गृह आणि शहरी व्यवहार मंत्रालय

पाण्यासाठी महिला, महिलांसाठी पाणी" - जलदिवाळी मोहिमेचा यशस्वी  समारोप


देशाच्या विविध भागातून 14,000 हून अधिक महिला सहभागी

जल प्रशासनामध्ये महिलांच्या समावेशास दिले प्रोत्साहन

Posted On: 09 NOV 2023 5:58PM by PIB Mumbai

 

राष्ट्रीय शहरी उपजीविका अभियान (एनयूएलएम) आणि ओडिशा अर्बन अकादमी यांच्या भागीदारीत, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने (एमओएचयूए) एका अग्रगण्य उपक्रमा अंतर्गत "पाण्यासाठी महिला, महिलांसाठी पाणी" या तीन दिवसीय मोहिमेचे आयोजन केले होते. आज तिसऱ्या दिवशी 9 नोव्हेंबर 2023 रोजी या कार्यक्रमाचा समारोप सोहळा यशस्वीरीत्या संपन्न झाला. अटल कायाकल्प आणि शहरी परिवर्तन अभियाना अंतर्गत या  मोहिमेचा उद्देश जल प्रशासनात महिलांच्या सहभागाला चालना देणे हा आहे.

या तीन दिवसीय मोहिमेत देशाच्या विविध भागांतून (निवडणूक असलेली राज्ये वगळता) 14,000 हून अधिक महिलांनी सहभाग घेतला होता. या मोहिमेदरम्यान महिलांनी देशभरातील 530 हून अधिक जलशुद्धीकरण केंद्रांना (ड्ब्ल्युटीपी) भेट दिली आणि स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी घरोघरी पोहोचवण्याच्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेच्या साक्षीदार बनल्या.

यात राज्यस्तरीय अधिकार्‍यांनी स्वयंसहायता गटाच्या महिलांचे स्वागत केले आणि मोहिमेच्या यशात त्यांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेवर भर दिला. सर्व सहभागींना प्रशिक्षण पुस्तिका, पाण्याच्या बाटल्या, सिपर, पर्यावरण अनुकूल पिशव्या आणि बॅज यांसारख्या आवश्यक वस्तूंसह क्षेत्र भेट उपकरणे देण्यात आली .

या मोहिमेदरम्यान, महिलांनी पाण्याच्या पायाभूत सुविधांचे निरीक्षण केले आणि पाणी गुणवत्ता चाचणी प्रोटोकॉलवर तज्ञांकडून मार्गदर्शन घेतले तसेच या चाचण्यांमध्ये भाग घेतला. जे त्यांना त्यांच्या समुदायांसाठी पाण्याच्या शुद्धतेची सर्वोच्च मानके सुनिश्चित करण्यास सक्षम करेल, ज्यामुळे पाण्याच्या पायाभूत सुविधांप्रती जबाबदारीची सखोल भावना दिसून येईल. "जल दिवाळी" च्या केन्द्रित क्षेत्रांमध्ये महिलांना अमृत योजना आणि तिच्या व्यापक परिणामांबद्दल माहिती देणे, स्मृतीचिन्हे प्रदान करणे आणि महिला बचत गटांनी (एसएचजीएच) तयार केलेल्या वस्तूंद्वारे सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन देणे समाविष्ट आहे. शाश्वत संवर्धन आणि जलस्रोतांचा विवेकपूर्ण वापर करण्यासाठी जल व्यवस्थापनाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

विविध बचत गट आणि 29 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या अधिकार्‍यांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे जल पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात सर्वसमावेशकता आणि महिला सक्षमीकरणाच्या दिशेने लक्षणीय प्रगती झाली आहे.

Figure 1 Andhra Pradesh

Figure 2 Tamil Nadu

Figure 3 Manipur

Figure 4 Assam

Figure 5 Assam

Figure 6 Haryana

Figure 7 Gujarat

Figure 8 Assam

Figure 9 Tamil Nadu

Figure 10 Maharashtra

Figure 11 Uttarakhand

***

N.Chitale/G.Deoda/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1976019) Visitor Counter : 119