राष्ट्रपती कार्यालय
राष्ट्रपतींच्या हस्ते संबलपूर येथे ब्रह्माकुमारी यांच्या "नव्या भारतासाठी नवे शिक्षण" या शैक्षणिक मोहिमेला प्रारंभ
Posted On:
22 NOV 2023 3:32PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर 2023
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (22 नोव्हेंबर 2023 ) ओडिशामधील संबलपूर येथे ब्रह्माकुमारी यांच्या ‘नव्या भारतासाठी नवे शिक्षण’ ही शैक्षणिक मोहीम सुरू केली. चांगला समाज घडवण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मूल्ये रुजवण्यासाठी आणि जाणीवा जागृत करण्यासाठी ही मोहीम आखण्यात आली आहे
समाज बांधणीत शिक्षणाने नेहमीच महत्त्वाची आणि परिवर्तनाची भूमिका बजावली आहे, असे राष्ट्रपतींनी यावेळी बोलताना सांगितले. सेवा, समानता आणि सहानुभूती यासारखी नैतिक आणि मानवी मूल्ये आपल्या संस्कृतीचा पाया आहेत आणि तरुणांनी या महान आदर्शांशी परिचित असले पाहिजे, एक चांगला समाज घडवण्यासाठी त्यांनी आपल्या वृद्ध आई-वडिलांची आणि समाजातील वंचित घटकातील लोकांची काळजी घेतली पाहिजे, हे त्यांनी अधोरेखित केले.शिक्षणाच्या माध्यमातून मुलांच्या मनात या मूल्यांबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
मूल्य शिक्षण आपले जीवन घडवण्यासाठी मदत करते आणि समाजात सकारात्मक बदल घडवून आणते. मूल्य शिक्षण आपल्याला करुणा, दया, मैत्री आणि बंधुत्व या जीवनमूल्यांची जाणीव करून देते. हे गुण असलेल्या व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल घडू शकतात. व्यक्तीमधले सकारात्मक बदल चांगला समाज घडवू शकतात. असे राष्ट्रपती म्हणाल्या. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय हे व्यक्तिमत्व निर्मिती, आत्मसाक्षात्कार आणि दैवी अनुभवाच्या माध्यमातून आनंद, शांती आणि आनंदाचा मार्ग उपलब्ध करून देत आहे हे लक्षात घेऊन त्यांनी आनंद व्यक्त केला.
S.Bedekar/S.Chavan/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1978746)
Visitor Counter : 115