इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
संशोधन सहयोगासाठी दोन दिवसीय भारत आणि अमेरिकाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय - राष्ट्रीय विज्ञान फाउंडेशन कार्यशाळेचे आयोजन.
प्रविष्टि तिथि:
03 NOV 2023 9:34AM by PIB Mumbai
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे (MeitY) सचिव एस कृष्णन यांनी 02 नोव्हेंबर 2023 रोजी MeitY- राष्ट्रीय विज्ञान फाउंडेशन (NSF) च्या पहिल्या कार्यशाळेचे उद्घाटन केले. अमेरिकेच्या MeitY- राष्ट्रीय विज्ञान फाउंडेशन बरोबर संयुक्तरित्या संशोधन सहयोगा अंतर्गत संशोधन आणि विकाससाठीच्या प्रस्तावाचा भाग म्हणून ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. कार्यशाळेदरम्यान अमेरिकाच्या आणि भारतीय संशोधकांना विचारमंथन तसेच परस्पर संशोधन सहकार्य करण्याची संधी मिळणार आहे.
MeitY आणि राष्ट्रीय विज्ञान फाउंडेशन यांच्यातील सहयोग प्रस्ताव, दोन्ही राष्ट्रांचा त्यांच्या संबंधित संशोधन क्षेत्राच्या सामर्थ्याचा आणि कल्पकतेचा फायदा घेऊन, धोरणात्मक तंत्रज्ञान भागीदारीतून त्यांच्या सामायिक दृष्टीला अधिक बळ देण्याचा संकल्प दर्शवतो. प्रकल्पांच्या यशासाठी संसाधने आणि कौशल्ये उपलब्ध आहेत याची खात्री करण्यासाठी टेस्टबेड प्रदाते, स्थानिक समुदाय आणि उद्योग भागीदार यांच्यासोबत योग्य भागीदारी विकसित करण्यासाठी अमेरिका आणि भारताच्या तपासकांच्या प्रस्तावित संघांना जोरदार प्रोत्साहन दिले जात आहे.
MeitY आणि राष्ट्रीय विज्ञान फाउंडेशन ने मे 2023 मध्ये संशोधन सहकार्याच्या अंमलबजावणी व्यवस्थेवर (IA) स्वाक्षरी केली आहे. , जून 2023 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका भेटी दरम्यान भारत सरकार आणि अमेरिकन प्रशासन यांनी जाहीर केलेल्या संयुक्त निवेदनात अधोरेखित केल्या प्रमाणे, ही सहयोगी संशोधन संधी विशेषत्वाने परस्पर हितसंबंधांच्या क्षेत्रातील शोध आणि नवोन्मेषावर लक्ष केंद्रित करते.
पहिल्या संयुक्त कार्यशाळेत, सेमीकंडक्टर संशोधन, पुढील पिढीतील संप्रेषण तंत्रज्ञान/ नेटवर्क/ प्रणाली, सायबर-सुरक्षा, शाश्वतता आणि हरित तंत्रज्ञान तसेच इंटेलिजेंट ट्रान्सपोर्टेशन सिस्टम या क्षेत्रातील प्रस्तावांचा विचार केला जाईल. 21 ऑगस्ट 2023 पासून प्रस्ताव सादर करण्यास सुरुवात झाली असून प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख 05 जानेवारी 2024 आहे.
कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी 200 हून अधिक संशोधक आणि दोन्ही देशांतील स्टार्ट-अप्स, राष्ट्रीय विज्ञान फाउंडेशन चे अधिकारी, अमेरिकन दूतावास तसेच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे आणि उद्योगांचे इतर वरिष्ठ अधिकारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला.
सेमीकंडक्टर संशोधन, उद्योग आणि विद्यापीठ परस्परसंवाद, सायबर सुरक्षा आणि संशोधन सहकार्याच्या निश्चित करण्यात आलेल्या सर्व 5 क्षेत्रांबाबत समांतर मालिका सत्रे झाली. या सत्रांमध्ये दोन्ही बाजूंच्या संशोधकांनी मोठ्या संख्येने हजेरी उपस्थिती लावली.


***
SonalT/ShardhhaM/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1974365)
आगंतुक पटल : 177