पर्यटन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

लंडनमध्ये 6 ते 8 नोव्हेंबर 2023 दरम्यान आयोजित वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केट (WTM) 2023 मध्ये भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाचा सहभाग

Posted On: 07 NOV 2023 4:28PM by PIB Mumbai

 

लंडनमध्ये 6 ते 8 नोव्हेंबर 2023 दरम्यान आयोजित वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केट मध्ये टूर ऑपरेटर आणि राज्य पर्यटन विभागांसह विविध हितधारकांसोबत पर्यटन मंत्रालय सहभागी झाले आहे.  पर्यटन मंत्रालयाने 'अतुल्य भारत! भारत भ्रमण वर्ष 2023 ' या संकल्पनेंतर्गत वैविध्यपूर्ण पर्यटन उत्पादने आणि भारतात येणाऱ्या पर्यटकांसाठी परिवर्तनशील अनुभवांची शृंखला प्रदर्शित करण्यासाठी लंडनमध्ये आयोजित वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केट 2023 मध्ये अतुल्य भारत दालनासाठी 650 चौरस मीटर जागा घेतली आहे.

भारतीय दालनाचे औपचारिक उद्घाटन भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या सचिव व्ही. विद्यावती आणि भारताचे ब्रिटनमधील उच्चायुक्त विक्रम दोराईस्वामी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गोव्याचे पर्यटन मंत्री रोहन खौंटे उपस्थित होते.

उद्घाटनानंतर, भारतीय शिष्टमंडळ आणि सहभागींनी भारतीय दालनाला आणि विविध सहभागी राज्यांच्या आणि इतर हितधारकांच्या दालनाला भेट दिली. दिवसभर, अतुल्य भारताने विविध सांस्कृतिक कार्यक्रम, मेंदी आणि योग सत्रांचे आयोजन केले. संयुक्त राष्ट्रांची जागतिक व्यापार संघटनाजागतिक प्रवास आणि पर्यटन परिषदेच्या युवा आणि शिक्षणाद्वारे पर्यटनातील परिवर्तन या विषयीच्या पर्यटन मंत्र्यांच्या शिखर परिषदेत पर्यटन मंत्रालयाचे सचिव सहभागी झाले होते. दिवसभर, पर्यटन सचिवांनी महत्त्वाच्या टूर ऑपरेटर, माध्यम प्रतिनिधी आणि लंडन बाजारपेठेतील महत्त्वाच्या हितधारकांची भेट घेतली.

WTM 2023 मध्ये, टूर ऑपरेटिंग कंपन्या/डीएमसी, दिल्ली, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर, बिहार, मेघालय, अरुणाचल प्रदेश, ओडिशा, आसाम मधील राज्य पर्यटन विभाग आणि इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) सह 47 सहभागी अतुल्य भारत दालनात सहभागी होत आहेत. तर केरळ, कर्नाटक, लडाख, राजस्थान, मध्य प्रदेश, गोवा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांच्या पर्यटन विभागांनी त्यांची उत्पादने आणि सेवा प्रदर्शित करण्यासाठी आणि संभाव्य ग्राहक आणि हितधारकांशी संपर्क साधण्यासाठी स्वतःची दालने उभारली आहेत.

'अतुल्य भारत! भारत भ्रमण वर्ष 2023 ' या संकल्पनेंतर्गत वैविध्यपूर्ण पर्यटन उत्पादने आणि भारतात येणाऱ्या पर्यटकांसाठी परिवर्तनशील अनुभवांची शृंखला प्रदर्शित करण्याबरोबरच  शाश्वत पर्यटनाला चालना देण्याचा  पर्यटन मंत्रालयाचा उद्देश आहे.

***

S.Kane/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1975450) Visitor Counter : 121