नौवहन मंत्रालय
बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाकडून मुख्य सचिवालय आणि त्याच्या स्वायत्त, संलग्न/ दुय्यम बाह्य कार्यालयांमधील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी विशेष मोहीम 3.0 (SCDPM) चे केले आयोजन
एका महिन्याच्या या मोहिमेत प्रलंबित प्रकरणांचा कालबद्ध पद्धतीने निपटारा करण्यावर, स्वच्छता मोहिमा, टाकाऊ सामग्रीची विल्हेवाट, जुन्या फायलींची विल्हेवाट लावणे यावर देण्यात आला भर
टाकाऊ सामग्रीच्या विल्हेवाटीद्वारे या काळात मंत्रालयाने मिळवला ₹ 5,70,42,927 चा महसूल
Posted On:
18 NOV 2023 1:57PM by PIB Mumbai
बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने मुख्य सचिवालय आणि त्याच्या स्वायत्त, संलग्न/ कनिष्ठ बाह्य कार्यालयांमधील प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी विशेष मोहीम 3.0 (SCDPM) चे आयोजन केले. 2 ऑक्टोबर पासून या अभियानाची सुरुवात झाली आणि ते 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत सुरू राहिले. सार्वजनिक तक्रारींच्या निवारणासारख्या प्रलंबित प्रकरणांचा निपटारा, संसदेच्या सदस्यांचे संदर्भ, संसदेची आश्वासने, स्वच्छता मोहीम, टाकाऊ सामग्री इ. वर या मोहिमेत भर देण्यात आला.
2 ते 31 ऑक्टोबर 2023 दरम्यान बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने 395 स्वच्छता मोहिमा राबवल्या, ज्यामध्ये 62,607 प्रत्यक्ष फायली काढून टाकण्यात आल्या, 29,304 ई-फायलींचा आढावा घेण्यात आला, ज्यापैकी 12,473 चा आढावा घेऊन 3197 फायली बंद करण्यात आल्या. भंगार सामान/ निरुपयोगी वस्तू काढून टाकून 3710 चौरस फुट जागा मोकळी करण्यात आली. त्याबरोबरच 91 सार्वजनिक तक्रारींचे निवारण करण्यात आले आणि 9 पीएमओ संदर्भांपैकी 7 ची विल्हेवाट लावण्यात आली, 25 संसदीय हमी साध्य झाल्या, चार पैकी चार आयएमसी संदर्भ साध्य झाले, राज्य सरकारचे सर्वच्या सर्व 7 संदर्भ साध्य झाले, 91 सार्वजनिक तक्रारींचे निवारण, नियमात/ प्रक्रियेत शिथिलता करण्याच्या 13 पैकी 10 प्रक्रिया सुलभ करण्यात आल्या, रु. 5,70,42,927 चा महसूल भंगार विल्हेवाटीतून जमा झाला, खासदारांच्या संदर्भाच्या 46 पैकी 31 प्रकरणात लक्ष्य साध्य झाले.
बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्रालयाने जनतेसोबत संपर्क साधण्यासाठी आणि SCDPM 3.0 अंतर्गत आपण करत असलेल्या प्रयत्नांना अधोरेखित करण्यासाठी तसेच मंत्रालयाच्या समाज माध्यम मंचाच्या माध्यमातून व्यापक प्रसिद्धी देण्यासाठी समाज माध्यमांचाही वापर केला.
विशेष मोहीम 3.0 मध्ये मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली असलेल्या सर्व कार्यालयांनी उत्साहाने सहभाग घेतला आणि तयारीच्या टप्प्यात निर्धारित करण्यात आलेली लक्ष्ये साध्य करण्यात यश मिळवले.
***
M.Pange/S.Patil/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1977840)
Visitor Counter : 107