इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी डिजिटल इंडिया आरआयएससी- फाईव्ह (डीआयआर -फाईव्ह ) कार्यक्रमावरील देशव्यापी रोडशोला दाखवला हिरवा झेंडा


आरआयएससी- फाईव्ह (डीआयआर -फाईव्ह )कार्यक्रम विद्यार्थी, स्टार्ट अप्स आणि उद्योजकांसाठी संधी निर्माण करून देशातील सेमीकंडक्टर परिसंस्थेला अधिक उत्प्रेरित करेल : राजीव चंद्रशेखर

Posted On: 17 NOV 2023 5:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 17 नोव्हेंबर 2023

केंद्रीय कौशल्य विकास व  उद्योजकता आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान  राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी आज डिजिटल इंडिया आरआयएससी- फाईव्ह (डीआयआर -फाईव्ह ) कार्यक्रमावरील देशव्यापी  रोड शोला हिरवा झेंडा दाखवला. हा रोड शो सी-डॅक,आयईईई  इंडिया कौन्सिल आणि इलेक्ट्रॉनिक्स व  माहिती तंत्रज्ञान  मंत्रालयाद्वारे  17-18 नोव्हेंबर 2023 रोजी संयुक्तरित्या आयोजित केला जात असून आरआयएससी- फाईव्ह  डिझाइन क्षेत्रातील जागतिक अग्रणी यात सहभागी होणार आहेत.

सी-डॅकने आता एरीज मायक्रो,ARIES V2, ARIES V3, ARIES IoT आणि  ARIES DOT या व्हेगा (VEGA) प्रोसेसर चिपवर आधारित एरीज डेव्हल्पमेंट बोर्ड्सची शृंखला  तयार केली आहे. हे डेव्हलपमेंट किट पूर्णपणे स्वदेशी आहेत आणि 'मेड इन इंडिया' असून अध्ययन, एम्बेडेड सिस्टम डिझाइन आणि IoT ऍप्लिकेशन्ससाठी लक्ष्यित आहेत.  आरआयएससी  फाईव्ह अनुरूप आयएसए सुसंगत  VEGA प्रोसेसरवर  आधारित बोर्ड्स  वापरण्यास सुलभ  हार्डवेअर आणि सॉफ्टवेअरसह येतात.

आरआयएससी  फाईव्ह परिसंस्थेच्या वाढीला चालना देऊन  संबंधित चिप्स आणि प्रणालीमधील नवोन्मेषात  भारताला अग्रणी देश म्हणून पुढे आणण्याचे   सरकारचे मुख्य लक्ष्य      असल्याचे राजीव चंद्रशेखर यांनी सांगितले. ''ओपन सोर्स तंत्रज्ञान निर्माण करण्याचा  आणि स्वीकारण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दृष्टिकोन प्रत्यक्षात आणण्यात, हा कार्यक्रम महत्त्वाची भूमिका बजावेल. स्टार्ट अप्स, विद्यार्थी आणि उद्योजक डीआय आर-फाईव्ह आधारित चिप्स आणि प्रणाली विकसित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील आणि भारताला  सेमीकंडक्टर राष्ट्र बनवण्यात योगदान देतील.''

दैनंदिन वापरातील विविध डिजिटल उत्पादनांमध्ये डीआय आर- फाईव्ह आधारित चिप्स आणि प्रणाली जोडण्यासाठी हा कार्यक्रम कशा प्रकारे उपयुक्त ठरेल हे चंद्रशेखर यांनी अधोरेखित केले.

डेव्हलपमेंट बोर्ड, SDK आणि अॅप्लिकेशन डेव्हलपमेंटचा वापर यासह सैद्धांतिक आणि व्यावहारिक दोन्ही पैलूंचा समावेश असलेल्या प्रोसेसरची डीआय आर- फाईव्ह व्हेगा शृंखला   आणि त्यांच्या परिसंस्थेबाबत  1500 सहभागींना मौल्यवान अंतर्दृष्टी प्रदान करणे हे रोड शोचे उद्दिष्ट आहे.

महाराष्ट्रातल्या ठाकूर अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयासह देशभरातल्या 15 शैक्षणिक संस्थांमध्ये हा कार्यक्रम एकाच वेळी आयोजित केला जात आहे.  

N.Meshram/S.Kakade/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 


(Release ID: 1977669) Visitor Counter : 106