ऊर्जा मंत्रालय
राष्ट्रीय एकता दिनानिमित्त ऊर्जा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांचा एकता दौड मध्ये सहभाग
‘सरदार’ वल्लभभाई पटेल यांच्या सन्मानार्थ प्रत्येकाने राष्ट्रीय एकता दिवस साजरा करावा: केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री
Posted On:
31 OCT 2023 8:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 31 ऑक्टोबर 2023
भारताचे लोहपुरुष ‘सरदार’ वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्र नॅशनल युनिटी डे किंवा राष्ट्रीय एकता दिवस पाळत असताना, ऊर्जा मंत्रालयाने या प्रसंगी देशात आयोजित एकता दौडमध्ये सहभाग घेतला. सरदार पटेल यांच्या 148 व्या जयंतीनिमित्त आज नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर केंद्रीय ऊर्जा आणि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री आर. के. सिंह यांच्या हस्ते रन फॉर युनिटी अर्थात एकता दौड ला हिरवा झेंडा दाखवण्यात आला.
प्रसारमाध्यमांशी आणि उर्जा मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना आणि मंत्रालयांतर्गत असलेल्या संस्थांना संबोधित करताना, मंत्र्यांनी स्वातंत्र्यानंतर संस्थानांचे विलीनीकरण करून अखंड भारत साकारण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मरण करून प्रत्येक भारतीय नागरिकाला त्यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्याचे आवाहन केले. तत्पूर्वी, मंत्र्यांनी ऊर्जा मंत्रालयाच्या अधिकार्यांना आणि मंत्रालयांतर्गत असलेल्या संस्थांना एकात्मतेची शपथ दिली.
हेही वाचा: सरदार वल्लभभाई पटेल: द मॅन हू युनायटेड द नेशन (संशोधन युनिट, पीआयबी)
* * *
S.Tupe/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1973534)
Visitor Counter : 107