कोळसा मंत्रालय

ऑक्टोबर 2023 मध्ये एकूण कोळसा उत्पादन 78.65 दशलक्ष टनांवर पोहोचले


आर्थिक वर्ष 23-24 मध्ये ऑक्टोबर पर्यंत एकत्रित उत्पादन झाले 507.02 मेट्रिक टन

कोल इंडिया लिमिटेडने उत्पादनात 15.36% वाढ केली प्राप्त

Posted On: 03 NOV 2023 11:48AM by PIB Mumbai

 

कोळसा मंत्रालयाने ऑक्‍टोबर 2023 महिन्‍यामध्‍ये एकूण कोळसा उत्‍पादनात लक्षणीय वाढ नोंदवली आहे. गेल्या वर्षीच्या याच महिन्‍याच्‍या 66.32 एमटी उत्पादनात 18.59% ची वाढ नोंदवत यावर्षी कोळसा उत्पादन 78.65 दशलक्ष टन (एमटी) पर्यंत पोचले आहे. कोल इंडिया लिमिटेड (CIL) चे उत्पादन 15.36% च्या वाढीसह ऑक्टोबर 2022 मधील 52.94 एमटीच्या तुलनेत यावर्षीच्या ऑक्टोबरमध्ये 61.07 एमटी पर्यंत वाढले आहे. आर्थिक वर्ष 22-23 मधील एकत्रित कोळसा उत्पादन (ऑक्टोबर 2023 पर्यंत) 448.49 एमटीच्या तुलनेत आर्थिक वर्ष 23-24 मध्ये याच कालावधीतील 13.05% वाढ नोंदवत 507.02 एमटी पर्यंत पर्यंत लक्षणीय वाढले आहे.

याव्यतिरिक्त, ऑक्टोबर 2023 मध्ये कोळसा वितरणामध्ये लक्षणीय वाढ दिसून आली आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये नोंदवलेल्या 67.13 एमटी वितरणाच्या तुलनेत यावर्षी 18.14% च्या वाढीसह उत्कृष्ट प्रगती दर्शवत यावर्षी कोळसा वितरण 79.30 एमटी वर पोहोचले आहे. कोल इंडिया लिमिटेड (CIL) ने कोळसा वितरणात लक्षणीय कामगिरी केली आहे. ऑक्टोबर 2022 मध्ये 53.69 एमटी वितरणाच्या तुलनेत 14.83% ची वाढ दर्शवत ऑक्टोबर 2023 मध्ये ते 61.65  एमटी वर पर्यंत पोहोचले आहे. आर्थिक वर्ष 23-24 मध्ये एकत्रित कोळसा वितरणात (ऑक्टोबर 2023 पर्यंत) 11.98 % ने वाढ होऊन त्याने 541.73 एमटी हा  आकडा गाठला आहे. आर्थिक वर्ष 22-23 मध्ये याच काळात एकत्रित कोळसा वितरण 483.78 एमटी इतके होते.

कोळसा उत्पादन आणि चढ-उतार  या दोन्हीमध्ये झालेली लक्षणीय वाढ, देशाच्या प्रगतीशील ऊर्जेची स्वयंपूर्णता अधोरेखित करते आणि भविष्यातील ऊर्जा मागणी पूर्ण करण्याच्या निर्धाराला बळ देते. अखंड कोळशाचे उत्पादन आणि वितरण सुनिश्चित करण्याच्या आपल्या वचनबद्धतेवर कोळसा मंत्रालय दृढ आहे. यामुळे देशाच्या निरंतर विकासाला चालना देणारा विश्वासार्ह ऊर्जा पुरवठा सुनिश्चित होईल.

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1974456) Visitor Counter : 91