पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या डिस्कस थ्रो (थाळीफेक) क्रीडा प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी योगेश कथुनियाचे केले अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 24 OCT 2023 9:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 ऑक्टोबर 2023

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज योगेश कथुनियाचे दिव्यांगांच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या डिस्कस थ्रो (थाळीफेक) -F54/55/56 क्रीडा प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले.

ते म्हणाले की, कथुनियाचा दृढनिश्चय आणि उत्कृष्ट कामगिरीमुळे आपल्या देशाची मान अभिमानाने उंचावली आहे.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

"योगेश कथुनियाचे पुरुषांच्या डिस्कस थ्रो (थाळीफेक) -F54/55/56 क्रीडा प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. त्याच्या दृढनिश्चय आणि उत्कृष्ट कामगिरीमुळे आपल्या देशाची मान अभिमानाने उंचावली आहे.

 S.Tupe/V.Yadav/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1971126) आगंतुक पटल : 107
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Kannada , Assamese , English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Malayalam