खाण मंत्रालय
विशेष मोहीम 3.0 अंतर्गत खाण मंत्रालयाने अधिक व्यापक स्वरूपात लोकांशी आणि निसर्गाशी एकरूपता अनुभवली
Posted On:
21 OCT 2023 5:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 ऑक्टोबर 2023
खाण मंत्रालयाने केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसह आपल्या संबंधित क्षेत्रातील विभागांबरोबर प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे आणि विशेष मोहीम 3.0 अंतर्गत सृजनशील आणि अभिनव उपक्रम राबवून निसर्गाचे देणे देण्यावर भर दिला आहे.
मोहिमेच्या पहिल्या तीन सप्ताहांमध्ये, प्रत्यक्ष स्वरूपातील जुन्या नोंदींच्या पुनरावलोकनासाठी मंत्रालयाला पहिल्या दहांमध्ये स्थान देण्यात आले आहे. नियम आणि प्रक्रिया सुलभ करण्यात मंत्रालयाने 100% यश प्राप्त केले असून, सार्वजनिक तक्रारींचे निवारण, आंतर मंत्रालयीन संदर्भ आणि राज्य सरकारांकडून प्राप्त झालेले संदर्भ यांचा निपटारा केला आहे. याशिवाय लक्ष्यित स्वच्छता मोहिमांपैकी 75%, मोहिमेआधीच पूर्ण झाल्या आहेत.
सुमारे 50,000 चौरस फूट जागा रिकामी करून आणि भंगार साहित्याची विल्हेवाट लावून अंदाजे 1.47 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त करण्याच्या मोठ्या कामगिरीनंतर मंत्रालय आणि त्यांच्या अधीनस्थ संस्थांनी या मोहिमेचा उपयोग निसर्ग, जैव विविधता आणि सामान्य माणसापर्यंत पोहोचण्यासाठी केला. त्यादृष्टीने बर्ड फीडर अर्थात पक्षांसाठी खाद्य ठेवण्याची व्यवस्था आणि पाण्याची भांडी बसवण्यात आली आहेत, औषधी वनस्पतींनी युक्त बागा तयार केल्या आहेत, तसेच शालेय मुलींना मासिक पाळीच्या स्वच्छतेबद्दल जागरुक केले आहे.
खाण मंत्रालय आणि संबंधित संस्था आपले कार्यक्षेत्र हे तेथील कर्मचाऱ्यांसह व्यापक प्रमाणावर समाजासाठी देखील एक उत्कृष्ट अनुभव ठरावा, याकरता विशेष मोहीम 3.0 अंतर्गत वचनबद्ध आहेत.
ओदिशा मध्ये नाल्को येथे औषधी वनस्पतींची लागवड करताना...
जबलपूर येथील आय बी एम कार्यालयाजवळ बर्ड फीडर्स बसवताना
भुवनेश्वर मधील मुमताज अली सरकारी हायस्कूल येथे 220 विद्यार्थिनींसाठी मासिक पाळीच्या स्वच्छतेबद्दल जागरुकता कार्यक्रम
* * *
M.Pange/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1969744)
Visitor Counter : 92