नौवहन मंत्रालय

आंतरराष्ट्रीय जलपर्यटन जहाज  ‘कोस्टा सेरेना’ क्रूझला हिरवा झेंडा दाखवून  पहिल्या देशांतर्गत क्रूझ प्रवासाचा  सर्बानंद सोनोवाल करणार आरंभ


2047 पर्यंत 50 दशलक्ष क्रूझ प्रवाशांचे भारताचे उद्दिष्ट

Posted On: 02 NOV 2023 5:45PM by PIB Mumbai

 

केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री  सर्बानंद सोनोवाल उद्या मुंबई येथे भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय जलपर्यटन जहाज कोस्टा सेरेनाक्रूझच्या  देशांतर्गत जलप्रवासाचा शुभारंभ करणार आहेत.  आंतरराष्ट्रीय पर्यटनापेक्षा देशांतर्गत पर्यटनाला प्राधान्य देण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यमवर्गीयांना आवाहन म्हणून सुरू केलेला देखो अपना देशहा उपक्रम अशा प्रकारच्या क्रूझ उपक्रमांना चालना देत आहे.

भारताला क्रूझ पर्यटनासाठी जगाच्या नकाशावर आणणे हे बंदरे, नौवहन  आणि जलमार्ग मंत्रालयाचे उद्दिष्ट आहे. मंत्रालयाने आयोजित केलेल्या नुकत्याच संपन्न झालेल्या भारत सागरी जागतिक परिषद  2023 मध्ये  2047 पर्यंत भारतातील 50 दशलक्ष क्रूझ प्रवाशांचे उद्दिष्ट  गाठण्यासंदर्भात चर्चा झाली.भारताकडे प्रचंड क्षमता असल्याने हे उद्दिष्ट साध्य करता येईल असे दिसत आहे .

कोस्टा क्रूझने पुढील 2 महिन्यांच्या प्रवासात अंदाजे 45,000 प्रवासी घेऊन जाण्याची अपेक्षा आहे.या प्रवाशांना   आंतरराष्ट्रीय गंतव्यस्थानावरून बुकिंग करता येईल.   सर्वात मोठा फायदा म्हणजे  भारतीयांना देशांतर्गत  आंतरराष्ट्रीय जलप्रवासाचा अनुभव घेता येईल.

***

S.Patil/S.Chavan/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1974269) Visitor Counter : 119