पंतप्रधान कार्यालय

दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये बॅडमिंटनच्या पुरुष एकेरी प्रकारच्या सामन्यात सुकांत कदम याने कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला

Posted On: 26 OCT 2023 11:45AM by PIB Mumbai

चीनमधील हांगझोऊ येथे सुरु असलेल्या दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मधील बॅडमिंटनच्या पुरुष एकेरी एसएल-4 सामन्यात सुकांत कदम याने कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी त्याचे अभिनंदन केले आहे.


एक्स मंचावर लिहिलेल्या संदेशात पंतप्रधान म्हणाले:
 
“दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनच्या पुरुष एकेरी एसएल-4 प्रकारच्या सामन्यात अतुलनीय कामगिरी केल्याबद्दल सुकांत कदम याचे अभिनंदन.
त्याचे खेळातील कौशल्य, निश्चयी वृत्ती आणि अदम्य उर्जेचा देशाला अभिमान आहे. हे कांस्यपदक त्याची मेहनत आणि खेळाप्रती समर्पण यांचा झळाळता पुरावा आहे.

***

SonalT/SanjanaC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1971338) Visitor Counter : 75