शिक्षण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि डीपी वर्ल्डचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुलतान अहमद बिन सुलेयम  यांच्या उपस्थितीत एनएसडीसी इंटरनॅशनल आणि डीपी वर्ल्डची उपकंपनी वुई वन यांच्यातील करारावर स्वाक्षऱ्या


अधिक उत्तम प्रशासन आणि दुबईतील भारतीय समुदायाच्या हितासाठी सीबीएसई इंडिया दुबईमध्ये क्षेत्रीय कार्यालय सुरु करणार असल्याची केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची घोषणा

Posted On: 03 NOV 2023 4:56PM by PIB Mumbai

 

केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास तसेच उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दुबईतील डीपी वर्ल्ड या कंपनी समूहाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सुलतान अहमद बिन सुलेयम यांची  आज दुबई येथे भेट घेतली. या दोघा मान्यवरांच्या उपस्थितीत एनएसडीसी इंटरनॅशनल आणि डीपी वर्ल्डची उपकंपनी वुई वन यांच्यात कुशल मनुष्यबळाच्या दीर्घकालीन नेमणुकांसाठीच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. दोन्ही नेत्यांनी यावेळी सहयोगाच्या संधींबाबत देखील चर्चा केली.

आज झालेल्या करारामुळे, जागतिक प्रतिभेच्या गतिशीलतेसाठी, कौशल्यांसाठी तसेच परदेशातील योग्य अशा रोजगार संधींशी भारतीय युवकांना जोडण्यासाठी अधिक मार्ग निर्माण होतील., असे केंद्रीय मंत्री प्रधान यांनी सांगितले.

एनएसडीसी इंटरनॅशनल ही जागतिक पातळीवरील कौशल्य सुविधा मिळवून देण्यात सक्षम कंपनी आहे आणि डीपी वर्ल्डची उपकंपनी असलेली वुई वन ही स्मार्ट एंड-टू-एंड लॉजिस्टिक्स सेवा पुरवण्यात जागतिक पातळीवरील प्रख्यात कंपनी आहे.  आघाडीच्या कार्यदलासाठी कौशल्य विकास तसेच रोजगार संधी यांना चालना  देण्याच्या उद्दिष्टासह आज या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज व्हीएफएस ग्लोबल आणि ट्रान्सवर्ल्ड या कंपन्यांच्या पथकांसोबत केलेल्या बैठका देखील फलदायी ठरल्या.

केंद्रीय मंत्री प्रधान यांनी काल, संयुक्त अरब अमिरातीत कार्यरत असलेल्या सर्व 105 सीबीएसई-संलग्न शाळांच्या मुख्याध्यापकांची भेट घेऊन चर्चा केली. या शाळांचे अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील संकल्पनेला अनुसरून आहेत आणि या शाळांमध्ये त्याची अंमलबजावणी देखील  होते आहे हे जाणून घेतल्यावर त्यांनी आनंद व्यक्त केला.

आखाती देशांमधील  सीबीएसई-संलग्न भारतीय शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या 5 लाख भारतीय विद्यार्थ्यांपैकी अडीच लाखांहून अधिक विद्यार्थी संयुक्त अरब अमिरातीमधील आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.या शाळांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागणीच्या पार्श्वभूमीवर, अधिक उत्तम प्रशासन आणि दुबईतील भारतीय समुदायाच्या हितासाठी सीबीएसई-इंडियाने दुबईमध्ये क्षेत्रीय कार्यालय सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे, असे प्रधान यांनी सांगितले.

***

S.Kakade/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1974556) Visitor Counter : 113