कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रारी विभागद्वारे ऑक्टोबर 2023 साठी केंद्रीकृत सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणालीवरील (सीपीजीआरएएमएस) केंद्रीय मंत्रालये/विभागांच्या कामगिरीचा 18 वा अहवाल प्रकाशित


ऑक्टोबर 2023 मध्ये केंद्रीय मंत्रालये/विभागांकडून  एकूण 1,23,491 तक्रारींचे निवारण 

सलग 15 व्या महिन्यात,  केंद्रीय सचिवालयात  मासिक तक्रारी निकाली काढण्याची संख्या 1 लाखांवर पोहोचली

Posted On: 08 NOV 2023 4:48PM by PIB Mumbai

 

प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने ऑक्टोबर, 2023 चा केंद्रीकृत सार्वजनिक तक्रार निवारण आणि देखरेख प्रणालीवरील (सीपीजीआरएएमएस) मासिक अहवाल प्रकाशित केला. या अहवालात सार्वजनिक तक्रारींचे प्रकार आणि श्रेणीचे  तपशीलवार विश्लेषण आणि निराकरणाचे स्वरूप देण्यात आले आहे. प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने प्रकाशित केलेला केंद्रीय मंत्रालये/विभागांवरील हा 18 वा अहवाल आहे. केंद्रीय सचिवालयाने ऑक्टोबर 2023 मध्ये तक्रारी आणि अपीलांसंदर्भात सर्वात कमी प्रलंबिततेची नोंद केली आहे,  केंद्रीय मंत्रालये/विभागांनी 1,23,491 तक्रारींचे निवारण केल्याचे, ऑक्टोबर 2023 मधील प्रगती दर्शवते. केंद्रीय मंत्रालये/विभागांमध्ये 2023 मध्ये जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत सरासरी तक्रार निकाली काढण्याची वेळ 19 दिवस आहे. हा अहवाल 10-टप्पे सीपीजीआरएएमएस सुधारणा प्रक्रियेचा भाग असून याचा अवलंब प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने तक्रार निवारणाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि वेळ कमी करण्यासाठी केला आहे. सलग 15 व्या महिन्यात,  केंद्रीय सचिवालयात मासिक तक्रारी निकाली काढण्याची संख्या 1 लाखांवर पोहोचली आहे.

ऑक्टोबर, 2023 मध्ये, बीएसएनएल अभिप्राय कॉल सेंटरने 1,00,815 अभिप्राय संकलित केले, ही संख्या जुलै 2022 मध्ये त्याच्या स्थापनेपासून संकलित केलेल्या अभिप्रायांच्या तुलनेत सर्वाधिक संख्या आहे. संकलित केलेल्या एकूण अभिप्रायांपैकी, ~ 38% नागरिकांनी त्यांच्या संबंधित तक्रारींचे निराकरण केल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

सामान्य सेवा केंद्रांद्वारे (सीएससी)सीपीजीआरएएमएसचा प्रसार वाढवण्यासाठी, सामान्य सेवा केंद्रांनी ऑक्टोबर 2023 पासून प्रत्येक महिन्याच्या 20 तारखेला सीएससी-सीपीजीआरएएमएस तक्रार निवारण दिन आयोजित करण्यास सुरुवात केली आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभागाने 16 ऑक्टोबर 2023 रोजी डेटा सामायिकरणासाठी सहकार्य करण्यासाठी एका मोठ्या प्रकल्पाचा भाग म्हणून मायक्रोसॉफ्ट सोबत नॉन-डिस्क्लोजर करार (एनडीए) केला आहे.

***

R.Aghor/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1975698) Visitor Counter : 99