माहिती आणि प्रसारण मंत्रालय
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते इफ्फी सिनेमेळ्याचे उद्घाटन
गोवा/मुंबई, 21 नोव्हेंबर 2023
केंद्रीय माहिती आणि प्रसारण, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आज गोव्यातील पणजी येथील योग सेतू येथे इफ्फी सिने-मेळ्याचे संयुक्तपणे उद्घाटन केले.
अनुराग सिंह ठाकूर यांनी भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने उभारलेल्या पॅव्हेलियनची पाहणी केली . राष्ट्रीय चित्रपट वारसा मिशन अंतर्गत भारतातील चित्रपट वारशाचे जतन, संवर्धन, डिजिटायझेशन आणि पुनर्संचयन करणे हा उद्देश आहे.
केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी भारतीय राष्ट्रीय सिनेमा पॅव्हेलियनला देखील भेट दिली.
इफ्फी हा केवळ चलचित्रपटातील उत्कृष्टतेचा उत्सव नाही तर सांस्कृतिक विविधतेचा उत्सव देखील आहे. या वर्षी, इफ्फी सिनेमेळा या नेत्रदीपक उपक्रमाची भर पडली आहे, जिथे इफ्फीसाठी नोंदणी केलेले लोक तसेच इफ्फीसाठी नोंदणी न केलेले स्थानिक लोक आणि पर्यटक देखील सिनेमा, कला, संस्कृती, हस्तकला, खाद्यपदार्थ यांचा आस्वाद घेताना इतर रोमांचक कार्यक्रमांचाही आनंद घेऊ शकतात.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 2016 मध्ये वर्ष 2021-22 ते 2024-25 या कालावधीसाठी एकूण 544.82 कोटी रुपये खर्चासह राष्ट्रीय चित्रपट वारसा मिशनची स्थापना केली होती. मुंबईतील फिल्म्स डिव्हिजन संकुल येथे 19 जानेवारी 2019 रोजी पंतप्रधानांच्या हस्ते नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमाचे उद्घाटन करण्यात आले होते.
* * *
PIB Mumbai | G.Chippalkatti/S.Kane/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBPanaji /PIBPanaji /pib_goa pibgoa[at]gmail[dot]com /PIBGoa
(Release ID: 1978557)
Visitor Counter : 128