अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

विशेष मोहिम 3.0 च्या तिसऱ्या आठवड्यात केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाच्या कामाला वेग


1,000 कोटी रुपये किमतीचे 365 किलो अमली पदार्थ आणि 13 कोटी रुपये किमतीच्या 1.35 कोटी सिगारेटच्या स्टिकसची लावली विल्हेवाट

785 सार्वजनिक तक्रारी, 280 सार्वजनिक तक्रार अपील आणि 14 खासदार संदर्भ निकाली काढण्यात आले

Posted On: 21 OCT 2023 6:30PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 ऑक्‍टोबर 2023

 

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ (सी बी आय सी) आणि संबंधित क्षेत्रीय कार्यालयांनी प्रलंबित बाबींचा निपटारा करण्याकरता विशेष मोहिम 3.0 मध्ये सक्रिय सहभाग घेतला.

या वर्षी सीबीआयसीने अंमली पदार्थ आणि सिगारेट यांसारख्या जप्त केलेल्या वस्तूंच्या विल्हेवाटीवर विशेष लक्ष  केंद्रित केले असून विशेष मोहिम 3.0 अंतर्गत आजपर्यंत, 1,000 कोटी रुपये किमतीचे 365 किलो अमली पदार्थ आणि 13 कोटी रुपये किमतीच्या 1.35 कोटी सिगारेटच्या स्टिकसची  विल्हेवाट लावण्यात आली आहे.

सी बी आय सी ने संपूर्ण देशभरात यादृष्टीने केलेल्या कार्याची उत्साहवर्धक फलनिष्पत्ती पुढीलप्रमाणे (२० ऑक्टोबर २०२३ पर्यंत):-

  • 785 सार्वजनिक तक्रारी, 280 सार्वजनिक तक्रार अपील आणि 14 खासदार संदर्भ निकाली काढण्यात आले
  • 20,871 प्रत्यक्ष फायलींचा पुनरावलोकन आणि 8308 फायलींचा संपूर्ण निपटारा
  • 11,718 ई-फाईल्सचे पुनरावलोकन आणि अशा 711 फाइल्स बंद करणे.
  • कार्यालय संकुल आणि सार्वजनिक ठिकाणी 1195 स्वच्छता मोहिमांचे आयोजन
  • 9,304 किलोग्रॅम भंगाराची विल्हेवाट लावली गेली ज्यामुळे कार्यालयाची 46,565 चौरस फूट अतिरिक्त जागा मोकळी झाली.

सी बी आय सी आणि विविध क्षेत्रीय कार्यालयांच्या अधिकृत समाज माध्यम हॅन्डल वरून आजपर्यंत जागरूकता आणि स्वच्छता संदेशाचा प्रसार करण्यासाठी 391 पोस्ट्स केल्या. SCDPM 3.0 अंतर्गत निर्धारित सर्व लक्ष्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

GST-2017 Landscape in Office Premises as part of beautification by CGST Aurangabad Commissionerate

Disposal of NDPS Substances by Delhi Customs Preventive Commissionerate

 

Weeding out of old records by Krishnapatnam Customs House

 

* * *

S.Tupe/B.Sontakke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1969775) Visitor Counter : 83