निती आयोग
2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2023 या कालावधीत नीति आयोग कार्यालयामध्ये विशेष स्वच्छता मोहीम 3.0 ची अंमलबजावणी
Posted On:
06 NOV 2023 12:36PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छतेचे संस्थात्मकीकरण करण्याच्या आणि सरकारमधील प्रलंबिततेचे प्रमाण कमी करण्याच्या ध्येयापासून प्रेरणा घेऊन, नीति आयोगाने 2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2023 दरम्यान विशेष मोहीम 3.0 (अंमलबजावणीचा टप्पा) चां प्रारंभ केला. या मोहिमेत प्रलंबिततेचा निपटारा, उत्तम जागा व्यवस्थापन तसेच पर्यावरण आणि सरकारी पायाभूत सुविधा स्वच्छ आणि हरित बनवणे यावर विशेष भर देण्यात आला आहे.
या सर्वसमावेशक मोहिमेचा दोन वेगळ्या टप्प्यांत विस्तार केला गेला असून कार्यक्षम प्रशासन आणि सार्वजनिक सेवेसाठी आपल्या वचनबद्धतेचे उदाहरण स्थापित केले आहे :
1. पूर्व तयारीचा टप्पा (15 ते 30 सप्टेंबर 2023): या पूर्वतयारी टप्प्यात, नीति आयोगाने पुनरावलोकनासाठी 10103 फाईल्स, 15 प्रलंबित सार्वजनिक तक्रार याचिका, 9 संसदेची आश्वासने निश्चित केले. यासोबतच स्वच्छता आणि सुधारित जागा व्यवस्थापनासाठी कार्यालयीन जागा देखील ठरवण्यात आल्या. ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी 2 ऑक्टोबर 2023 ते 31 ऑक्टोबर 2023 पर्यंत विशेष मोहीम 3.0. राबविण्यात आली.
2. अंमलबजावणीचा टप्पा (2 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर 2023): त्यानंतरच्या टप्प्यात, नीति आयोगाने 15 प्रलंबित सार्वजनिक तक्रार याचिकांपैकी 100% आणि संसदेच्या 2 आश्वासनांचा यशस्वीपणे निपटारा केला. या काळात एकूण 5075 फायलींचे पुनरावलोकन करण्यात आले, त्यापैकी 3617 फायली निकाली काढण्यात आल्या. याशिवाय कार्यालयीन जागा, कार्यालयाचे आवार, अभिलेख कक्ष आणि विभागीय उपहारगृहात स्वच्छता उपक्रम राबविण्यात आला. हे विशेषतः लक्षात घेण्यासारखे आहे की या मोहिमेत फायलींच्या विल्हेवाटीने आणि कार्यालयीन जागा व्यवस्थापनातील सुधारणांद्वारे सुमारे 5124 चौ.फुट जागा मोकळी केली गेली. यामुळे अधिक पर्यावरण पूरक कार्यक्षेत्र आणि परिसर वृद्धिंगत होण्यास हातभार लागला.
17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत नीति आयोगात 'स्वच्छता हीच सेवा' मोहीम 2023 द्वारे या मोहिमेचा योग्यरित्या प्रसार करण्यासाठी विभागाने खालील उपक्रम हाती घेतले:
i फाइलींची पुनरावलोकन आणि निपटारा, जुन्या नोंदींचे डिजिटायझेशन आणि भंगाराची विल्हेवाट लावण्यावर विशेष भर देऊन नीति आयोगातील अभिलेख कक्षाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपासणी करण्यात आली;
ii नीति आयोगाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी स्वच्छता जनजागृती मोहीम राबविण्यात आली;
iii नीति आयोग कार्यालय परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली;
iv नीति आयोग विभागीय उपहारगृहाची साफसफाई करण्यात आली;
v. नीति आयोगाच्या उपाध्यक्षांनी नीति आयोगाच्या कर्मचार्यांना स्वच्छतेची प्रतिज्ञा दिली, त्यानंतर नीति आयोगाचे उपाध्यक्ष (सुमन के. बेरी) नीति आयोगाचे सदस्य, (व्ही. के. सारस्वत); आणि नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी ( बी. व्ही. आर. सुब्रमण्यम) यांच्या नेतृत्वाखाली नीति आयोग कार्यालय बाह्य परिसराची स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
***
S.Tupe/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1975008)
Visitor Counter : 130