रेल्वे मंत्रालय
भारतीय रेल्वेकडून विशेष मोहीम 3.0 ची यशस्वी अंमलबजावणी
Posted On:
09 NOV 2023 12:36PM by PIB Mumbai
- 11.80 लाख चौरस फूट जागा मोकळी झाली आणि 224.95 कोटी रुपये (अंदाजे) महसूल प्राप्त
- मोहिमे दरम्यान 2.88 लाखांहून अधिक सार्वजनिक तक्रारींचे निराकरण करण्यात आले
- नोंदी ठेवण्याच्या आणि बंद करण्याच्या उद्देशाने 1.70 लाखांहून अधिक नस्तींचा आढावा घेण्यात आला.
माननीय पंतप्रधानांच्या दृष्टिकोनातून प्रेरित होऊन, भारत सरकारने सुरु केलेल्या विशेष मोहीम 3.0 मध्ये सर्वत्र स्वच्छतेसह सार्वजनिक तक्रारींची प्रलंबितता कमी करणे आणि कामाच्या ठिकाणी कार्य-संस्कृतीत सुधारणा करणे यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.
उपरोक्त उपक्रमाचा एक भाग म्हणून स्वच्छता आणि सुशासनाला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी अधिक उत्साहाने आणि उद्दिष्टांची व्याप्ती व्यापक करत 02.10.2023 ते 31.10.2023 या कालावधीत भारतीय रेल्वेने विशेष मोहीम 3.0 हाती घेतली होती.
भारतीय रेल्वेमध्ये या मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. ही मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी देशभरात भारतीय रेल्वेच्या कार्यालयांमध्ये विविध स्तरावरील नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. .वरिष्ठ स्तरापासून कनिष्ठ स्तरापर्यंत सर्व कर्मचारी कामाच्या ठिकाणी स्वच्छता आणि प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी सक्रियपणे सहभागी झाले होते. सर्व नोडल अधिकारी आणि कर्मचार्यांच्या अथक परिश्रमामुळेच रेल्वेने अनेक बाबींमध्ये जवळपास 100% उद्दिष्ट गाठले आहे.
या मोहिमे दरम्यान, संपूर्ण भारतीय रेल्वेमध्ये क्षेत्रीय कार्यालये, विभागीय कार्यालये, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम , सार्वजनिक उपक्रम , प्रशिक्षण संस्था, रेल्वे कार्यशाळा आणि स्थानकांमध्ये 23,672 स्वच्छता मोहिमा राबवण्यात आल्या आहेत. कार्यालये आणि कामाच्या ठिकाणी भंगाराची विल्हेवाट लावण्यावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले यामुळे 11.80 लाख चौरस फूट जागा मोकळी झाली आणि 224.95 कोटी रुपये (अंदाजे) महसूल प्राप्त झाला.
याशिवाय या मोहिमेदरम्यान 2.8 लाखांहून अधिक सार्वजनिक तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. नोंदी ठेवण्याच्या उद्देशाने 1.70 लाखांहून अधिक नस्तींचा आढावा घेण्यात आला आणि त्यातील 1.00 लाखांहून अधिक नस्तींची नोंद करण्यात आल्या.
आपले प्रयत्न अधोरेखित करण्यासाठी तसेच कर्मचारी आणि सामान्य जनतेला स्वच्छता मोहिमेसाठी प्रवृत्त करण्याच्या दृष्टीने, रेल्वे समाजमाध्यमे (ट्विटर, फेसबुक इ.) आणि इतर मंचांचा सक्रियपणे वापर करत आहे. या मोहिमेदरम्यान रेल्वेच्या विविधहॅण्डल्स वरून 6900 हून अधिक पोस्ट समाजमाध्यमांवर करण्यात आल्या होत्या आणि 114 प्रसिद्धिपत्रके रेल्वेने प्रसिद्ध केली .
या मोहिमेची काही क्षणचित्रे :

पश्चिम मध्य रेल्वेवरील कोटा येथे भंगार साहित्य वापरून सर्जनशील कलाकृती.

***
NM/SonalC/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1975840)
Visitor Counter : 117