्टीने सर्व डिजिटल मंच आणि मध्यस्थांनी त्यांची समुदाय मार्गदर्शक तत्त्वे माहिती तंत्रज्ञान नियमांशी संरेखित करण्यासाठी सहमती दर्शवली आहे .
या सत्रानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना, मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी वर्तमान नियमांच्या मर्यादेत डीपफेक आव्हानांवर मात करण्यासाठी डिजिटल मंच आणि मध्यस्थांची सामूहिक वचनबद्धता सुनिश्चित केली.
आपण नवीन कायदे आणि नियमांबद्दल चर्चा करत असताना , सध्याचे कायदे आणि नियम देखील डीपफेकवर निर्णायकपणे मात करण्यासाठी तरतुदी प्रदान करत आहेत, यावर सर्व डिजिटल मंच आणि मध्यस्थांनी सहमती दर्शवली, असे मंत्र्यांनी सांगितले. सर्व अटी आणि दृश्ये आणि वापरकर्त्यांसोबतचे करार माहिती तंत्रज्ञान नियमांमध्ये नमूद केलेल्या 11 प्रकारच्या आशयापासून वापरकर्त्यांना स्पष्टपणे प्रतिबंधित करतील हे पुढील सात दिवसांत सर्व संबंधित सुनिश्चित करतील, असे त्यांनी सांगितले.
“आम्ही सहकार्याच्या माध्यमातून सरकार आणि डिजिटल मंचांनी तक्रारींचे निराकरण करण्याच्या बाबतीत बऱ्यापैकी चांगले काम केले आहे.हे सक्रियपणे केल्याबद्दल मी मध्यस्थांचे अभिनंदन करतो, असे चंद्रशेखर यांनी सांगितले. तसेच सुरक्षितता आणि ऑनलाइन विश्वासार्हतेला धोका असणाऱ्या, विशेषत: चुकीची माहिती, डीपफेक आणि सट्टेबाजीच्या बेकायदेशीर बेटिंग मंचाच्या जाहिराती आणि फसव्या कर्ज अॅप्सच्या जाहिरातींना आळा घालण्यासाठी या क्षेत्रात बरेच काही करायचे आहे, असे राजीव चंद्रशेखर यांनी यावेळी सांगितले.
S.Bedekar/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1979579)
Visitor Counter : 105