रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय
उत्तराखंडमधे सिल्क्यारा बोगद्याचा भाग कोसळल्यामुळे अडकलेल्या कामगारांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी समन्वित प्रयत्न जारी
Posted On:
13 NOV 2023 8:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर 2023
चारधाम महामार्ग प्रकल्पाचा एक भाग म्हणून, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने गंगोत्री आणि यमुनोत्री या भागांना जोडण्यासाठी उत्तराखंडमधील राडी खिंडीखाली सिल्क्यारा येथे 4.531 किमी लांबीच्या, दोन मार्गिका असलेला आणि दोन्ही दिशांना जोडणाऱ्या बोगद्याचे बांधकाम हाती घेतले आहे आणि त्यासाठी, एकूण प्रकल्प खर्च निधी म्हणून मंत्रालयाने आपल्या मेसर्स नॅशनल हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (NHIDCL) द्वारे अंमलबजावणीसाठी 9 मार्च 2018 रोजी 1383 कोटी , रुपये,मंजूर केले आहेत. या बोगद्याच्या बांधकामामुळे येथे येणाऱ्या यात्रेकरूंना खूप फायदा होणार असून यामुळे कोणत्याही हवामानात दळणवळण शक्य होणार आहे तसेच राष्ट्रीय महामार्ग NH-134 (धारसू-बारकोट-यमुनोत्री रस्ता) वरील 25.6 किलोमीटरचे बर्फाने प्रभावित होणारे अंतर कमी होणार आहे.
या कामासाठी मेसर्स नॅशनल हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीने 14 जून 2018 रोजी मेसर्स नवयुगा इंजीनियरिंग कंपनी लिमिटेडसोबत अभियांत्रिकी खरेदी आणि बांधकाम (ईपीसी) कार्यासाठी 853.79 कोटी रुपयांचा करार केला होता.
12 नोव्हेंबर 2023 रोजी पहाटे साडेपाच वाजता सुमारे 40 कामगार सिल्क्यरा पोर्टलवरून 260m ते 265m अंतरावर बोगद्याच्या आत रिप्रोफाइलिंग अर्थात, मार्गातले अडथळे दूर करण्यासाठी तांत्रिक उपाययोजना शोधण्याचे काम करत असताना त्या बोगद्याचा भाग खाली कोसळला.बोगद्यात प्रवेश करताना आवश्यक असलेल्या कंत्राटदाराकडील नोंदीवरून बोगद्याच्या आत सर्व 40 कामगार अडकले आहेत.
या घटनेची माहिती तात्काळ राज्य/केंद्र सरकारच्या सर्व संबंधित संस्थांना कळवण्यात आली आणि अडकलेल्या कामगारांना, राज्य प्रशासन, रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने नॅशनल हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सीमा रस्ते संघटना,राज्य शासनाचे आपत्ती निवारण दल आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण दल आणि राज्याच्या इतर विभागांच्या एकत्रित प्रयत्नांनी, ताजी हवा/ऑक्सिजन/पाणी/वीज/छोटे पॅकबंद अन्न उपलब्ध पाईपद्वारे पुरवून बचाव कार्य सुरू झाले. अडकलेल्या कामगारांशी वॉकी टॉकीच्या माध्यमातून संवादही प्रस्थापित झाला आहे. अडकलेल्या कामगारांना लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी अधिकच्या उपाययोजना देखील हाती घेण्यात आल्या आहेत तसेच या
कामगारांच्या सुटकेसाठी आवश्यक ते समन्वित प्रयत्न केले जात आहेत.
N.Chitale/V.Yadav/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1976744)
Visitor Counter : 96