माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner

गोव्यात आयोजित 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी (इफ्फी) आंतरराष्ट्रीय ज्युरी जाहीर

नवी दिल्‍ली, 31 ऑक्‍टोबर 2023

 

जगभरातील नामवंत चित्रपट दिग्दर्शक, सिनेमॅटोग्राफर, चित्रपट निर्माते यांना 54 व्या इफ्फीमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि दिग्दर्शकाचा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपट निवडण्यासाठी  आंतरराष्ट्रीय ज्युरी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. या वर्षी महोत्सवासाठी 105 देशांमधून विक्रमी 2926 प्रवेशिका आल्या आहेत.

‘आंतरराष्ट्रीय स्पर्धा’ विभागासाठी महत्त्वाच्या शैलीतील 15 प्रशंसापात्र चित्रपट निवडले जातात, ज्यात महान आणि युवा दिग्दर्शकांचे नाविन्यपूर्ण आणि कलात्मक चित्रपट प्रतिनिधित्व असतात. आंतरराष्ट्रीय ज्युरी प्रतिष्ठित विजेत्याची निवड करेल.

सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी दिल्या जाणाऱ्या  सुवर्ण मयूर (गोल्डन पीकॉक)  पुरस्काराचे स्वरूप  40 लाख रुपये रोख आणि दिग्दर्शक आणि निर्मात्यासाठी प्रमाणपत्रे असे आहे.

सर्वोत्कृष्ट चित्रपटाव्यतिरिक्त, ज्युरी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (महिला) आणि विशेष ज्युरी पुरस्कार श्रेणींमध्ये विजेते देखील निवडतील.

‘दिग्दर्शकाच्या सर्वोत्कृष्ट पदार्पण  चित्रपटासाठी स्पर्धा’ मध्ये काल्पनिक चित्रपट आहेत जे दिग्दर्शकांच्या पुढल्या पिढीला  पडद्यावर काय दाखवायचे आहे याचे उदाहरण देतात. पदार्पण करणारे 7 दिग्दर्शक प्रतिष्ठेच्या प्रतिष्ठित रौप्य मयूर (सिल्व्हर पीकॉक) साठी स्पर्धा करतील, याचे स्वरूप 10 लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र असे आहे.

आंतरराष्ट्रीय ज्युरीचे सदस्य हे चित्रपट उद्योगातील अतिशय अनुभवी ज्येष्ठ व्यक्तिमत्वे असून चित्रपट निर्मितीच्या आवश्यक पैलूंचे प्रतिनिधित्व करतात:

