माहिती आणि प्रसारण मंत्रालय

मल्याळम चित्रपट आट्टमने इफ्फी 54 मध्ये भारतीय पॅनोरमा फीचर फिल्म विभागातील चित्रपटांच्या प्रदर्शनाला प्रारंभ


इफ्फीमधील उदघाटन चित्रपटाचा दिग्दर्शक म्हणून अभूतपूर्व सन्मान वाटतो: दिग्दर्शक आनंद एकर्षी

आट्टम खूप वैयक्तिक आहे, हा एक कौटुंबिक चित्रपट आहे, माझ्या हृदयाच्या जवळचा आहे: अभिनेता विनय फोर्ट

Posted On: 22 NOV 2023 5:25PM by PIB Mumbai

गोवा/मुंबई, 22 नोव्‍हेंबर 2023

 

इफ्फी 54 मधील चित्रपटप्रेमींसाठी उत्कृष्ट सिनेमॅटिक अनुभव देणाऱ्या इंडियन पॅनोरमा विभागाचा मल्याळम चित्रपट आट्टम ने प्रारंभ झाला. आनंद एकर्षी यांचे दिग्दर्शन असलेला आट्टम विशिष्ट अस्वस्थ परिस्थिती आली असताना व्यक्ती आणि समूह यांच्यातील उत्स्फूर्तपणाचा शोध घेतो.

आट्टम चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद एकर्षी यांनी गोव्यातील 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, “चित्रपटाची व्यापक संकल्पना  कोणत्याही लिंग किंवा पितृसत्तेशी संबंधित  नाही. व्यक्ती आणि समूह यांच्यातील विविध थरातील उत्स्फूर्तता यात कल्पिलेली आहे, ज्यात  गट पुरुषांचा आहे आणि व्यक्ती एक स्त्री आहे. ते म्हणाले की कथानकात लिंगाधारित तथ्यांचा अभ्यास आहे परंतु चित्रपट कोणत्याही लिंग किंवा प्रदेश विशिष्ट नाही.

140 मिनिटांची लांबी असलेल्या या चित्रपटाचे दिगदर्शन करताना एकर्षी यांनी विनय फोर्ट आणि झरीन शिहाब या प्रमुख जोडीसह इतर  कलाकारांना मार्गदर्शन केले.  चित्रपटाच्या कथानकाबद्दल बोलताना, त्यांनी सांगितले की हा चित्रपट एक व्यक्ती आणि समूह यांच्यातील उत्क्रांत गतिमानता सादर करतो. “हा सिनेमा 12 अँग्री मेनपासून प्रेरित नाही, तर ही एक नैसर्गिक प्रवृत्ती होती, परंतु त्या चित्रपटाशी केलेली तुलना  हा एक सन्मान आहे,”असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.  या चित्रपटाची कल्पना कोविड महामारीच्या काळात मित्रांसोबतच्या प्रवासादरम्यान  बोलता बोलता सुचली. असे  या चित्रपटाची कल्पना कशी सुचली या प्रश्नावर त्यांनी स्पष्ट केले

या चित्रपटाच्या संकल्पनेवर बोलताना प्रमुख अभिनेता विनय फोर्ट यांनी नमूद केले की, तो त्याच्या 20 वर्षांची मैत्री असलेल्या नाटकातील  मित्रांसह सहलीला गेला होता, जिथे “आम्ही आमची मैत्री, एकता आणि कला एखाद्या विशिष्ट प्रकारे मांडण्याचे ठरवले आणि चित्रपट करायचा असे ठरले. ही जबाबदारी आनंदवर येऊन पडली, जो गटातील सर्वात "सर्जनशील आणि उत्तम वाचक आहे, असे फोर्ट म्हणले. ही कल्पना अखेर आट्टम चित्रपटातून साकार झाली. ते म्हणाले  "आट्टम अतिशय व्यक्तिगत  आहे आणि हा एक कौटुंबिक चित्रपट आहे, माझ्या हृदयाच्या जवळ आहे."

"प्रत्येक अभिनेत्याची ताकद आणि मर्यादा समजून घेऊन आणि एक प्रेक्षक म्हणून उत्तम प्रकारे हाताळले" अशा शब्दात फोर्ट यांनी आनंद यांच्या दिग्दर्शन कौशल्याचे कौतुक केले. एक अभिनेता म्हणून त्याला कशामुळे प्रेरणा मिळते या प्रश्नावर, फोर्ट यांनी सांगितले की , "आकर्षक कथा , आव्हानात्मक व्यक्तिरेखा आणि असे इतर घटक महत्त्वाचे आहेत".

यावर, दिग्दर्शक एकर्षी म्हणाले की हा नऊ अभिनेत्यांसाठी हा पदार्पणाचा चित्रपट होता आणि "नाटकांमधून चित्रपटाकडे वळणे ही मोठी जबाबदारी आहे आणि एखाद्या दृश्यासाठी अभिनय करणे हे रंगमंचावरील कलाकारांसाठी एक आव्हान आहे. कॅमेरा आणि सेटची सवय होण्यासाठी चित्रीकरणाच्या आधी 35 दिवस सीन रिहर्सल केल्या , त्यामुळे रिहर्सल ही सर्वात महत्त्वाची गोष्ट होती.”

चित्रपटाचे ध्वनी संयोजक  रंगानाथ रवी यांनी एकाच ठिकाणी 13 कलाकारांसोबत चित्रीकरण  करताना आलेल्या आव्हानांबद्दल सांगितले, मात्र ध्वनी संयोजकांनी ते कसे आकर्षक बनवले आणि चित्रपटात बारकावे जोडले.

आट्टम : हा नाट्यमय चित्रपटाची कथा  अरंगू नावाच्या थिएटर ग्रुपच्या एक स्त्री आणि बारा पुरुषांच्या नाटकाभोवती फिरते.  त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळण्याची संधी मिळते जेव्हा त्यांना हरीचे मित्र ख्रिस आणि एमिली भूमिका देतात ,हरीची मुख्य भूमिका  पूर्वी विनयने साकारली होती.  नाटकातील एकमेव महिला कलाकार अंजली विनयच्या प्रेमात आहे आणि ती त्याला सांगते की ख्रिस आणि एमिली यांनी आयोजित केलेल्या पार्टीत हरीने तिच्याशी गैरवर्तन केले होते. विनय ही माहिती मदनसोबत सामायिक करून हरीचे खरे रूप समोर आणण्याचा प्रयत्न करतो , जो समूहातील इतरांशी  यावर चर्चा करण्यास सहमती दर्शवतो आणि शेवटी हरीला बाहेर काढतो. मैत्री धोक्यात येते , मात्र आर्थिक लाभ आणि यश लोकांच्या नैतिकतेला लाच देण्याचे साधन म्हणून वापरले जाते. नाट्य जसे पुढे जाते तसतसे सत्य उलगडते आणि वास्तव विचित्र वाटू लागते.

 

चित्रपटाचे कलाकार आणि इतर सहाय्यक चमू

दिग्दर्शक: आनंद एकर्षी

निर्माता: जॉय मूव्ही प्रोडक्शन एलएलपी

लेखक: आनंद एकर्षी

डीओपी : अनुरुध अनीश

संकलक  : महेश भुवनंद

कलाकार: विनय फोर्ट, जरीन शिहाब

 

* * *

PIB Mumbai | G.Chippalkatti/S.Kane/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji   Image result for facebook icon /PIBPanaji    /pib_goa   pibgoa[at]gmail[dot]com  /PIBGoa



(Release ID: 1978809) Visitor Counter : 135