कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

नवी दिल्ली इथे विज्ञान भवनात केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांच्या हस्ते उद्या अनुभव पुरस्कार 2023 प्रदान केले जाणार

पंतप्रधान कार्यालय, कर्मचारीय, सार्वजनिक तक्रार निवारण आणि निवृत्ती वेतन राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीपूर्व समुपदेशन कार्यशाळेचे उद्घाटन करणार

Posted On: 22 OCT 2023 10:58AM by PIB Mumbai

निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतन धारक कल्याण विभाग 23.10.23 रोजी नवी दिल्ली इथे विज्ञान भवनात अनुभव पुरस्कार 2023 चे आयोजन करणार आहे. यात पुरस्कार प्राप्त व्यक्तींना त्यांच्या 2023  या वर्षातल्या लेखन कामगिरी करिता पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. केंद्रीय कर्मचारीय, तक्रार निवारण आणि निवृत्ती वेतन मंत्री डॉ. जितेंद्र सिंग हे पुरस्कार प्रदान करणार आहेत.

माननीय पंतप्रधान यांच्या निर्देशानुसार निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक विभागाने मार्च २०१५ मध्ये अनुभव पोर्टलची सुरूवात केली. निवृत्त होत असलेल्या तसेच निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना ते सरकारी सेवेत असतानाचे अनुभव सामायिक करण्यासाठी तसेच प्रशासनात सुधारणा करण्याच्या दृष्टीने सूचना देण्यासाठी या पोर्टलच्या माध्यमातून आपली लिखाणातली कामगिरी प्रदर्शित करण्याच्या उद्देशाने एक ऑनलाईन प्रणाली उपलब्ध करण्यात आली. 

या विभागाच्या अनुभव पोर्टल वर 96 मंत्रालये, विभाग, संघटनांची नोंदणी झाली असून आतापर्यंत 10000 हून अधिक लेख यावर प्रसिद्ध करण्यात आले आहेत.

निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभाग हे एक निवृत्ती पूर्व समुपदेशन (PRC) कार्यशाळा देखील आयोजित करणार आहे, ज्यामुळे भारत सरकारच्या सेवेतून निवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांना जीवन सुलभतेच्या दृष्टीकोनातून लाभ मिळण्याच्या उद्देशाने हे एक क्रांतिकारी पाऊल ठरणार आहे. निवृत्तीवेतनधारकांच्या या कार्यशाळेत लवकरच निवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीनंतरचे लाभ आणि त्याच्या मंजुरी प्रक्रियेशी संबंधित माहिती उपलब्ध होणार आहे.

याशिवाय, अखिल भारतीय निवृत्ती वेतन अदालत हे निवृत्ती वेतना संदर्भातल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक प्रभावी व्यासपीठ म्हणून पुढे आले आहे. आतापर्यंत निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाने आठ निवृत्ती वेतन अदालतीच आयोजन केलं आहे आणि 24671 प्रकरणांवर चर्चा होऊन यापैकी कार्यशाळेत सहभागी झालेल्या विविध मंत्रालये, विभाग, संघटनांकडून 17551 तक्रारींचे (71%) निवारण करण्यात आले आहे. 

आगामी कार्यक्रमात, संकल्पनाधारित अखिल भारतीय निवृत्ती वेतन अदालत दिल्ली आणि देशभरातल्या इतर ठिकाणी आयोजित केल्या जाणार असून यात विविध मंत्रालये/विभागामधल्या प्रलंबित निवृत्ती वेतन प्रदान प्रकरणांचा आढावा विविध मंत्रालये/विभागांकडून घेतला जाणार आहे.

जीवन सुलभतेच्या अनुषंगाने  निवृत्ती वेतन धारकांसाठी मोठ्या प्रमाणावर एकात्मिक पोर्टल्सची तर्क सुसंगतता ध्यानात घेऊन निवृत्तीवेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाने निवृत्ती वेतन प्रदान बँक पोर्टल्स, अनुभव, CPENGRAMS, CGHS ही सर्व पोर्टल्स एकत्रितपणे नव्याने निर्माण झालेल्या “एकात्मिक निवृत्तीवेतनधारक पोर्टल” (https://ipension.nic.in) मध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे.

निवृत्ती वेतनधारकांना भेडसावणाऱ्या बँकेशी संबंधित समस्या म्हणजेच बँक खात्यात बदल, जीवन प्रमाणपत्र सादर करणे, निवृत्ती वेतनधारकांची मृत्यू प्रमाणपत्र सादर करणे, निवृत्ती वेतन पत्र आणि या निवृत्तीवेतन पत्राचे पुनर्मुद्रण, प्राप्तीकर कपात संकलन /अर्ज क्रमांक १६, निवृत्ती वेतन पावती संबंधित माहिती, निवृत्तीवेतन प्रदान करणाऱ्या बँकांच्या वेबसाईट याबाबत सर्व एकत्रित माहिती एकात्मिक निवृत्तीवेतनधारक पोर्टलवर एकत्र करण्यात येईल. भारतीय स्टेट बँक आणि कॅनरा बँकेचा निवृत्ती वेतन सेवा पोर्टल भविष्य पोर्टलशी एकत्रित जोडण्याबाबतचे कार्य पूर्ण झाले आहे.

निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतन धारक कल्याण विभाग देशव्यापी डिजिटल जीवन प्रमाणपत्र मोहीम 2.0 येत्या नोव्हेंबर 2023 पासून आयोजित करत आहे, ज्याद्वारे 70 लाख केंद्र सरकारी निवृत्ती वेतनधारकांना आपली जीवन प्रमाणपत्रे सादर करणे सोयीस्कर ठरणार आहे. देशभरातल्या शंभर शहरांमध्ये 17 बँकांच्या सहयोगाने सुमारे 500 ठिकाणी डिजिटल जीवन प्रमाणपत्र कॅम्प आयोजित केले जाणार आहेत. या मोहिमेवर देखरेख ठेवण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय डिजिटल जीवन प्रमाणपत्र पोर्टलचे उद्घाटन केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या हस्ते 23 ऑक्टोबर 2023 रोजी नवी दिल्लीत विज्ञान भवन इथं होणार आहे.

***

Saurabh K/Sandesh N/CYadav 

 

Follow us on social media:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    



(Release ID: 1969892) Visitor Counter : 116