  1. शेखर कपूर (चित्रपट दिग्दर्शक) - अध्यक्ष, ज्युरी - शेखर कपूर हे एक नावाजलेले  चित्रपट दिग्दर्शक, अभिनेते , कथाकार आणि निर्माता आहेत.  गोल्डन ग्लोब आणि ऑस्करसाठी नामांकनाव्यतिरिक्त पद्मश्री, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, बाफ्टा पुरस्कार, राष्ट्रीय समीक्षा मंडळ पुरस्कार आणि तीन फिल्मफेअर पुरस्कार यासह अनेक पुरस्कारांचे ते मानकरी  आहेत. कान्स इंटरनॅशनल ज्युरी (2010) चे माजी सदस्य आणि इफ्फी ज्युरी अध्यक्ष  (2015) आहेत. त्यांनी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले आहे.
  2. जोस लुईस अल्केन (सिनेमॅटोग्राफर) - जोस लुइस अल्केन हे 1970 च्या दशकात फ्लोरोसंट ट्यूबचा मुख्य प्रकाश म्हणून वापर करणारे पहिले सिनेमॅटोग्राफर आहेत. बेले इपोक (सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपटासाठी अकादमी पुरस्कार, 1993), टू मच (1995), यांसारख्या चित्रपटांमध्ये सिनेमॅटोग्राफर म्हणून  काम केले आहे.
  3. ब्लास्ट फ्रॉम द पास्ट (1999), आणि द स्किन आय लिव्ह इन (2011).   पेड्रो अल्मोदोवर सोबत असलेल्या त्यांच्या सहकार्यासाठी अनेक पुरस्कार विजेते जोस लुइस ओळखले जातात.
  4. जेरोम पेलार्ड (चित्रपट निर्माता आणि फिल्म मार्केटचे माजी प्रमुख) -  - शास्त्रीय संगीतकार, कलात्मक दिग्दर्शक आणि शास्त्रीय रेकॉर्ड लेबलसाठी सीएफओ  म्हणून सलग काम केल्यानंतर,जेरोम पेलार्ड यांनी इराटो फिल्म्समध्ये डॅनियल टॉस्कन डु प्लांटियर यांच्यासोबत सत्यजित रे, मेहदी चारेफ, सॉलेमाने सिसे, मॉरिस पियालाट, जीन-चार्ल्स टचेला इत्यादी प्रसिद्ध दिग्दर्शकांच्या डझनभर आशयघन चित्रपटांची  निर्मिती केली.त्यानंतर त्यांनी 1995 ते 2022 पर्यंत  जगातील आघाडीच्या चित्रपट बाजारपेठेच्या  विकास आणि व्यवस्थापन यावर देखरेख ठेवणाऱ्या फेस्टिव्हल डी कान्समध्ये मार्चे  डू फिल्मचे कार्यकारी संचालक म्हणून काम केले.
  5. कॅथरीन दुसार्ट (चित्रपट निर्मात्या) - कॅथरीन दुसार्ट यांनी सुमारे 15 देशांमध्ये जवळपास 100 चित्रपटांची निर्मिती किंवा सह-निर्मिती केली आहे. हुआहुआ  शिजी लिंहन के (2017), द मिसिंग पिक्चर  (2013) आणि एक्झिल (2016) या चित्रपटांसाठी त्या प्रसिद्ध आहेत. त्यांच्या अलीकडील निर्मितीमध्ये लैला इन या चित्रपटाचा  समावेश आहे
  6. अमोस गिटाई द्वारे हैफा (2020  व्हेनिस चित्रपट महोत्सवातील स्पर्धेत); लेस   इरॅडिएटेड (इरॅडिएटेड) रिथी पन्ह द्वारे (2020 बर्लिन चित्रपट महोत्सवातील सर्वोत्कृष्ट माहितीपट पुरस्कार); कॅथरीन दुसार्ट दोहा चित्रपट संस्थेच्या  सल्लागार आहेत.
  7. हेलन लीक (चित्रपट निर्मात्या) -  हेलन लीक एएम ऑस्ट्रेलियाच्या प्रतिष्ठित सर्जनशील निर्मात्यांपैकी एक आहेत. त्यांच्या कलाकृतींमध्ये  अलेक्झांड्रा पार्कसह कार्निफेक्स, सिसी स्ट्रिंगर आणि हॅरी ग्रीनवुड, जेसन क्लार्कसह स्वर्व्ह, वुल्फ क्रीक 2,रॉबर्ट कार्लाइल, डेव्हिड न्गुम्बुजारा आणि चार्ल्स डान्स अभिनीत रसेल क्रो आणि ब्लॅक अँड व्हाईटसह हेव्हन्स बर्निंग यांचा समावेश आहे.

गोव्याच्या निसर्गरम्य राज्यात 20 ते 28 नोव्हेंबर 2023 या कालावधीत  इफ्फीचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय चित्रपट उद्योगातील प्रतिभावंत आणि हजारो चित्रपटप्रेमी या दक्षिण आशियातील जागतिक सिनेमाच्या सर्वात मोठ्या सोहळ्यासाठी एकत्र येतील.

 

* * *

S.Patil/Sushma/Sonal C/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

iffi reel

(Release ID: 1973525) Visitor Counter : 127