कोळसा मंत्रालय
कोळसा मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या एनएलसी इंडिया लिमिटेड उपक्रमाच्या, हरित शाखेने (अक्षय ऊर्जा) आपल्या व्यावसायिक कार्यक्रमाला केली सुरुवात
Posted On:
22 OCT 2023 12:26PM by PIB Mumbai
एनएलसी इंडिया लिमिटेड (NLC India) हा एक कोळसा मंत्रालयाच्या अंतर्गत येणारा केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील नवरत्न उपक्रम असून, या उपक्रमाने आपल्या पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या एनएलसी इंडिया ग्रीन एनर्जी लिमिटेड (NLC India Green Energy Limited) (NIGEL) कंपनीला स्वतःमध्ये समाविष्ट करून घेतले आहे. ही उपकंपनी विशेषत: सर्व अक्षय ऊर्जा उपक्रम हाती घेण्यावर लक्ष केंद्रित करते.
या कंपनीच्या पहिल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीमध्ये नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या कंपनीचा लोगो स्वीकारण्यासह प्रमुख व्यवस्थापकीय पदांच्या नियुक्तीला मान्यता देण्यात आली. एनएलसी इंडिया ग्रीन एनर्जी लिमिटेड (NIGEL) कंपनीचे अध्यक्ष प्रसन्न कुमार मोतुपल्ली यांनी कंपनीच्या लोगोचे उद्घाटन करताना सांगितले की, अक्षय ऊर्जा प्रकल्पांवर लक्ष केंद्रित करणारी ही नवी कंपनी, अक्षय ऊर्जेच्या (RE) माध्यमातून वीज निर्मिती क्षमता जलद गतीने वाढविण्यात मदत करेल. औद्योगिक वातावरण अतिशय आशावादी असल्याने, पंप्ड हायड्रो सिस्टीम आणि बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम यांसारख्या स्टोरेज तंत्रज्ञानाबरोबरच अक्षय ऊर्जा क्षेत्राची वाढ देखील एकाच वेळी शक्य होणार आहे.
ते पुढे म्हणाले की, उर्जा मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या केंद्रीय ऊर्जा प्राधिकरणाच्या (CEA), इष्टतम ऊर्जा निर्मिती अहवाल 2030 नुसार, ग्रिडवर आधारित बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टम (BESS) क्षमता सुमारे 41.65 गिगावॅट (GW) एवढी असून यामुळे स्टोरेज यंत्रणेमध्ये सुधारणा करण्यासाठी उत्तम संधी प्रदान करते.
या सहाय्यक कंपनीने 2030 पर्यंत 6 गिगावॅट (GW) क्षमतेचे अक्षय ऊर्जा (RE) प्रकल्प स्थापित करणे अपेक्षित आहे. 2 गिगावॅट (GW) क्षमतेचे प्रकल्प देशाच्या विविध भागात विकसित केले जात आहेत.
****
Saurabh k/Vikas Y/CYadav
Follow us on social media:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai